EPS 95 पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
आपणा सर्वांना माहीत आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच employee provident fund मधील कर्मचारींना पेंशनची सुविधा प्रदान केली जात असते.
पण आपल्या सर्वांच्या मनात एक शंका असते की समजा एखाद्या पेंशनधारकांना मृत्यु झाला तर त्याची पेंशन त्याच्या कुटुंबियांना किंवा पत्नीला दिले जाते का?या पेंशनचा लाभच घेता येत असतो का?
अणि पेंशन जर पेंशनधारकाच्या कुटुंबियांना दिली जाते तर त्यासाठी त्यांना कोणकोणते कागदपत्र लागत असतात.

असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात आजच्या लेखात आपण ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणुन घेणार आहोत.
ईपीएफओ म्हणजेच employee provident fund organization कडुन खासगी क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचारींना पेंशनची सुविधा दिली जात असते.
ही योजना असते पेंशन योजना कर्मचारी pension scheme 1995 अंतर्गत याचे ७५ लाख पेंशनर लोक लाभार्थी ठरत असतात.याच्या मध्ये ६ करोड भागधारक म्हणजेच शेअर होल्डर देखील समाविष्ट आहेत.
पेंशन धारकाचा मृत्यू झाल्यास पेंशनचा लाभ घेता येत नाही का?
खुप जणांना असे वाटते की पेंशन धारकाचा मृत्यू झाल्यास पेंशनचा लाभ उठवता येत नसतो पण तसे काहीही नाहीये
समजा एखाद्या ईपीएफओ पेंशन धारकाचा मृत्यू झाला तर त्याची पेंशन ही त्याच्या कुटुंबियांना दिली जाते.
नियमानुसार एखाद्या पेंशनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना त्याच्या पेंशनचा लाभ घेता येत असतो.फक्त यासाठी मृत्यू झालेल्या पेंशन धारकाच्या कुटुंबियांना काही महत्वाची कागदपत्रे ईपीएफओ कडे जमा करणे आवश्यक आहे.
पेंशन धारकाचा मृत्यू झाल्यास पेंशनचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
एपईएफओ ने आपल्या टविटर अकाऊंट वरून पेंशन धारकाचा मृत्यू झाल्यास पेंशनचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत हे आपणास कळविले आहे
हे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत-
- सगळ्यात प्रथम आपणास पेंशनरचे डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू दाखला लागणार आहे.
- यानंतर पेंशन लाभार्थींची सर्व बॅक अकाऊंट माहीती लागत असते.यात मूळ रद्द केलेला चेक किंवा लाभार्थ्यांच्या बँक पासबुकची साक्षांकित प्रत देणे गरजेचे असते.
- पेंशन लाभार्थींच्या आधार कार्डची झेरॉक्स
- मुल होण्याच्या स्थितीच्या बाबतीत वयाचा पुरावा age certificate देखील द्यावे लागत असते.
- ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईपीएफओ सबस्क्राईबर असणे अत्यंत आवश्यक असते.
- प्रत्येक ईपीएफओ सबस्क्राईबरच्या म्हणजेच कर्मचारींच्या वेतन खात्यातुन एक ठाराविक रक्कम दर महिन्याला त्यांच्या ईपीएस खात्यात जमा केली जात असते.
- ईपीएफओ अंतर्गत पेंशन प्राप्त करण्यासाठी कर्मचारींना किमान दहा वर्षांची सेवा पूर्ण करणे देखील आवश्यक असते.
- ईपीएफओच्या नियमावलीनुसार,नियोक्त्याचे 8.33 टक्के ईपीएफ योगदान म्हणजे contribution हे त्याच्या ईपीएस खात्याकडे वळवले जात असते.म्हणजे कर्मचारीचे ८.३३ टक्के ईपीएफ योगदानाची रक्कम ही त्याच्या ईपीएस खात्यात टाकली जात असते.
- अणि 12 टक्के (मूळ वेतनाच्या) दराने सदस्याच्या स्वतच्या योगदानासह नियोक्त्याचे केवळ 3.67 टक्के योगदान सदस्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जोडले जाते.