क्राँस सेलिंग अणि अप सेलिंग मधील फरक – Difference between cross selling and up selling in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

क्राँस सेलिंग अणि अप सेलिंग मधील फरक – Difference between cross selling and up selling in Marathi

Cross selling -क्राँस

क्राँस सेलिंगला अटँचमेंट सेलिंग असे देखील म्हटले जात असते.

जेव्हा एखादा कस्टमर आपल्याकडे एखादे विशिष्ट प्रोडक्ट वस्तु खरेदी करायला येत असतो.तेव्हा आपण आपल्या कस्टमरला तो आपल्या दुकानातुन खरेदी करत असलेल्या प्रायमरी प्रोडक्टसमवेत त्या प्रोडक्टशी संबंधित अजुन एक प्रोडक्ट सेल करत असतो तेव्हा त्याला क्राँस सेलिंग असे म्हणतात.

उदा, समजा आपले एखादे रेस्टाँरंट आहे अणि आपण आपल्या रेस्टाँरंटमध्ये बर्गर खाण्यासाठी विकत घेण्यासाठी आलेल्या कस्टमरला बर्गरशी संबंधित फ्रेंच प्राईज किंवा कोक अशा इतर वस्तु देखील आँफर करत असतो हा क्राँस सेलिंगचाच प्रकार असतो.

जेव्हा एखादा वाचक एखाद्या ब्लाँगवर एखाद्या विशिष्ट विषयाची माहीती प्राप्त करण्यासाठी जातो तेव्हा मेन आर्टीकल सोबत त्याला त्या आर्टिकलशी संबंधित अजुन एक आर्टिकल ब्लाँगर वाचण्यासाठी सजेस्ट करत असतो हा देखील क्राँस सेलिंगचाच एक प्रकार आहे.याने रीडरची आपल्या ब्लाँगवरील एंगेजमेंट वाढते,बाऊन्सरेट देखील कमी होतो.अणि सगळयात महत्वाचे म्हणजे याने ब्लाँगरच्या इन्कम अणि ट्रँफिक मध्ये देखील वाढ होत असते.

क्राँस सेलिंग केल्यामुळे दुकानदारांची विक्री वाढत असते.एका वस्तुसोबत त्याची दुसरी वस्तु देखील यात विकली जात असते.म्हणजे दुकानदाराची दुप्पट सेलिंग होत असते हा क्राँस सेलिंगचा एक मुख्य फायदा आहे.

क्राँस सेलिंग ही एक सेलिंगची पदधत तसेच स्ट्रँटेजी असते जी प्रत्येक दुकानदार आपला सेल्स वाढावा वस्तुंची विक्री वाढावी म्हणुन उद्योग व्यवसायात वापरत असतो.

क्राँस सेलिंगमुळे आपल्याकडे कमी कस्टमर असले तरी देखील आपली जास्त सेलिंग होत असते.

See also  भारतातील बॅका देखील अमेरिकन‌ बॅका प्रमाणे आर्थिक संकटात आल्या तर भारतातील बॅक ठेवीदारांच्या पैशाचे काय होईल? - bank bankruptcy crisis

क्राँस सेलिंग करताना एक गोष्ट सेलरने नेहमी लक्षात ठेवायला हवी सेलरने अशाच वस्तुंची क्राँस सेलिंग करायला हवी ज्या त्याच्या पहिल्या प्राथमिक प्रोडक्टशी संबंधित निगडीत आहे.

अणि सेलर जे प्राथमिक प्रोडक्ट कस्टमरला सेल करतो आहे त्याची किंमत दुसरया रिलेटेड प्रोडक्टपेक्षा जास्त असायला हवी.अणि पहिल्या प्रोडक्टशी संबंधित जे दुसरे रिलेटेड प्रोडक्ट विक्रेता आपल्या ग्राहकास आँफर करतो आहे त्याची किंमत प्राथमिक प्रोडक्टपेक्षा कमी असायला हवी तरच कस्टमर ते रिलेटेड प्रोडक्ट खरेदी करेल अन्यथा नाही.

उदा.मी दुकानात गेलो आहे दहा रूपयाचा रिचार्ज करायला अणि दुकानदार मला नवनवीन लेटेस्ट मोबाइल दाखवेल तर मी ते खरेदी करणार नाही.

पण याच ठिकाणी जर मी मोबाइल खरेदी करायला गेलो आहे अणि दुकानदार मला एखाद्या रिचार्जची स्कीमची आँफर करतो किंवा मोबाइल सोबत हेडफोन विकत असेल तर मी लगेच खरेदी करून घेईल.

कारण मी असा विचार करेल की मोबाइल वर मी मनोरंजनासाठी प्रवसात वगैरे गाणे तर ऐकणारच आहे म्हणुन मला हेडफोन घ्यावे लागणारच आहे मग मोबाइल सोबत मी हेडफोन सुदधा घेऊनच घेतो.

Up selling -अप सेलिंग

अप सेलिंग म्हणजे कस्टमर आपल्या दुकानात जितक्या किंमतीची वस्तु खरेदी करायला आला आहे त्या किंमतीपेक्षा अधिक किंमतीची वस्तु प्रोडक्ट त्याला आपण सेल करणे.

उदा,समजा माझ्या दुकानात एक महिला कस्टमर हजार रुपयाची साडी विकत घ्यायला आली आहे.

पण मी त्या महिला कस्टमरला तीन हजारची साडी दाखवली सोबत त्या तीन हजार रूपयाच्या साडीचे वैशिष्ट्य काँलिटी कसे हजार रूपयाच्या साडीपेक्षा अधिक आहे हे देखील पटवून दिले अणि त्या महिलेने हजार रूपयाची साडी न घेता तीन हजारची साडी विकत घेतली म्हणजे मी अपसेलिंग केली असे म्हटले जाईल.

तसेच आपण जेव्हा एखाद्या दुकानात 15000 चा मोबाइल विकत घेण्यासाठी जातो तेव्हा दुकानदार आपल्याला त्या पंधरा हजारच्या मोबाइल सोबत दुसरा जास्त नवनवीन फिचर असलेला,मार्केटमध्ये आलेला लेटेस्ट 25 हजाराचा मोबाईल दाखवतो अणि मग जास्त फिचर मिळता आहे म्हणुन आपण देखील 15 हजाराच्या मोबाईलच्या जागी 25 हजाराचा मोबाइल विकत घेतो.हा सुदधा अपसेलिंगचाच एक प्रकार असतो.

See also  युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे काय - भारतातील युनिकॉर्न ची यादी ? What Is A Unicorn Startup - List of Unicorn in India

अपसेलिंगमध्ये आपल्याकडे कमी कस्टमर असले तरी देखील आपला जास्त सेल्स होत असतो.कारण यात वस्तुची किंमत ही जास्त असते म्हणुन कमी सेलमध्ये देखील आपली चांगली कमाई होत असते.

अपसेलिंगचा तोटा

देखील असतो यात आपण कमी किंमतीची वस्तु खरेदी करणारया कस्टमरला जास्त किंमतीची वस्तु विकणार असतो.

अणि जेव्हा आपण 15 हजाराची वस्तु खरेदी करायला आलेल्या कस्टमरला 25 हजाराची वस्तु दाखवतो तिचे वैशिष्ट्य कस्टमरला पटवून देतो.तेव्हा कस्टमरचे आकर्षण 25 हजाराच्या वस्तुकडे अधिक जाते पण ती 25 हजाराची वस्तु खरेदी करण्याचे कस्टमरचे बजेट नसल्या कारणाने तो 15 हजाराची अणि 25 हजाराची दोघे वस्तु खरेदी न करता रिकाम्या हातीच निघून जात असतो.

थोडक्यात क्राँस सेलिंग मध्ये कस्टमर प्राथमिक वस्तुशी संबंधित दुसरी कमी किंमतीची वस्तु खरेदी करण्याचे चान्सेस अधिक असतात.

पण अप सेलिंगमध्ये जास्त किंमतीची वस्तु आवडल्याने अणि ती खरेदी करण्यासाठी बजेटचा इशु आडवा येत असल्याने आपला कस्टमर रिलेटेड प्रोडक्ट तर घेतच नाही सोबत प्राथमिक प्रोडक्ट देखील खरेदी न करताच निघुन जात असतो.

शिवाय अप सेलिंगमध्ये कस्टमरला कन्वहेंस करण्यात दुकानदाराला जास्त एफर्ट घ्यावे लागत असतात.यात कस्टमरला कन्वहेंस करणे क्राँस सेलिंगच्या तुलनेत अधिक अवघड अणि चँलेजिंग ठरत असते.

आशा बाळगतो की आपणास क्राँस सेलिंग अणि अप सेलिंग या दोघांमधील मुख्य फरक दोघांचे फायदे तोटे व्यवस्थित समजले असतील तरी काही शंका असल्यास आपण कमेंट बाँक्समध्ये आपले प्रश्न विचारू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा