CCTV Camera आपल्या घराच्या सुरक्षितेता करता – CCTV Camera for home safety information in Marathi
आज जागोजागी चोरी,दरोडे,खुन,अपहरण लुटमारीचे प्रमाण खुप अधिक प्रमाणात वाढले आहे.ह्या अनैतिक कृत्यांना जर आपणास आळा घालायचा आहे तर आपण सावधगिरीने राहणे फार गरजेचे आहे.
आणि सध्या दिवसमान खुप खराब आहेत आज दिवसाढवळया सुदधा घरात चोरी दरोडे होत असतात.भर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीला चाकु बंदुक दाखवून राजरोसपणे लुटले जाण्याचे प्रकार घडत असतात.
म्हणून आज आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी जागरूक असणे फार गरजेचे झाले आहे.
आणि सीसीटिव्ही कँमेरा हे एक असे साधन तसेच माध्यम आहे ज्याच्या द्वारे आपण आपल्या घराची सुरक्षितता राखु शकतो.आणि आज अशी सिस्टम तयार झाली आहे की आपण आपल्या घरात,घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कँमेराची फुटेज आपल्या मोबाईलवर तसेच लँपटाँपवर देखील बघु शकतो.
याचा फायदा आपणास हा होत असतो की आपण दुर अंतरावर राहुन देखील आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडु शकतो.याने आपले काम देखील व्यवस्थित होते.आणि आपले घर आणि कुटुंब सुखरूप आहे हे देखील आपल्याला सुनिश्चित करता येत असते.
आजच्या लेखात आपण ह्याच सीसीटिव्ही कँमेराविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
CCTV Camera म्हणजे काय असते?
सीसीटीव्ही कँमेराचा फुलफाँर्म (close circuit television)असा होत असतो.याचसोबत यास व्हिडिओ सर्वेलन्स असे देखील म्हणत असतो.
सीसीटीवी कँमेरा ही एक सिस्टम असते जिचा वापर आपण दुर बसुन आपल्या आँफिस तसेच घरावर लक्ष ठेवण्यासाठी करत असतो.
सीसीटीव्ही कँमेरात दिवसभरात तसेच रात्रीतुन आपल्या घरात तसेच आँफिसमध्ये कोणी कोणी प्रवेश केला होता.हे आपल्या निदर्शनास येत असते.
ज्याने समजा आपल्या आँफिस तसेच घरामध्ये अचानक काही चोरी झाली तसेच काही अनैतिक प्रकार घडला तर त्याची चौकशी करण्यासाठी आपण सीसीटीव्ही कँमेराची मदत घेऊ शकतो आणि तत्काळ त्या चोराला तसेच गुन्हेगाराला पकडु शकतो.
CCTV Camera चे काम काय असते?
सध्याचे दिवसमान खुपच वाईट झाले आहे त्यामुळे दिवसाढवळया देखील घरात चोरी होत असते.तसेच दरोडे पडत असतात.
आणि समजा आपल्या घरात एखादा कार्यक्रम असल्यावर अशा परिस्थितीत दिवसभरात आपल्या घरात खूप लोकांची गर्दी असते.खुप जण ये जा करत असतात.अशात नजरचुकीने एखादा चोरटा भामटा देखील नकळत घुसुन येत असतो.
आणि आराताराबघुन घरात हात साफ करत असतो.आणि जेव्हा आपल्या लक्षात हा प्रकार येतो तेव्हा आपण चोराला शोधण्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींवर चोरीचा आरोप घेत असतो जेणे आपले चांगले संबंध देखील बिघडण्याची दाट शक्यता असते.
अशा परिस्थितीत जर आपल्या घरात तसेच घराच्या आवारात आजुबाजुला हिडन सीसीटीव्ही कँमेरे आपण जर लावलेले असतील तर आलेल्या सर्व जणांत नेमकी चोरी कोणी केली हे आपल्याला सीसीटीव्ही कँमेराच्या फुटेजमध्ये लगेच दिसुन जात असते.याने खरा चोर देखील पकडला जातो आणि कोणी निरपराध व्यक्तीवर चोरीचा आळ देखील येत नाही.
याचसोबत आपण कुठे बाहेरगावी गेलो आणि अचानक आपल्या घरात जर चोरी झाली तर घरात चोरी करणारा व्यक्ती कसा दिसत होता हे आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमधुन दिसुन जात असते.ज्याने पोलिसांना देखील त्या गुन्हेगाराला पकडायला सोप्पे जात असते.
म्हणजेच दिवसभरात तसेच रात्रीतुन आपल्या घरात तसेच आँफिसमध्ये कोण कोण आले होते हे सर्व दाखवण्याचे काम सीसीटीव्ही कँमेरा करत असतो.
तसेच अचानक जर कोणी चोर आपल्या आँफिस तसेच घरात घुसुन आला असेल तर ते देखील सीसीटीव्ही कँमेरामध्ये आपल्याला दिसुन जाते.जेणे आपण त्याला पकडुन पोलिसांच्या स्वाधीन देखील करू शकतो.
सीसीटीव्ही कँमेरा कुठे कुठे लावले जातात?
सीसीटीव्ही कँमेराचा वापर आज सिक्युरीटी पर्पजसाठी अनेक ठिकाणी केला जात असतो.
- बँक
- सरकारी कार्यालय
- मा़ँल,शाँपिंग सेंटर
- लग्न कार्यालय
- घरात तसेच घराच्या आवारात
- आँफिस,कंपनीमध्ये तसेच आँफिस,कंपनीच्या आवारात
- विविध दुकानांमध्ये तसेच दुकानाच्या बाहेर
- सार्वजनिक स्थळे-इत्यादी.
CCTV Camera लावण्याचे फायदे कोणकोणते असतात?
घरात घराबाहेर,आँफिसात तसेच इतर कोणत्याही सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरा लावण्याचे अनेक फायदे असतात आणि ते पुढीलप्रमाणे असतात :
- आपण दुर अंतरावर राहुन देखील आपल्या घरात कोण येते कोण जाते याकडे तसेच आपल्या कुटुंबाकडे सीसीटीव्ही कँमेरा द्वारे लक्ष देऊ शकतो.
- दिवसभरात तसेच रात्रीतुन आपल्या घरात घराच्या आवारात तसेच आँफिसमध्ये आँफिसच्या आवारात कोण कोण आले होते हे सर्व दाखवण्याचे काम सीसीटीव्ही कँमेरा करत असतो.फक्त यासाठी आपल्याला आपल्या घराच्या आँफिसच्या सीसीटीव्ही कँमेराचे कनेक्शन आपल्या लँपटाँप तसेच अँड्राईड मोबाईलमध्ये घेणे गरजेचे असते.
- आपल्या आँफिसात,कार्यालयात,बँकेत कोण येते कोण जाते याकडे आपण लक्ष ठेवू शकतो.ज्याने तेथे काही चोरी लुट वगैरे चुकीचा प्रकार घडल्यास आपल्या लक्षात येऊन जाते.आणि आपण त्यावर त्वरीत योग्य ती कारवाई करू शकतो.
- आपल्या आँफिसातील सर्व वर्कस व्यवस्थित आपले काम करता आहेत की नाही यावर आपल्याला लक्ष ठेवता येत असते.
- याचसोबत आज जागोजागी दिवसाढवळया लहान मुले मुली तसेच प्रौढ व्यक्तींचे देखील पब्लिक प्लेस वरून अपहरण केले जाते अशा परिस्थितीत त्या पब्लिक प्लेसवर जर सीसीटीव्ही कँमेरा लावलेला असेल तर आपण त्या फुटेजवरून अपहरण करणारे दिसायला कसे होते कोणत्या दिशेने त्या व्यक्तीला घेऊन गेले त्यांच्या गाडीचा नंबर काय होता ही सर्व माहीती सीसीटीव्ही फुटेजद्वारे प्राप्त करू शकतो.आणि योग्य ती फिल्डींग लावून त्वरीत त्यांना पकडू शकतो.
- सीसीटीव्ही कँमेराचा सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे याने चोरी,लुट,दरोडे,खुन,लुटमार अपहरण अशा गुन्हेगारी दुष्कृत्यांना आळा बसत असतो कारण जागोजागी आता प्रत्येक सुरक्षेच्या हेतूने हिडन सीसीटीव्ही कँमेरे लावले जात असल्याने गुन्हेगार देखील गुन्हा करायला घाबरत असतात.
याने गुन्हेगारांच्या मनात पकडले जाण्याची भीती निर्माण होते आणि ते गुन्हा करायला घाबरतात आणि गुन्हा करणे टाळतात देखील.
म्हणजेच पब्लिक प्लेसवर चोरी,लूटमार अपहरण होणे अशा कृत्यांना काही प्रमाणात का होईना आळा बसत असतो.
सीसीटिव्ही कँमेरा आपण कुठे लावू शकत नाही?
आपण एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल रूममध्ये,पर्सनल प्लेसमध्ये त्याच्या परवानगीशिवाय सीसीटीव्ही कँमेरा लावू शकत नाही.असे केल्यास आपल्यावर कारवाई देखील होऊ शकते.
सीसीटीव्ही कँमेरा आपण फक्त काँमन पब्लिक प्लेस वर,आँफिस,कार्यालयात गुन्हेगारी प्रकार रोखण्यासाठी आणि सेफ्टीसाठी आपल्या स्वताच्या घरात लावू शकतो.
CCTV कँमेरा लावेल असल्याचा warning board लावणे का गरजेचे असते?
जर आपण आपल्या आँफिस दुकान तसेच माँलमध्ये सीसीटीव्ही कँमेरा फिट केला असेल तर तसा बोर्ड आपण तिथे लावायला हवा तसेच सुचित करायला हवे की इथे सीसीटीव्ही कँमेरा लावलेला आहे.
आपण असे नाही केले तर आयटी अँक्ट 2000 नुसार स्पाय कँमेरा फिट करण्याच्या केसमध्ये आपल्याला जेलात बसण्याची वेळ येऊ शकते.
एखाद्या स्त्री तसेच मुलीच्या पर्सनल रूममध्ये तसेच बाथरूममध्ये,स्नानकक्षात सीसीटीव्ही कँमेरा लावल्यास आपल्यावर काय कारवाई होऊ शकते?
जर आपण एखादी स्त्री तसेच मुलीच्या पर्सनल रूममध्ये तसेच बाथरूममध्ये तिच्या नकळत सीसीटीव्ही कँमेरा लावला तर ipc section 354 c नुसार आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.ज्यात आपणास कमीत कमी एक ते तीन वर्ष तुरूंगात बसावे लागु शकते.
म्हणुन आपण सीसीटीव्ही कँमेराचा वापर क्रिमिनल अँक्टीव्हीला आळा घालण्यासाठी,आपल्या घराच्या आँफिसच्या सिक्युरीटी साठीच वापर करायला हवा.इतर चुकीच्या कार्यासाठी नाही.