दुसर्यांचे व्हाट्सएप स्टेटस – how to download whatsapp status of others Marathi
फेसबुक,ट्विटर ,इंस्टाग्राम किंवा व्हाट्सएप ह्या सर्व सोशल मीडिया ऐप्स मधून आपला वापर सर्वात जास्त व्हाट्सएप वर होत असतो.वापरायला सोपे, फाइल्स, फोटो, व्हिडीओ एकमेकांना तात्काळ पाठवता येतात.
आज इतका उपयोग वाढलाय की सकाळी 6 पासून सर्वांची सुरवात ही व्हाट्सएप पासून होत असेल, गुड मॉर्निंग मेसेज पासून तर वाढदिवस व सणासुदीला शुभेच्छा देणे, ग्राटिंग कार्ड्स पाठवणे करता सर्वात सोपा मार्ग हा व्हाट्सएप.
2017 पासून व्हाट्सएप स्टेटस फिचर आल्यापासून ते सर्व खूप लोकप्रिय झालेच पण व्हाट्सएप ची लोकप्रियता वाढली. व्हाट्सएप स्टेटस चा वापर आता वाढला असला तरी अजून आपण ते डाऊनलोड करू शकतो हे बऱयाच जणांना माहीत नसते.
आपल्याला आपल्या फोन मधील कुणाचेही स्टेटस डाऊनलोड करायचे असतील खाली प्रकारे आपण करू शकता
प्ले स्टोअर मधील काही ऐप्स चा वापर करून स्टेटस आपण डाऊनलोड करू शकता ,पण आपण एक सोपी पद्दत इथे पाहणार आहोत
- सर्वात आधी आपल्या हवे ते स्टेटस पाहा, पूर्ण पाहिल पाहीजे
- नंतर खालील चित्रात दिसते ते गुगल फाईल मॅनेजर ऐप्स उघडा. हे ऐप्स सर्व नवीन मोबाईल मध्ये इन बिल्ट येत असतात
- सेटिंग ऑप्शन क्लिक करावे
- तिथे show hidden files असे ऑप्शन वर क्लिक
- इंटरनल स्टोरेज वर जावे- व्हाट्सअप्प फोल्डर ओपन केलं की -मेडिया फोल्डर ओपन करा- STATUS फोल्डर क्लिक करा
- आपल्याला तिथं सर्व फोटो आणि व्हिडिओ दिसतील तिथून जे हवे ते आपण कॉपी करून हव्या त्या फोल्डर मध्ये।पेस्ट करा
- 24 तासात व्हाट्सएप स्टेटस गायब होत असल्याने आपण हवे असलेले स्टेटस 24 तासात डाऊनलोड करणं आवश्यक असते








