गुरूपौर्णिमा व्रत पुजा-विधी शुभ-मुहुर्त
मित्रांनो आजच्या लेखात आपण गुरूपौर्णिमेचा शुभ मुहुर्त काय आहे?गुरूपौर्णिमेच्या दिवशी कधी तिथीस आरंभ होणार आहे कधी तिथीची समाप्ती होणार आहे?
गुरूपौर्णिमेच्या दिवशी कशापदधतीने पुजा केली जाते?पुजेसाठी कोणकोणते महत्वाचे साहित्य लागते इत्यादी विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
गुरूपौर्णिमा तिथी आरंभ कधी येईल?तिथी समाप्ती कधी होईल?
13 जुलै रोजी बुधवारी पहाटेच्या वेळी 4 वाजेच्या सुमारास पौर्णिमेच्या तिथीस आरंभ होणार आहे.अणि 14 जुलै रोजी दुपारच्या वेळेला 12 वाजुन सहा मिनिटांनी हा तिथी समाप्त होणार आहे.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी कशा पदधतीने पुजा केली जाते?
गुरू पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वच जण आपल्या गुरूची पुजा करत असतो.आपला गुरू हा कोणालाही मानु शकतो.ज्यावर आपली श्रदधा आहे निष्ठा आहे मग ते आपले आपले आईवडील,शिक्षक,साईबाबा इत्यादी कोणीही असो.
गुरू पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वात प्रथम झोपेतुन उठुन सर्वप्रथम अंघोळ करून घ्यावी.
मग स्वच्छ कपडे परिधान करावे अणि घरातील देवहारयात असलेल्या देवांचा पाय पडावा देवाला फुले वाहावीत.आपल्या अणि घरातील सर्वाच्या कपाळाला तिलक करून घ्यावा.
मग गुरूच्या भेटीस जावे.गुरूंच्या पायावर डोक ठेवून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी सकाळी पुजा करायची असते अणि दिवसभर उपवास देखील करावा लागतो.
गुरूपौर्णिमेसाठी लागणारे महत्वाचे पुजेचे साहित्य –
● सुपारी
● नारळ
● पिवळा कपडा
● फुले
● कापुर
● लवंग
● पुजेचे ताट
● हळद
● कुंकु
● अक्षदा
● अष्टगंध
● अगरबत्ती
● काडीपेटी
● धुप
● धागा
● वाटीत पाणी
● कुठलाही गोड पदार्थ प्रसाद म्हणून
● केळी
● दिवे
गुरूपौर्णिमेच्या दिवशी पुजा कशी करावी?
सगळयात पहिले एक पाट घ्यावा.त्यावर एखादे पिवळे वस्त्र घ्यावे.पुजेसाठी आपल्याकडे फोटो छोटी किंवा मोठी मुर्ती असली तरी चालते.
पाटावर आधी साईबाबांच्या फोटो बसवण्याच्या जागी तांदळाची रास करावी.मग तिथे देवाचा फोटो तसेच मुर्ती ठेवावी.
मग शेजारी गणपतीची तांदळाची रास घालून घ्यावी.अणि मग गणपतीची मुर्ती बसवून घ्यावी.मग गणपतीला हळदी कुंकु वाहुन घ्यावा.धागा बांधायचा.फुले वाहावी.
यानंतर आपल्या गुरूच्या फोटोला अष्टगंध लावायचा.पिवळे फुल वाहावे.गुरूच्या फोटोपुढे धागा ठेवावा.
गुरूच्या फोटो शेजारी नारळ ठेवावे त्याला देखील हळदी कुंकु वाहावा.अक्षता अणि फुले वाहावीत.मग प्रसाद ठेवायचा.केळी किंवा पाच फळे ठेवावीत.
धुप लावून फोटोला ओवाळुन घ्यावे.अगरबत्तीने देखील ओवाळुन घ्यावे.
मग यानंतर आरती करायची असते.सर्वप्रथम गणपतीची आरती करून घ्यावी मग गुरू मानलेल्या देवाच्या फोटोची आरती करावी.आरती झाल्यानंतर देवाला नमस्कार करावा.अणि देवापुढे दिवे लावावेत.
Comments are closed.