ब्रोकोली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग- Broccoli farming

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ब्रोकोली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग  करता उत्कर्षभारती फार्मर्स ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड , दोडी बुद्रुक,तालुका सिन्नर , जिल्हा -नाशिक ह्यांनी पुढाकार घेतला असून , खालील लेखात ह्याची थोडक्यात रूपरेषा देत  आहोत.

कोणतेही पीक उभे करताना लागणारे भांडवल,श्रम,माल चांगला यावा यासाठी आवश्यक चांगली  खते, औषधे , बियाणे  आणि ते वेळेवर देण्यासाठी आवश्यक माहिती व सल्ला,आणि पिक आल्यानंतर त्याला मिळणाऱ्या बाजारभावाची अनिश्चितता यामध्ये शेतकरी अडकून बेजार झालेला आहे. हे घटक निश्चित असले आणि योग्य खर्च होऊन आलेल्या पिकाला निश्चित भाव मिळाला तर शेतकरी या चक्रातून सुटू शकेल. यासाठी एखाद्या नगदी पिकाची आवश्यकता आहे. हे जेथे पिकाचा भाव लागवड करण्याआधी ठरविला जाईल अशा करार शेतीतून शक्य होऊ शकेल.

योजना – ब्रोकोली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग-

Table of Contents

उत्कर्षभारती फार्मर्स ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड , दोडी बुद्रुक , आपल्या शेतकर्यांसाठी ब्रोकोलीकॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा पर्याय उपलब्ध करीत आहे.
ब्रोकोली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग
broccoli farming
ब्रोकोली म्हणजे हिरवी फ्लावर, ही कोबी ची एक जात आहे. या भाजीपाला पिकाला हॉटेल व्यवसायात तसेच परदेशात भरपूर मागणी आहे.एकरी तीस ते पस्तीस हजार उत्पादन खर्च असलेल्या या पिकाचे एकरी उत्पादन कमीतकमी चार टन व जास्तीत जास्त सहा ते सात टन  येते.
शेतमाल निर्यात क्षेत्रात मोठं नाव असलेली  कंपनी आपल्या कंपनी सोबत १०० एकर पेक्षा अधिक क्षेत्रासाठी ब्रोकोली उत्पादन पूर्णपणे वर्षभर टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यासाठी करार  करण्यास तयार आहे.

करार – ब्रोकोली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग

See also  एसटी मधुन हाफ तिकिट सवलतीमध्ये प्रवास करण्याचे प्रमुख नियम अणि अटी - 50 percent discount to women on st bus ticket rules of scheme in Marathi
1.      उत्कर्षभारती शेतकऱ्यां बरोबर ब्रोकोली उत्पादन करून कंपनीलाच विकण्याचा करार करू इच्छित आहे.कराराची ढोबळ प्रस्तावना खालीलप्रमाणे असेल.
2.      शेतकऱ्यांनी किती क्षेत्रात व कोणत्या वेळी ब्रोकोली लावायची याचे नियोजन वेळापत्रक कंपनी तयार करेल.
3.      पिक लागवड करण्याआधी  भाव ठरलेला राहील व तो करारात नमूद व जाहीर असेल.अंतिम भाव कारारापूर्वी कळविला जाईल.
4.      ब्रोकोली ची रोपे कंपनी संबंधित निर्यातदार कंपनी मार्फत उपलब्ध करेल. त्याचा खर्च उत्पादन खरेदी केल्यानंतर त्यामधून घेतला जाईल.
5.      पीक लागवड ते हार्वेस्टिंग संपूर्ण मार्गदर्शन कंपनी करेल. त्याप्रमाणे खतऔषधे वापर शेतकऱ्यांनी करायचा आहे.
6.      पिक आल्यानंतर कंपनीला विक्री करणे शेतकऱ्यांना बंधनकारक असेल, तसेच कंपनी खरेदीसाठी बांधील असेल.
ब्रोकोली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग यामध्ये शेतकरी आणि संबंधित एक्सपोर्टर यांचेशी चर्चा करून अंतिम मसुदा तयार करण्यात येईल.या द्वारे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा श्रोत उपलब्ध व्हावा असा कंपनीचा प्रयत्न असेल.तरी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या प्रकल्पात सहभागी व्हावे असें आवाहन करण्यात येत आहे.यासंदर्भात अधिक माहितीसाठी तसेच इच्छुक शेतकऱ्यांनी नावे कळविन्यासाठी संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
मोबाइल क्रमांक 7083308391, 9588456043*

broccoli farming

जैविक खते अधिक माहिती

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा