फ्रेंडशिप डे विषयी माहीती, महत्व व इतिहास – Friendship day information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

फ्रेंडशिप डे – Friendship day information in Marathi

मित्राची जागा ही आपल्या प्रत्येकाच्याच जीवणात खुप खास असते.

मित्रच तो एकमेव व्यक्ती असतो जो आपल्याला आपल्या चांगल्या तसेच वाईट काळातही सदैव मदत करत असतो.नेहमी आपली साथ देत असतो.आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतो.

मित्र हा आपल्या जीवणातील असा एक हक्काचा व्यक्ती असतो ज्याच्याजवळ आपण आपल्या मनातील कुठलीही गोष्ट बिनधास्त शेअर करू शकतो.

आपण आपल्या मनातील जी गोष्ट आपल्या भावाला, बहिणीला आईवडिलांना सांगु शकत नाही.

ती सुदधा आपण आपल्या मित्राजवळ न घाबरत कुठलाही संकोच न करता शेअर करत असतो.कारण मैत्रीचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घटट नाते मानले जाते.

कारण मित्र हा आपल्या जीवणातील असा एक व्यक्ती असतो ज्याच्याशी कुठलीही रक्ताचे नाते नसले तरी त्याच्याशी आपले मनाचे एक अतुट नाते जुळलेले असते.

अणि फ्रेंडशीप डे हा पुर्णपणे मैत्रीला समर्पित केला गेलेला दिवस आहे.मित्रप्रेमाचा दिवस आहे.

चला तर मग मित्रांनो याविषयी अधिक सविस्तर माहीती जाणुन घेऊया.

फ्रेंडशीप डे हा कधी साजरा केला जात असतो?

साधारणत फ्रेंडशीप डे हा दरवर्षी आँगस्ट महिन्यात येणारया पहिल्या रविवारच्या दिवशी भारतात साजरा केला जात असतो.

2022 मध्ये आंतरराष्ट्रिय मित्रता दिन कधी साजरा केला जाणार आहे?

2022 मध्ये आंतरराष्ट्रिय मित्रता दिन 30 जुलै रोजी सर्व देशात शनिवारी साजरा केला जाणार आहे.

आंतराष्ट्रिय मैत्री दिन का अणि कसा साजरा केला जात असतो?

आंतराष्ट्रिय मैत्री दिनाच्या दिवशी जगभरातील मित्र मैत्रीण एकमेकांना मैत्री दिनाच्या व्हाँटस अँप फेसबुक सारख्या विविध सामाजिक प्रसारमाध्यमांदवारे शुभेच्छा पाठवत असतात.

See also  उत्तम आरोग्यासाठी आहार घेण्याचे 5 सोप्पे नियम - Tips for Healthy Eating for a Healthy life

तसेच काही मित्र मैत्रीण एकमेकांसोबत वेळ व्यतीत करत असतात एकत्र मिळून पार्टी करत असतात.एकमेकाला फ्रेंडशीप बँड हातात बांधतात.ग्रीटींग कार्ड देतात.

सर्वांच्या मनात असलेली मित्रतेची अतुट भावना अधिक घटट अणि मजबुत व्हावी यासाठी हा मैत्रीचा खास दिवस जगभर साजरा केला जात असतो.

फ्रेंडशिप डे चा इतिहास –

फ्रेंडशिप डे च्या इतिहासाबाबद असे सांगितले जाते की अमेरिकन शासनाकडुन एका निरपराध व्यक्तीचा आँगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारच्या दिवशी मृत्यु झाला होता.

मग जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यु झाला असे त्याच्या मित्राला कळते तेव्हा तो मित्र आपल्या मित्राच्या विरहामध्ये,दुखात स्वता देखील आत्महत्या करून घेतो.

यानंतर दक्षिण आफ्रिकेतील काही लोकांकडुन अमेरिकन सरकारसमोर एक प्रस्ताव मांडण्यात आला ज्यात असे दिले होते की त्या जीव गेलेल्या निर्दोष व्यक्तीचा मृत्यु दिवस हा आंतरराष्ट्रिय मैत्री दिन म्हणुन साजरा करण्यात यावा.

जनतेचा आक्रोश अणि संताप लक्षात घेता अमेरिकन सरकारकडुन 21 वर्षाच्या कालावधीनंतर 1958 रोजी हा प्रस्ताव मंजुर देखील करण्यात आला.

अणि अमेरिकन सरकारकडुन अशी घोषणा करण्यात आली की त्या निरपराध व्यक्तीचा मृत्यु दिवस हा आंतरराष्ट्रिय मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात येईल.

तेव्हापासुन हा दिवस आंतरराष्ट्रिय पातळीवर सगळीकडे एकमेकांना ग्रीटींग कार्ड देऊन मैत्री दिन म्हणुन साजरा केला जाऊ लागला.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा