ट्रेडिंग अणि इन्वहेस्टटींग मधील फरक- Difference between Trading and investing in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ट्रेडिंग अणि इन्वहेस्टटींग मधील फरक- Difference between Trading and investing in Marathi

मित्रांनो आपल्यातील खुप जणांना असे वाटत असते की ट्रेडिंग अणि इन्वहेस्टिंग या दोघा शब्दांचा अर्थ एकच होतो.

पण असे नाहीये हे दोघेही दोन वेगवेगळे शब्द आहे.अणि यांचा अर्थ देखील विभिन्न असतो.

आजच्या लेखात आपण ट्रेडिंग आणि इन्वहेस्टमेंट मध्ये काय फरक असतो हेच जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून या दोघांमध्ये आपला कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडणार नाही.

ट्रेडिंग म्हणजे काय?Trading meaning in Marathi

● ट्रेडिंग मध्ये आपण काही सेकंद तसेच काही महिन्यांकरीता आपले खरेदी केलेले शेअर्स होल्ड करून ठेवत असतो.

● जे व्यक्ती ट्रेडिंग करत असतात त्यांना ट्रेडर्स म्हणत असतात.

● ट्रेडिंगमध्ये ट्रेडर्स मार्केट अँनलाईज करण्यासाठी टेक्निकल अँनेलिसेसचा वापर करत असतात.कारण शाँर्ट टर्ममध्ये मार्केटमध्ये खूप व्होलाटीलिटी असते.

● यात एक चार्ट दिलेला असतो.ज्याच्या दवारे शेअर्सची किंमत काय असेल व्हाँल्युमचे पँटर्न कसे असेल याचा अंदाजा ट्रेडर्स लावत असतात.अणि स्टाँकचा पुरवठा अणि मागणी लक्षात घेऊन ट्रेडर्सची सायकोलाँजी यात लक्षात घेतली जात असते.

● ट्रेडर हे कुठल्याही कंपनीचे शेअर्स यासाठी खरेदी करत असतात कारण त्यांना त्या कंपनीत लाँग टर्मसाठी पार्टनरशीप तसेच आपला हिस्सा हवा नसतो.तर त्यांना फक्त मार्केटमधुन प्राँफिट कमवून पटकन बाहेर पडायचे असते.

See also  आपणास पडणारी स्वप्रे त्यांचे अर्थ अणि त्यामागचे शुभ अशुभ संकेत - Dreams and their meaning and signs

● ट्रेडरची नजर नेहमी कंपनीच्या स्टाँकच्या किंमतीवर अणि व्हाँल्युमवर असते.

● ट्रेडर हा शाँर्ट टर्ममध्ये मार्केटमधुन प्राँफिट कमवून बाहेर पडत असतो.

ट्रेडिंगचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात?Types of trading in Marathi

ट्रेंडिंगचे काही प्रमुख प्रकार असतात.ज्यात इंट्रा डे ट्रेडिंग,स्विंग ट्रेडिंग,स्काल्प ट्रेडिंग,पोझिशन ट्रेडिंग इत्यादीचा समावेश होत असतो.

1)स्काल्प ट्रेडिंग काय असते?scalp trading meaning in Marathi

स्काल्प ट्रेडिंग हा ट्रेडिंगचाच एक प्रकार आहे ज्यात आपण शेअर्सला काही सेकंद तसेच मिनिटांकरीता होल्ड करून ठेवत असतो.

2) इंट्रा डे ट्रेडिंग म्हणजे काय?intraday trading meaning in Marathi

इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये आपण ज्यादिवशी शेअर्स खरेदी करत असतो त्याच दिवशी विकुन देत असतो म्हणजे ही फक्त एक दिवसाची ट्रेडिंग असते.

3) स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय?swing trading meaning in Marathi

स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण काही दिवस काही आठवडयांसाठी आपले खरेदी केलेले शेअर्स होल्ड करून ठेवत असतो.

4) पोझिशन ट्रेडिंग म्हणजे काय?position trading meaning in Marathi

यात आपण आपले खरेदी केलेले शेअर्स काही महिन्यांकरीता होल्ड करून ठेवत असतो.

याचसोबत ट्रेडिंगचा अजुन एक प्रकार आहे ज्यात ट्रेडर्स आज एखादा शेअर्स खरेदी करत असतात अणि दुसरया दिवशी ते शेअर्स विकुन टाकत असतात.

Investing म्हणजे काय? Investing meaning in Marathi

● जेव्हा आपण एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी दिर्घ काळासाठी पैशांची इन्वहेस्टमेंट करतो शेअर्स खरेदी करतो तेव्हा त्याला इन्वहेस्टिंग किंवा इन्वहेस्टमेंट म्हटले जात असते.

● जो व्यक्ती एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी आपल्या पैशांची गुंतवणुक करतो त्याला इन्वहेस्टर म्हटले जात असते.

● इन्वहेस्टर हे कुठल्याही शेअर्सला एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी होल्ड करून ठेवत असतात.

● इन्हेस्टर हे कुठल्याही कंपनीचे शेअर्स यासाठी खरेदी करत असतात कारण त्यांना त्या कंपनीत पार्टनरशीप तसेच आपला हिस्सा हवा असतो.

● इन्वहेस्टर हे नेहमी लाँग टर्मचा लाँग टर्म प्राँफिटचा कंपाऊंडिंग इंटरेस्टचा विचार करत असतात.हे कुठल्याही कंपनीला अँनलाईज करायला फंडामेंटल अँनेलिसेसचा वापर करत असतात.

See also  लॉजिकल रिजनिंग म्हणजे काय? Logical reasoning in Marathi

● इन्वहेस्टरची नजर नेहमी कंपनीच्या फंडामेंटलवर अधिक असते.

● इन्वहेस्टर्सला शेअर्स होल्डिंगचा परफाँर्मन्स हा रोज चेक करावा लागत नसतो.

● इन्व्हेस्टर हे त्यांचा कमावलेला प्राँफिट तसेच डिव्हीडंट रिइन्व्हेस्ट करत असतात अणि अधिक जास्त फायदा प्राप्त करण्याचा विचार करत असतात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा