शेततळे आणि मत्स्यशेती व्यवसाय – Fish farming

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

 

शेततळे व मत्स्यशेती व्यवसाय – Fish farming

मत्स्यशेती शेततळे – पाणीपुरवठ्याची हमी – दर्जेदार शेती उत्पादांनकरता जमीन, मुबलक पाणी, व बियाणे खते या सर्वाचे योग्य नियोजन हे आवश्यक असते॰

निसर्गाच्या लहरीपणामुळे तलावातील पाणीपुरवठाखात्रीशीर होत नाही. तसेच बोअरवेल आणि विहिरीतील पाणीपुरवठा पुरेसा होईल ह्याची खात्री  नसल्याने विविध कारणांचा विचार करून एक हमखास उपाय म्हणून कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना शेततळी उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असते . शेततळ्याच्या उपायामुळे शेतातच फळबाग व इतर बारमाही पिकांना पाणीपुरवठ्याची हमी मिळाल्याने उत्पादनात वाढ दिसून येत आहे  शेततळी तयार करताना प्रथम कृषि खात्यामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ‘सामूहिक शेततळी* ही योजना अनुदानावर राबवण्यात येत साठवलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये म्हणून त्या तलावातून योग्य दर्जाच्या प्लॅस्टिक फिल्मचे अस्थरीकरण करणे, अशा केंद्र शासनाच्या सूचना आहेत.

शेततळ्याचा वापर

  • पाणी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीनेच वापरावे.
  • शेततळ्यांतील पाण्याचा वापर फळबाग, भाजीपाला, फुले व औषधीवनस्पती करावा,
  • शेततळ्याची जागाफळबागा क्षेत्राजवळ असावी, जेणेकरून पाणीपुरवठा कमी कष्टात व कमी खर्चात केला जाईल.

जागेची निवड- शेततळ्

  • कठीण मुरूम, खडक,जिवंत पाण्याचे झरे असणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • अशा जागा योग्य असल्याचा दाखला जवळील तालुक्यातील कृषि विभागांच्या कार्यालयाकडून घ्यावा.
  • शेततळ्यातील पाणीसाठ्याचा विचार करून फळबाग क्षेत्र ठरवण्यात यावे.
  • शेततळे तयार करताना प्रथम खोदाई, कुंपण घालणे य नंतर प्लॅस्टिक अस्तर पसरणे असा क्रम ठेवावा .
  • शेततळ्यातील पाण्याच्या नियोजन ठरवाव
  • ५०० मायक्रॉन जाडीचा  HDPE प्लॅस्टिक कागद शक्यतो वापरावा

शेततळ्याचे -अनुदान

  • पहिला टप्पा-मातीद्वारे काम झाल्यावर
  • दुसरा टप्पा-तारेचे कुंपण, फिल्म लावल्यानंतर
  • तिसरा टप्पा -शेततळ्यात पाणी भरल्यानंतर व योजनेचा बोर्ड लावल्यानंतर या पद्धतीने अनुदान देण्यात येते.
  • या पद्धतीने शेतकऱ्यांना आपल्या शेतात खात्रीशीर शेती उत्पादनासाठीशेततळ्याची उभारणी करून शेतातच ८ ते १० महिने पाणीसाठा करून ठेवता येतो.
  • पाणीसाठ्याचा वापर शेती व्यतिरिक्त एखादा जोडधंदा करून अधिकचे उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करता येतो
See also  जीवनाविषयी सुविचार -101 Life Quotes In Marathi

मत्स्य उत्पादन करता म्हत्वाच्या बाबीं

  • मत्स्यबीज निवडताना शेततळ्यातील प्लॅस्टिक कागद महत्त्वाचा असतो , कागदाला कसलही प्रकारचा उपद्रव होणार नाही ह्यवर लक्ष देणे आवश्यक आहे  व त्यानुसारच मासे निवडावे.
  • जुलौ -ऑगस्टमध्ये पाणीसाठा मिळतो व पाणी वापर एप्रिल-मेमध्ये करावयाचा आहे. याचाच अर्थ १० ते ११ महिन्यांत माशांचे पुरेसे उत्पादन मिळायला हवे. जेणेकरून दोन्ही पिके एकमेकांना पूरक ठरतील.
  • मासे निवडताना तसेच माशांच्या खतांमुळे व खाद्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. याच बाबींचा विचार करून मत्स्यव्यवसाय करताना पुढील मुदे महत्त्वाचे ठरतात.

  • जलदगतीने वाढणारे मासे निवडावेत .
  • मत्स्यशेती करता एकमेकांचे अन्न खाणार नाहीत किंवा करता स्पर्धा करणार नाहीत असे मिश्र जातीचे मासे निवडावेत  
  • सुलभ रित्या मिळणारे मत्स्यबीज उपलब्ध होईल हे पाहवे .
  • बाजारात चांगली मागणी व सर्वोत्तम भाव मिळणारे मासे निवडावेत.
  • निवडलेल्या माशांना दात नसल्याने कागदाला इजा होणार नाही.
  • तळ्यातील शेवाळ खाणारे मासे असावेत.
  • पाण्याच्या सर्व स्तरातील अन्न प्रहण करणारे मत्स्यबीज असावे.
  • मत्स्यबीजामुळे शेततळ्याच्या कागदाला इजा होता कामा नये.
  • या मत्स्योत्पादनाला बाजारपेठ सुलभतेने मिळावी, सर्वोत्तम बाजारभाव मिळावा.

मत्स्यबीज साठवणुकीची पूर्वतयारी :

  • शेततळ्यास पंपाने पाणी घेतले जाते असल्यास शक्‍यतो गावठी मासेकिंवा वनस्पती नसतात.
  • तरीही सुरक्षितता म्हणून नको असलेले मासे व वनस्पती काढून टाकाव्यात.
  • उत्पादनात वाढ करण्याच्या तळ्यातीलपाण्यात माशांच्या वाढीसाठी सर्वोत्कृष्ट गोष्टी कोणत्या आहेत ते पाहू.
  • सामू : ७.- ८.५
  • नायल्रेजन : .५ ते .१० मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम
  • फॉस्फरस : .२ ते .४ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम
  • सेंद्रिय पदार्थ : १.५ ते २.५ मिलिग्रॅम
  • प्राणवायू : चार मिलिग्रॅम प्रति लिटर
  • पारदर्शकता : २५ ते ३0 सेंमी
  • जडता : १५ मिली प्रति लिटर

मत्स्यशेती करता निरुपद्रवी/उपद्रवी मासे निर्मूलन :

  • १० गुंठे शेततळ्यासाठी २०० ते २५० किलो मोहाची पेंड २० दिवसअगोदर वापरावी, यामुळे उपद्रवी माशांचे निर्मूलन होऊन १५ दिवसांनंतर ही पेंड खत म्हणून कामी येते.
  • याऐवजी ब्लीचिंग पावडर (३० क्लोरीन) ३० ते ३५ किलो किंवा १० ते १५ किलो युरिया वापरावा.
  • यामुळे निरुप्रदवी/उपद्रवी माशांचा नायनाट होतो. आठ ते १० दिवसांनी पाणी साठा वाढवल्यास तलाव मत्स्यसंवर्धनासाठी तयार होतो.
See also  केदारनाथ मंदिरां विषयी जाणुन घ्यायची काही महत्त्वाची रहस्ये Important Mysterious Secrets Of Kedarnath Temple

मत्स्यशेती खतव्यवस्थापन :

  • पाण्याची सुपीकता वाढल्यामुळे माशांची वाढ झपाट्याने होते. मत्स्यबीज साठवणुकीपूर्वी करावयाची खताची मात्रा योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे.
  • १० गुंठे शेततळ्यासाठी मत्स्य बीज साठवणुकीच्या आठ ते दहा दिवस अगोदर १५० ते २०० किलो ताजे शेण भिजवून पसरून टाकावे.
  • ताज्या शेणखताऐवजी बायोगॅस स्लरी वापरल्यास अतिशय उपयुक्त ठरते. बायोगॅस स्लरीची मात्रा १० ते १५ किलो प्रति आठवडा द्यावी.
  • कोंबडीखत एक ते दोन किलो वापरावे. हे अतिशय गरम असते. यामुळे नायट्रोजनची मात्रा दोन ते तीन पर्टीनी वाढते.
  • मत्स्यबीज सोडण्याआधी आठ दिवस २० किलो शेणखत, एक किलो युरिया, एक किलो सुपर फॉस्फेट एकत्र करून चांगले भिजवून पसरून टाकल्यास पाण्याची सुपीकता सर्वांत उत्कृष्ट होते व तलावमत्स्यबीज साठवणुकीसाठी तयार होतो,

मत्स्यबीज वाहतूक व साठवणूक :

fish farming

  • मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज तयार केल्यानंतर योग्य वेळी योग्य आकाराचे बीज मत्स्य व्यवसायिकाच्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी वाहतूक तलावात साठविले जाते.
  • माशांच्या पिल्लांमध्ये मत्स्य जिरे (पाच ते सात मिमी) मत्स्यबीज पुरवठा करताना/तयारी करताना वाहतुकीच्या पूर्वी चार तास वाहतूक करावयाचे मत्स्यबीज हापामध्ये संवर्धन केले जाते.
  • यामुळे माशांच्या पोटातील सर्व घाण निघून जाते व वाहतूक करणे शक्‍य होते. बाहतूक करताना मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत आठ ते १० लिटर पाणी घेऊन योग्य नंबरची पिल्ले ठेवली जातात.
  • नंतर पिशवीतप्राणवायू सोडून पिशवी बंद केली जाते. त्यानंतर वाहतूक करणे शक्‍य होते.
  • तलावापाशी गेल्यानंतर सर्व पिशव्या १० ते १५ मिनिटे तलावात ठेवून नंतर पिशवीत तलावाचे पाणी घेऊन दोन्ही पाण्याचे तापमान सारखे करून पिल्ले सावकाश तलावात सोडली जातात.
  • मत्स्यबीज वाहतूक करताना वेळेचे प्रयोजन करणे खूप महत्त्वाचे ठरते. कारण मत्स्यबीज फक्त ३० ते ४० दिवसांच्या वाढीचे असते व वाहतूक करतानाच्या पद्धतीमध्ये मत्स्यबीज थोडक्या वेळेमध्ये जास्तीत जास्त अंतरावर न्यावयाचे असते. त्यामुळे थोड्या पाण्यात/पिशवीत मत्स्यबीज ठेवले जाते व प्रवासात मरतूक होऊ नये, म्हणून त्यात प्राणवायू भरून प्रवासाचा कालावधी सुरक्षित केला जातो.
  •  त्यामुळे शेतकऱ्याने मत्स्यबीज ताब्यात मिळाल्यानंतर त्वरित वाहतूक करून विनाविलंब तलावात साठवणूक करणे अवश्यक आहे.
See also  खलिस्तान चळवळ म्हणजे काय? Khalistan Movement Meaning In Marathi

मत्स्यशेती चे खाद्य व पाणी व्यवस्थापन :

  • मत्स्यबीज साठा करण्यापूर्वी तलावाचे ची तयारी पूर्ण करावी व मगच  मत्स्यबीज  आणावे . 
  • योग्य आकाराचे मत्स्यबीज/ अर्धमुदुकली/मत्स्यबोटुके पिशवीतून आणूनतलावात साठवणक करण्यात येते. त्या पिशवीत पाणी-मासे-प्राणवाय असतो.
  • प्रवासाने पिशवीचे तापमान थोडे जास्तच असते. यासाठी अंदाजे १० मिनिटे पिशवी तोंड उघडून पाण्यात ठेवावी व त्यानंतर तलावातील थोडे पाणी पिशवीत घेऊन नंतर मत्स्यबीज तलावात सोडावे.
  • साठवणुकीपूर्वीच्या खतांच्या वापरामुळे अन्न पुरेसे तयार झालेले असते. परंतु आता हे अन्न कमी पडू नये. म्हणून सुरुवातीला एक किलो मत्स्यबीजासाठी १०० ग्रॅम व चौथ्या आठवड्यात ४०० ग्रॅम खाद्य द्यावे. यामुळे माशांचा आकार बोटुकलीएवढा होईल.
  • तलावाची उत्पादकता चांगली असण्यासाठी तलावातील पाण्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.यासाठी पाण्याची पातळी कमीत कमी २.५ ते ३ मीटर असावी.
  • तलावाच्या खोलीपेक्षा तलावाचा क्षेत्रफळ मोठे असावे. मत्स्यखाद्य वापरताना पाण्याचा रंग गडद हिरवा झाल्यास मात्रा कमी करावी किंवा काही दिवसांकरिता बंद करावी.

मासेमारीबाबत :

  • साधारणपणे १० महिन्यानंतर मासेमारी करून उत्पन्न मिळवणे योग्य
  • मासेमारीसाठी जाळे वापरताना प्लॅस्टिक कागदाला इजा होणार नाही, याची काळजी घेणे.
  • मोठे मासे (अर्धा किलोपेक्षा) काढण्यासाठी योग्य त्या आकाराचे सोडजाळे वापरावे. त्यामुळे लहान मासे जाळ्यात अडकून जखमी होत नाहीत.
  • सोडजाळे वापरताना रबरीट्यूबवरून जाळे सोडल्याने कागदाला किंवा तलावाच्या तळाला धक्का लागत नाही.
  • शेततळ्यातील पाणी प्रामुख्याने एप्रिल-मे-जूनमध्ये वापरल्याने पाण्याची पातळी कमी होते. यासाठी मे शेवटी पाण्याची पातळी १० फुटांपेक्षा कमी झाल्यावर एकाच वेळेस सर्व मासे काढून टाकणे योग्य ठरते.
  • मत्स्यशेती त शेततळ्याच्या पाण्याचा वापर उन्हाळ्यात करणेगरजेचे असते. त्यामुळे तळ्यातील पाणी पातळी १० फुटांपेक्षा कमी झाल्याने तलावातील मासे चोरीला जाण्याची शक्‍यता असते. तसेच
  • मत्स्योत्पादन किती झाले हे व प्रयोग यशस्वि झाला की नाही हे तपासणे आवश्यक असते . तसेच तलाव पुढच्या वर्षीच्या उत्पादनासाठी तयार कार्‍याला सुरवात करावी.  

जैविक खेती

संदर्भ – शेतकरी मासिक

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा