31 डिसेंबर कोणत्या देशात कशा पदधतीने साजरा केला जातो? -How The World Celebrates New Year

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

31 डिसेंबर – नवीन वर्ष –How The World Celebrates New Year’s

 काही दिवसांतच जुने वर्ष संपुन नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे.नवीन वर्षाचे स्वागत कशा पदधतीने करायचे याचे सगळीकडे नियोजन केले जात आहे.

आपण प्रत्येकाने स्वताचे काही प्लँन आखुन ठेवलेले आहेत की ह्या वर्षी आपण नवीन वर्षाचे स्वागत कशा पदधतीने करणार आहे.तसेच नवीन वर्षानिमित्त कोणता नवीन संकल्प घेणार आहोत.

तसे पाहायला गेले तर नवीन वर्ष साजरा करण्याची प्रत्येकाची आपापली एक विशिष्ट पदधत असते.प्रत्येक जण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे प्लँन आखत असतो.तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्याची पदधत देखील प्रत्येकाची अलग अलग असते.

कोणी रात्रभर दारू आणि मटणाची पार्टी करून, फुल्ल टल्ली होऊन रात्रभर नवीन वर्षाचे स्वागत करत असते.तर कोणी कुटुंबासोबत हाँटेलात जावून तसेच घरातच गोडधौड जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून घरगुती पदधतीने नववर्ष साजरा करत असते.

याचसोबत काही धार्मिक घरांत सर्व जण मिळुन ह्या दिवशी देवपुजा देखील करत असतात.

अशा पदधतीने प्रत्येक जण आपापल्या पदधतीने नवीन वर्षाचे स्वागत करीत असतो.

ज्या पदधतीने आपल्या भारत देशात लोक विविध पदधतीने नवीन वर्षाचे स्वागत करतात त्याचप्रमाणे इतर देशात देखील काही रूढी,परंपरा,पदधती आहेत ज्यानुसार तेथील लोक नववर्षाचे स्वागत करीत असतात.

आणि ह्या प्रत्येक देशाची न्यु ईयर सेलिब्रेशनची पदधत खुपच वेगळी आणि गंमतशीर सुदधा आहे.

चला तर मग जाणुन घेऊया कोणत्या देशात नववर्षाचे कशापदधतीने स्वागत केले जाते. – New Year Celebration In Different Countries

 

1)डेन्मार्क : Denmark

डेन्मार्क ह्या देशातील नागरीकांनी नवीन वर्ष साजरा करण्याची एक नवीनच अलग आणि विचित्र पदधत शोधुन काढली आहे ती म्हणजे ह्या दिवशी येथील लोक नवीन वर्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी आपल्या घरातील प्लेटस फोडतात.

 

म्हणजेच जिथे जगभरात सर्व जण नवीन वर्ष साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत,मित्र मैत्रीणींसोबत एकत्र जमतात तिथे डेन्मार्क येथील लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपल्या घरातील प्लेटस फोडत असतात.

See also  राईट टू रिपेअर पोर्टल म्हणजे काय?Right to repair portal information in Marathi

 

आणि सगळयात विचित्र बाब ही आहे येथील लोक आपल्या स्वताच्या घरासमोर ह्या फ्लेटस न फोडता आपल्या नातेसंबंधी आणि मित्र मैत्रीणींच्या घरासमोर हा प्लेट फोडायचा उपक्रम राबवला जातो.

 

इथे असे मानले जाते आपण किती फेमस आणि जगप्रसिदध आहोत हे आपल्या घरासमोर फोडल्या जात असलेल्या भांडयांवरून आणि त्यांच्या कर्कश आवाजावरून प्रमाणित होते.

 

2) चीन :China

चीन ह्या देशात सुदधा नवीन वर्षाचे स्वागत मोठया उत्सवात आणि जल्लोषात केले जाते चीनमधील लोक एकदम पारंपारीक पदधतीचा अवलंब करून आपल्या नवीन वर्षाचे स्वागत करीत असतात.

ज्या पदधतीने मोठी माणसे लहान मुलांना खाऊ घेण्यासाठी फटाके घेण्यासाठी सणाला पैसे देतात एकदम त्याचप्रमाणे येथे लहान मंडळींना एखाद्या लिफाफ्यामध्ये टाकुन नववर्षाला पैसे दिले जातात.

याचसोबत चीन येथील लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी फटाके देखील फोडत असतात.

इथल्या लोकांची अशी समज आहे की फटाक्यांच्या आवाजामुळे दृष्ट आत्मा पळुन जात असतात.दृष्ट आत्म्यांचा आपल्यावर प्रभाव पडत नाही.आणि आपले नवीन वर्ष मंगलमय व्यतीत होते.

 

3) रशिया :Russia

रशिया मध्ये सुदधा नवीन वर्षाचे स्वागत मोठया जल्लोषात केले जाते.येथील लोक नवीन वर्षाची सुरूवात दारु पिऊन करीत असतात.दारू शिवाय येथील न्यु इयर पार्टी शक्यच नाही असे देखील म्हटले जाते.

असे सांगितले जाते की रशियात अशी प्रथा आहे नवीन वर्षाचे स्वागत करताना येथील लोक आपली विल एका चिटमध्ये लिहितात.आणि मग नंतर तीच चिट जाळुन टाकता आणि त्याची राख आपल्या दारूच्या ग्लासात ओतत असतात.मग त्यावर बर्फाचा खडा ठेवून त्यात दारू ओततात.आणि फ्रेंड सर्कलसोबत सेलिब्रेशन करत असतात.

 

4) जपान :Japan

जापनीज लोकांची नवीन वर्षाचे स्वागत करण्याची आणि तो साजरा करण्याची आपली एक पारंपारीक पदधत आहे.

जपान मधील जापनीज लोक हे नवीन वर्षाची सुरूवात होण्याच्या आदल्या दिवसाची रात्री ओमिसका म्हणत असतात.

See also  Manifest म्हणजे काय?- Manifest Meaning In Marathi

याचसोबत येथे 31 डिसेंबरला बौदध विहारांमध्ये १०८ वेळेस घंटानाद साजरा केला जात असतो.असे केल्याने आपल्या मनातील १०८ ईच्छा दुर होतील.ज्या आपल्या आयुष्यात निर्माण होत असलेल्या विविध विकारांचे कारण असतात.

हा घंटा नाद ऐकल्यास आपल्या मनात येत असणारे सर्व वाईट विचार निघून जातात असा येथील लोकांचा समज तसेच श्रदधा आहे.

जपान देशातील टोकियो शहरातील झोझोजी बौदध मंदीर ही घंटानाद ऐकण्याची सर्वोतम जागा म्हणुन प्रसिदध आहे.

 

5) थायलंड :Thailand

थायलंडला जगातील एक मोठे आणि खुप फेमस पार्टी डेस्टिनेशन म्हटले जाते.

 

पण येथील लोक पारंपारीक पदधतीने देखील नवीन वर्षाचे स्वागत करताना आपणास दिसुन येतात.

 

असे म्हटले जाते की येथील लोक एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून नवीन वर्षाचे स्वागत करता ज्याला थाई भाषेत सोंगथान असे म्हणतात.

नवीन वर्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री येथील लोक हातात पाण्याने भरलेल्या बादल्या घेऊन रोडवर फिरतात आणि जो दिसेल त्याच्या अंगावर पाणी टाकत असतात.म्हणजेच एक प्रकारची रंगपंचमीच येथेच साजरी केली जाते.

याचसोबत येथील लोक नवीन वर्षानिमित्त नातलगांच्या भेटी गाठी करत असतात.मंदिरात जाऊन आपल्या आयुष्यात सकारात्मकता टिकून राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात.

 

6) फिलीपाईन्स :Philippines

येथील नवीन वर्षाला ठिपके असलेले वस्त्र परीधान करतात.खिशात काँईन देखील ठेवत असतात.

फिलिपाईन्स ह्या देशात गोल आकाराच्या वस्तु समृदधीचे प्रतीक मानले जातात.येथील लोक नवीन वर्षाच्या आदल्या रात्री पेरू,संत्री,अननस इत्यादी गोल आकाराच्या पदार्थांचे सेवण करतात.

 

7) दक्षिण आफ्रिका : South Africa

दक्षिण आफ्रिकेतील लोक नवीन वर्षाच्या एक दिवस आधी संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरातील जुन्या वस्तु जसे की टिव्ही,फर्निचर,कपडे इत्यादी सर्व वस्तु फेकुन देत असतात.

येथील लोक नवीन वर्षाची सुरूवात नवीन वस्तु खरेदी करून करतात.

 

8) स्पेन : Spain

स्पेन देशात नवीन वर्ष सुरू होण्याच्या एक रात्र अगोदर द्राक्षे खाण्याची परंपरा आहे.असे केल्याने नवीन वर्षाचे बारा महिने शुभ जातात असा त्यांचा समज आहे.

See also  KFC म्हणजे काय ? KFC Information In Marathi

9) ब्राझील : Brazil

दृष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी येथील लोक नवीन वर्षाच्या आदल्या रात्री पांढरे वस्त्र परीधान करतात.

यातच ब्राझीलमधील काही लोक नवीन वर्षाच्या पहिल्या आठवडयात समुद्राच्या लाटांमध्ये डुबकी देखील मारत असतात.तसेच फुले अर्पण करीत असतात.

 

10) भारत :Bharat

भारतात देखील नवीन वर्ष खुप धुमधडाक्यात साजरे केले जाते.यादिवशी तरुण वर्ग हाँटेलात जाऊन मेजवानी पार्टी करत असतात.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी केक कापतात तसेच नवीन वर्षानिमित्त संकल्प घेऊन एखादी वाईट सवय कायमची सोडत असतात.नवीन वर्षानिमित्त थोरा मोठयांचे,वाडवडिलांचे आर्शीवाद घेतले जातात.

How The World Celebrates New Year marathi information  अशा पदधतीने प्रत्येक देशात आपापल्या पारंपारीक सांस्कृतिक तसेच धार्मिक पदधतीने विविध रूढी तसेच परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.तसेच नवीन वर्ष साजरे केले जात असते.

 

 

 

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा