फादर डे साठी कोटस – Father day quotes in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

फादर डे साठी कोटस Father day quotes in Marathi

1)निसर्गाने आपणास दिलेला एक अनमोल ठेवा म्हणजे आपले वडील.

2) जीवणातील सर्वात मोठे सुख जर काही आहे तर ते आहे वडिलांचा हात आपल्या डोक्यावर असणे त्यांची सावली आपल्या जीवणात असणे.

3) वडील हे सोबत असो किंवा नसो त्यांचा आर्शिवाद हा नेहमी आपल्यासोबत असतो.

4) आपल्याला कशापदधतीने जगायचे,कोणाशी कसे वागायचे हे फक्त आपले वडील शिकवत असतात.

5) जगासाठी तुम्ही भलेही एक सर्वसाधारण व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझे हिरो आहात बाबा.

6) जोपर्यत वडिल जिवंत असतात दुनियादारीची समज परिस्थितीचे काटे आपल्यापर्यत कधीच पोहचत नसतात.

7) जगातील एकमेव अशी व्यक्ती जी स्वताच्या आधी नेहमी आपला विचार करते ती व्यक्ती म्हणजे आपले वडील.

8) बापाने कमवलेल्या धन संपत्तीपेक्षा त्याचा आपल्या डोक्यावर असलेला मायेचा हात अधिक महत्वाचा असतो.

9) जो आपल्याला त्याच्या हाताच्या फोडासारखा जपतो स्वताच्या ईच्छा मारून आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करतो असा एकमेव व्यक्ती म्हणजे बाप.

10)स्वभावाने कसाही असो शेवटी कितीही केले बाप हा बापच असतो.

11) बापच असतो त्याच्या मुलाच्या जीवनातील पहिला नायक आणि मुलीचे पहिलेवहिले प्रेम.

12) त्याचे दुख त्याच्या होणारया हाल अपेष्ठा लपवुन आपल्यापासुन लपवून ठेवतो आणि आपल्याला नेहमी सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतो तो व्यक्ती म्हणजे बाप.

13) स्वतः दुःखात ,अडचणीत असताना आपल्याला साथ देते अशी एकमेव व्यक्ती म्हणजे आपले बाबा.

14) बाप हे एक असे अंतकरण असते जे स्वताच्या ईच्छा मारून आपल्या ईच्छा पुर्ण करते.एक असे शरीर आहे जे अमाप कष्ट करते.आणि नेहमी आपल्या मुलाची काळजी करत असते.

15) स्वताच्या खिशात पैसे नसताना देखील आपल्याला काहीही घेऊन देण्यासाठी नाही म्हणत नसतो तो व्यक्ती म्हणजे आपला बाप.

16) जो कधीच स्वताच्या तहान आणि भुकेचा विचार करत नाही दिवसभर कष्ट करतो आणि आपल्याला खाऊ घालतो आणि आपल्याला खाताना बघुन ज्याचे पोट भरते तो व्यक्ती म्हणजे आपला बाप.

See also  जागतिक महिला दिन महत्व अणि इतिहास  | International Women's Day History And Importance In Marathi

17) कोणासाठी बाप हा शब्द म्हणजे नुसता एक दरारा भीती तसेच धाक असतो यापलीकडे जाऊन बघितले तर बाप हा मायेची प्रेमाची हाक असतो.

18) चालताना जेव्हा आपणास ठेच लागते तेव्हा आपण आई ग करत असतो पण जेव्हा त्याच ठिकाणी आपल्याला एखादा साप किंवा वाघ समोर दिसतो तेव्हा आपल्या तोंडातुन अरे बाप रे हाच शब्द निघतो कारण मोठमोठी संकटे पेलतो तोच बाप असतो.

19) आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी शाळा काँलेजची फी भरण्यासाठी लोकाकडुन तसेच बँकेतुन पैसे उधार घेतो.गरजेप्रसंगी लोकासमोर पैशांसाठी हात पाय जोडतो त्यांच्या विनवण्या करतो तो व्यक्ती म्हणजे आपला बाप.

20) वडील हा एक असा व्यक्ती असतो जो आपण काही चुक केली तर आपल्याला रागावतो रडायला लागलो की खाऊ खायला दुकानात घेऊन जातो.आपल्या यशामध्ये सदैव त्याचे यश बघतो.

21) आपल्या मुलाला सर्व सुख सुविधा प्राप्त व्हाव्यात त्याचे अँडमिशन एका चांगल्या शाळा काँलेजात व्हावे यासाठी कर्जाच्या विहीरीत स्वताला ढकलून देतो असा एकमेव व्यक्ती म्हणजे आपला बाप असतो.

22) संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा याचा विचार करते ती आपली आई आणि ते संध्याकाळचे अन्न आपल्याला मिळावे ते अन्न आपल्या पोटात जावे यासाठी दिवसभर कष्ट करतात ते म्हणजे आपले वडील.

23) आपल्या मुलाच्या चेहरयावरचा एक आनंद बघण्याकरीता आपले संपूर्ण आयुष्य वेचतो तो व्यक्ती म्हणजे आपले वडील.

24) स्वता जुना डबडा आणि भंगार मोबाइल वापरतो पण आपल्या मुलाला नेहमी महागातला आणि अँड्राईड मोबाईल खरेदी करून देतो तो एकमेव व्यक्ती म्हणजे आपला बाप.

25) अपयशी झाल्यानंतर देखील आपल्यावर विश्वास ठेवतो आणि पुन्हा एकदा लढ असे म्हणतो तो व्यक्ति म्हणजे आपले वडील.

26) लहानपणी आपल्याला नेहमी सावलीत बसवतो आणि स्वता मात्र कडक उन्हामध्ये जाऊन राबराब राबतो तो एकमेव व्यक्ती म्हणजे आपले बाबा.

See also  लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमधील फरक - Difference between Lok Sabha and Rajya Sabha in Marathi

27) लहानपणी शंभर रूपयाची नोट हरविल्यावर मी रडु नये म्हणुन स्वताच्या खिशातुन शंभर रूपयाची नोट काढुन हे घे तुझे पैसे सापडले बघ असे म्हणत आपली समजुन काढता ते म्हणजे आपले बाबा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा