आपल्याला रेशन किती मिळते हे कुठे अणि कसे चेक करायचे? – How can I check my ration quota in Maharashtra?

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

आपल्याला रेशन किती मिळते आहे हे कुठे अणि कसे चेक करायचे? – How can I check my ration quota in Maharashtra?

आपल्यातील खुप जण असे असतात ज्यांना आपल्याला दुकानदाराकडुन किती रेशन दिले जाते आहे?रेशन दुकानदाराने आपल्याला नेमकी किती रेशन द्यायला हवे हेच माहीत नसते.

ज्यामुळे कधी कधी आपणास पाहीजे तेवढया रेशनचा लाभ प्राप्त होत नसतो म्हणजेच खुप कमी रेशन मिळत असते.

पण आता आपली ही समस्या कायमची दुर होणार आहे कारण आता आपण फक्त आपला आधार नंबर टाकुन खालील सर्व बाबी चेक करू शकणार आहे.

● आपल्याला किती रेशन मिळते ?

● दुकानदार आपल्याला नेमकी किती रेशन देतो आहे?

● दुकानदाराने आपल्याला एकुण किती रेशन द्यायला हवे?

● आपल्याला दुकानदाराकडून दिल्या जात असलेल्या धान्याची मुळ किंमत प्रमाण किती आहे अणि दुकानदार आपल्याला किती किंमतीत किती प्रमाणात ते धान्य देतो आहे?

चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया फक्त आपला आधार नंबर इंटर करून आपण वरील सर्व माहीती कशापदधतीने मिळवू शकतो.

आपल्याला दुकानदाराकडुन किती रेशन मिळते आहे?अणि
नेमकी आपणास किती रेशन मिळायला हवे आपण हे कुठे अणि कसे चेक करू शकतो?

● आपल्याला नेमकी किती रेशन मिळते आहे?अणि किती रेशन मिळायला हवे हे जाणुन घेण्याकरीता आपणास सर्वप्रथम गुगल स्टोअर मध्ये जावे लागेल अणि तिथे वर सर्च बार मध्ये मेरा रेशन हे अँप सर्च करावा लागेल.

मेरा रेशन हे अँ – https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard&hl=hi&gl=US

 

● मेरा रेशन हे गर्वमेंटचे अँप आहे.मेरा रेशन ह्या अँपला आतापर्यत दहा लाखापेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे.

● मेरा रेशन हे अँप सर्च करून आपणास आपल्या मोबाइल डिव्हाइस मध्ये इंस्टा़ल करून घ्यायचे आहे.

● मेरा रेशन अँप इंस्टाँल करून झाल्यानंतर हे अँप ओपन केल्यावर आपल्याकडे काही परमिशन मागेल ती आपणास अलाऊ करायची आहे.

See also  उमेद अभियान - महिला कर्जाविषयी माहीती- Woman Loan Scheme Information In Marathi

● अँपला परमिशन अलाऊ केल्यानंतर ही अँप ओपन होऊन जाईल अँप ओपन झाल्यावर आपणास ह्या मेरा रेशन अँपचे होमस्क्रीन दिसुन येईल.

● होमस्क्रीनवर आपणास खालीलप्रमाणे विविध आँप्शन दिसुन येतील.

Registration,know your entitlement,my transactions,onorc states,aadhaar seeding,nearby ration shop,eligibility criteria,suggestion feedback,fps feedback,login

वरील सर्व आँप्शनमध्ये आपणास सर्वप्रथम आपल्या रेशन कार्डला आपले आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आधार सिडिंग ह्या आँप्शनवर क्लिक करायचे आहे.

आधार सिडिंग वर क्लीक केल्यावर आपल्यासमोर दोन पर्याय येतात.

● रेशन कार्ड नंबर

● आधार कार्ड नंबर

वरील दोघे दिलेल्या पर्यायात आपणास दुसरे आँप्शन आधार नंबर हे निवडायचे आहे.

यात आपण आपल्या घरातील कुठल्याही सदस्याचा आधार नंबर टाकला तरी चालेल.आधार नंबर टाकल्यावर खाली दिलेल्या सबमीट बटणवर ओके करायचे आहे.

आपला आधार नंबर टाकुन तो सबमीट केल्यावर आपल्या घरातील कुटुंबातील ज्या सभासदांची नावे रेशन कार्डवर नोंदविलेली आहेत त्या सर्व सभासदांची नावे आपल्यासमोर member names मध्ये दिसुन येतील.

अणि आपल्या घरातील ज्या सभासदांच्या नावापुढे आधार सिडिंग वर yes केलेले आहे त्या सर्व कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक आहे असे आपण गृहित धरावे.

इथे ज्यांचे नाव आधार सिडिंग मध्ये no दाखवत असेल त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक नाहीये अशा व्यक्तींनी आपल्या रेशन दुकानदाराला आधार कार्ड देऊन आपले आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करून घ्यावे.

वर आपल्याला आपला रेशन कार्ड नंबर सुदधा यात दिलेला दिसुन येईल.

दुकानदाराकडुन आपणास किती रेशन मिळते आहे?अणि नेमकी आपणास किती रेशन मिळायला हवे हे जाणुन घेण्याची प्रोसेस –

● दुकानदाराकडुन आपणास किती रेशन मिळते आहे?अणि नेमकी आपणास किती रेशन मिळायला हवे हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला होमस्क्रीनवरील दुसरे आँप्शन know your entitlement यावर क्लीक करावे लागेल.

See also  CTET result 2022 - CTET परिक्षा म्हणजे काय?तिचे स्वरूप काय असते?

● Know your entitlement वर क्लीक केल्यावर आपल्यासमोर दोन आँप्शन येतील. आधार कार्ड नंबर अणि रेशन कार्ड नंबर

● यात आपल्याला आधार नंबर ह्या आँप्शनवर क्लीक करावे लागेल इथे सुदधा आपण कुटुंबातील कुठल्याही एका सभासदाचा आधार नंबर टाकु शकतो.अणि मग खाली दिलेल्या सबमीट बटणवर ओके करायचे आहे.

● आधार नंबर सबमीट केल्यावर आपली सर्व डिटेल ओपन होईल.आपले राज्य कोणते? आपला जिल्हा कोणता?कोणत्या योजनेतुन आपण येथे लाभ घेऊ राहीलो आपला कार्ड नंबर काय आहे सर्व आपणास इथे दिसते.

● खाली आपल्यासमोर commodity,price,allocation,balance हे चार आँप्शन दिसुन येतील.

● कमोडिटी मध्ये आपल्याला ही माहीती दिसेल की आपल्याला कोणते धान्य मिळते कोणत्या योजनेतुन मिळते उदा,गहु,तांदुळ

● दिलेले हे सर्व धान्य आपल्याला किती किंमतीत भेटते आहे हे आपणास प्राईज मध्ये दिसुन येईल.

● Allocation मध्ये आपणास हे कळते की कुठले धान्य आपणास किती प्रमाणात मिळते आहे?

वरील सर्व दिलेले धान्याचे प्रमाण,त्याची किंमत ही आपल्याला दुकानदाराकडून दिल्या जात असलेल्या धान्याच्या किंमतीपेक्षा,प्रमाणापेक्षा आपणास वेगळी दिसुन येत असेल तर आपण त्या दुकानदाराची तक्रार जवळील तहसिल कार्यालयात जाऊन करू शकतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा