आले – आल्याचे उपयोग – By products of Ginger in Marathi
आल्याचा उपयोग नित्य आहारात मोठा आहे. आल्या पासून लोणची, मसाले, सौम्य पेये बनविली जातात; त्याचप्रमाणे मद्यार्कामध्ये आल्याचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रात या पिकाची लागवड प्रमुख्याने सातारा, ठाणे, रायाड, सिंधुदुर्ग व पुणे या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.
आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागणीनंतर आठ महिन्यांच्या पुढे बाजारातील मागणीप्रमाणे आल्याची काढणी करावी.
- आल्याचा पाला कापून गड्डे, बोटे काढणीनंतर वेगळे करावे काढणीनंतर वेगळे करावे.
- आल्याच्या कंदापासून खारे आले, आले पाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. वाळलेल्या आले पावडरपासून वाफेच्या सहाय्याने तेलही काढता येतें.
- तेलाचा रग फिकट पिवळा तें पिवळा असून, त्याला सुवासिक गंध असतों. हे तेल उघडे ठेवल्यास हवेत उडून जाते.
- ओलीवोरेझीन रासायनिक द्रावक वापरून वाळलेल्या आले पावडरपासून ओलीवोरेझीन बनविता येतें.
- काढणीनंतर आलें वाळवलेले, सुठ व पावडर स्वरूपात साठवणूक करता येते. पीक परिपक़ झाल्यानंतरच काढणी करावी.
- ते पूर्ण वाढलेले निरोगी असावे. कुजके, सडलेले अपरिपक्र आले सुठीसाठी वापरू नये.
- सुंठा साठी वापरायचे आलें अधिक तंतुमय असू नयें.
- सुठ तयार करण्यासाठी जमेंका, चायना, रिओडि जानेरी, माहिम यासारख्या कमी तंतुमय जातींचा वापर करावा.
कांदयाचे आरोग्यदायी फायदे – Onion health benefits
वाळलेले आले
वाळलेले आलें तयार करण्यासाठी आलें चांगले स्वच्छ धुऊन घ्यावे. ते मूळविरहित असावे.
- स्वच्छ पाण्यात एक रात्रभर भिजून ठेवावें. दुसऱ्या दिवशी त्याच्यावरील साल बांबूच्या टोकदार काडीनें चिवट्याने खरडून काढावी. परत एकदा स्वच्छ पाण्यात धुऊन काढावे.
- हे साल काढलेले आले ४ तें ८ द्विस उन्हात चांगले वाळवावे.
- वाळवताना एक ते दीड इंचापेक्षा जाड थर देऊ नये. सुकविण्यासाठी स्वच्छ प््लॅस्ठिकचा किंवा ताडपत्रीचा वापर करावा.
- आल्यातील पाण्याचा अंश आठ ते दहा ठकक्यापर्यंत कमी झाल्यानंतर आले पूर्ण वाळले, असे समजावें.
- पूर्ण वाळल्यानंतर परत एकदा हातानें चोळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेल्या आल्याला वाळवलेले आले किंवा चुन्याची प्रक्रिया नकेलेले आले म्हणतात.
- असे आले थंड आणि कोरड्या जागेत साठवावे. वाळलेल्या आल्याचे उत्पत्न ओल्या आल्याच्या २० ते २५ टक्के इतकें असतें. हे उत्पत्न आल्याच्या वाणानुसार क्दलते.
सुंठ तयार करण्याची पद्धती – By products and processing of Ginger in Marathi
मलबार पद्धती
- या पद्धतीने सुठ तयार करण्यासाठी प्रथम आले स्वच्छ निवडून ८ तें १० तास पाण्यात भिजत ठेवावे.
- त्यानंतर त्याची साल काळून घ्यावी. साल काढलेले आले २ टक्के चुन्याच्या द्रावणात ९ तें ७ तास भिजत ठेवावे. त्या द्रावणातून काढून हें आलें छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवतात.
- बंद खोलीत आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी देतात.
- थोडक्यात, बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. साधारणत: १ किलो कंदाला ६ ते १० ग्रॅम या प्रमाणात गंधक जाळावे. कंद बाहेर काढून २ खकके चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व
- परत १२ तास गंधकाची धुरी देतात. अशा प्रकारे हो प्रक्रिया तीन वेळा करावी लगते.
- त्यामुळे आल्याच्या कंदाला पांढराशुभ्र रग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये पाण्याचा अंश ८ ते १० ठकके राहीपर्यंत वालवलें जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते.
सोडा खार मिश्रण पद्धती
- या पद्धतीनें सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावें. त्या ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी.
- त्यानतर १.५ ते २ फूट आकाराचा हाताने उचलेल इतक्या क्षमतेच्या गल्व्हनाईज जाळीच्या पिजऱ्यामध्ये आलें भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यामध्ये सोडियम हायड्राऑक्साईड (कॉस्टिक सोंडा)ची २० टक्के, २५ टक्के आणि ५० खके तोत्रतेंची द्रावणे तयार करून उकलून घ्यावीत.
- या द्रावणामध्ये कदाने भरलेला पिंजरा २० टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, २५ ठक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि ५० खके द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा.
- त्यानंतर पिंजऱ्यातील आलें चार ठकके सायट्रिक असिडच्या द्रावणात २ तास बुडवून ठेवावे. तें चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वालत घालावे. चांगलें वाळल्यानंतर थोडी फार राहिलेली साल चोलून काढावी.
आल्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ – By products and processing of Ginger in Marathi
- आल्यापासून सुके आले पावडर, आले मुरबा, आले कडी, आले पेस्ट, आले स्क्रेश बनकिता येतात.
- सयःस्थितीत चांगला बाजारभाव मिलतो. करील सर्व पद्यार्थ तयार करण्यासाठी पूर्वप्रक्रिया करणे गरजेचे असते. यामध्ये ताजे आले स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावे व त्यानंतर साल चाकूच्या साहाय्याने काढून त्याची लहान तुकड्यांमध्ये कापणी करावी.
आल्याची पावडर
- चांगले वाळलेले आले घेऊन त्याची बारीक पावडर तयार केली जाते. ती पावडर ५० ते ६० मेशच्या चाळणीमधून चाळून हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरली जाते. आल्याच्या पावडरचा मुख्य उपयोग ओली ओरेझिन तसेच फ्दार्थ बनविण्यासाठी केला जातो.
आले कँडी
- साहित्य प्रमाण – आले १००० ग्रॅम, साखर ८०० ग्रॅम व सायट्रिक असिड १० ग्रॅम, आल्याचे केलेलें लहान तुकडे ०.५ ठकके, सायट्रिक असिड असलेल्या पाण्यात एक तास शिजवावें व
- त्यानंतर छिद्रे निर्माण करावीत. आल्याचे तुकडे व ४०० ग्रॅम साखर यांचे मित्रण २४ तास ठेवावे.
- नतर दुसऱ्या दिवशी २०० ग्रॅम व तिसऱ्या दिवशी २०० ग्रॅम साखर टाकून ठेवावी व चौथ्या दिवशी हे मश्रण ६० ठकके विद्राव्य घटक होईपर्यंत झिजवावे.त्यनातर त्यातला पाक गाळून वेगळा केला जातो.
आल्याची पेस्ट
- पूर्व प्रक्रिया केलेल्या आल्याचे तुकडे ८० सें.ग्रे. पाण्यात ३ ते ४ मिनिटे ठेवावेंत. हे तुकडे थेड करून पाणी मिसळून त्यांची पेस्ट केली जाते. यामध्ये आम्लता नियंत्रित करण्यासाठी सायट्रिक आम्लाचा वापर करतात. तयार केलेली पेस्ट गरम केली जाते व थेड करून बाटलीत साठवून ठेवली जाते.
- चव, गुणवत्ता व साठवण क्षमता वाढविण्यासाठी सोंडियम बेन्झोईट या सरक्षकाचा वापर करता .
आल्याचा स्वॅश
- पूर्व प्रक्रिया केलेलें तुकडे हे प्रेशर कुकरमध्ये साधारणत: ५ तें १० मिनिटे शिजवून घ्यावेत व पाण्याचा वापर करून त्यामधील रस काढला जातों. यात साखर मिसळून या रसाचे विद्राव्य घठकाचे प्रमाण ४० ते ४५ ठक््क््यांपर्यंत त्याचे पेय बनवितात.
आल्याचा मुरंबा
- आले मिठाच्या पाण्यातून काढून थंड पाण्याने धुवावे. तें पाण्यात 40 मिनिटे उकळावे. ते साखरेच्या पाकात ४५ मिनिटे उकळावे आणि सौलबंद करून साठवावे.
आल्याचे तेल
- वाळवलेल्या आल्याची पावडर वापरून वाफेच्या ऊर्ध्वपातनक्रियेत आल्याचे तेंल गोंळा करतात.
- आल्यापासून १.५ ते ३.५ टक्के तेल फ्दार्थ प्रक्रिया करून तयार केल्यास शेतकऱ्याची मिळकत निश्चितच वाढेल व नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल.
आल्याच्या वड्या
- एक वाटी आल्याचा कीस, पाव वाटी नारळाचा कौस, २ वाट्या साखर, १ कप साईसकट दूध, १ चमचा तूप, थोडी पिठीसाखर हे सर्व साहित्य घ्या.
- आल्याची साल काढून आले व नारळाचा चव मिक्सरमधून काढावा. त्या मिश्रणात दूध व साखर घालून मिश्रण सारखे करावे. मंद गॅसवर शिजवून गोळा होत आला, की पातेले खाली उतरवून पिठौसाखर घालून घोटावे व वड्या थापाव्यात.
Comments are closed.