CTET result 2022 – CTET परिक्षा म्हणजे काय?तिचे स्वरूप काय असते?

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

CTET परिक्षा म्हणजे काय?तिचे स्वरूप काय असते?

सीटीईटी परिक्षा ही सीबीएसईकडुन वर्षातुन दोनदा घेतली जात असते.ह्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला उमेदवार संपुर्ण देशभरातील केंद्रिय,नवोदय विद्यालयात तसेच आर्मी स्कुलमध्ये शिक्षक ह्या पदावर आपली नियुक्ती होण्यासाठी अर्ज करू शकतात.

ह्या परीक्षेत पेपर १मध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार हा पहिली ते पाचवीपर्यतच्या शाळेत शिक्षक पदावर भरती होता येणार आहे.आणि जे उमेदवार पेपर २ मध्ये उत्तीर्ण होतील त्यांना सहावी ते आठवीच्या वर्गात शिक्षक म्हणुन भरती होता येणार आहे.

सीटीईटीची उत्तरतालिका १ फेब्रुवारी ह्या तारखेला जाहीर करण्यात आली आणि त्यावर आपली हरकत नोंदवायला उमेदवारांना ४ फेब्रुवारीपर्यत मुदत देखील दिली गेली होती.

याबाबत सविस्तर वृत असे आहे की सीटीईटी डिसेंबर परिक्षा २०२१ ते १३ जानेवारी २०२२ ह्या कालावधीच्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

पण अचानक काही टेक्निकल फाँल्ट उदभवल्यामुळे एका शिप्टच्या परीक्षेला पुढे ढकलण्यात आले होते.आणि तीच ढकललेली परिक्षा १७ जानेवारी रोजी घेतली गेली होती.

CTET परीक्षेचा रिझल्ट कधी जाहीर होणार आहे?

सीबीएसई कडुन (central board of secondary education) डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेचा निकाल आज   संध्याकाळी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी घोषित केला जाणार आहे.

CTET परीक्षेचा रिझल्ट उमेदवारांना कुठे पाहता येणार आहे

सीटीईटी परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवार हा निकाल ctet.nic.in ह्या वेबसाईटवर जाऊन बघू शकणार आहे.

CTET परिक्षेचा result उमेदवारांनी कसा पाहायचा?

 सीटीईटी परिक्षेचा निकाल बघण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम

https://ctet.nic.in

ह्या वेबसाईटवर भेट द्यावी.

● त्यानंतर होम पेजवर जाऊन खाली स्क्रोल डाऊन करत खाली यावे मग आपणास CTET December Result 2021 ह्या नावाची एक लिंक दिसुन येईल.आपण त्यावर जाऊन क्लीक करावे.

See also  ICSIL Recruitment 2023 : डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती

● मग उमेदवारासमोर एक पेज ओपन होईल जिथे त्याला त्याचा रोल नंबर,डेट आँफ बर्थ इंटर करून लाँग इन करावे लागणार आहे.

● लाँग इन केल्यावर उमेदवाराला सीटीईटी परिक्षेचा निकाल स्क्रीनवर दिसुन जाईल जो उमेदवार बघू देखील किंवा डाऊनलोड देखील करू शकतात.

भविष्यात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ह्या रिझल्टची किमान एक प्रत काढुन घ्यावी

CTET परिक्षेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र किती कालावधीसाठी वैध ठरणार आहे?

  • सीटीईटी परिक्षेचा निकाल आपल्याला आज ctet.nic.in ह्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे.
    आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या परिक्षेत प्राप्त झालेले प्रमाणपत्र उमेदवाराला संपुर्ण आयुष्यभरासाठी वैध ठरणार आहे.
  • उमेदवारांना सीटीईटी परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता असणार आहे?
  • सीटीईटी परिक्षा ही १५० गुणांसाठी घेतली जाते आणि ह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवाराला सीटीईटीच्या २०२१ च्या परिक्षेत कमीत कमी ६० गुण प्राप्त होणे आवश्यक असणार आहे.
  • आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उदा(एससी,एसटी,ओबीसी) ५५ टक्के गुण प्राप्त करावे लागणार आहेत.
  • सीटेटचे परिक्षेचे मार्कशीट कसे उपलब्ध होणार आहे?
  • सीबीएसईच्या इतर निकालांप्रमाणे सीटीईटी परिक्षेचे मार्कशीट देखील उमेदवारास डिजीलाँकरमध्ये उपलब्ध होणार आहे.यात उमेदवाराचे गुणवत्ता प्रमाणपत्र डिजीलाँकरमध्ये अपलोड करण्यात येईल.
  • आणि उमेदवाराला यात आपल्याला मोबाईलवर सेंड करण्यात आलेल्या लाँग इनची माहीती भरावी लागणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा