चेहरा प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाण कसे मिळवायचे ?
मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का कुठलेही बायोमेट्रिक डिव्हाईसचा वापर न करता देखील फक्त चेहरा प्रमाणीकरण(face authentication) करून देखील आज आपण आपले जीवन प्रमाणपत्र आपल्या अॅड्राॅईड मोबाईल दवारे घरबसल्या बनवु शकतो.

नसेल माहीत तर काळजी करू नका कारण आजच्या लेखात आपण ह्याच विषयावर सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
चेहरा प्रमाणीकरणादवारे जीवन प्रमाणपत्र बनविण्यासाठी आपल्याकडे सर्वप्रथम एक अॅड्राईड फोन असणे आवश्यक आहे.त्यात इंटरनेटची सुविधा देखील असणे आवश्यक आहे.अणि त्या अॅड्राईड मोबाईलमध्ये 5 एम पी इतका फ्रंट कॅमेरा देखील असायला हवा.
पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे आपला आधार क्रमांक नोंदणीकृत ठेवायचा आहे.म्हणजे आधीपासून आपले आधार कार्ड बनविलेले असणे आवश्यक आहे.
जीवन प्रमाणपत्र बनविण्यासाठी आपणास आपल्या अॅड्राॅईड मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन aadhar face Rd app डाऊनलोड अणि इंस्टाॅल करून घ्यायचे आहे.
- याचसोबत जीवन प्रमाण फेस अॅप्लीकेशन देखील डाऊनलोड अणि इंस्टाॅल करून घ्यायचे आहे.
- हे जीवन प्रमाण फेस अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपणास https://jeevan pramaan.gov.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.
- जीवन प्रमाणपत्राच्या आॅफिशिअल वेबसाईटवर गेल्यावर आपणास वर कोपरयात तीन डॅश दिसुन येतील त्यावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यावर आपल्यासमोर पुढीलप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय येतात.
- Home
- About
- Get certificate
- Locate a centre
- Download
- Circular
- FAQ
- PDA PSA login
- Pensioner login
- या वरील दिलेल्या सर्व पर्यायांमध्ये आपणास download ह्या आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपणास आपला ईमेल आयडी टाकायचा आहे.
- यानंतर खालील दिलेला आपला कॅपच्या कोड जसाच्या तसा इंटर करायचा आहे.
- यानंतर आपल्या टाकलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी पाठविला जाईल.तो ओटीपी आपणास इथे टाकायचा आहे.अणि खालील दिलेल्या सबमिट बटणावर ओके करायचे आहे.
- ओटीपी इंटर केल्यावर तीन पर्याय आपणास दिसून येतात.download for windows/download for mobile phones/Android mobile face app download
- या तिघांमध्ये आपणास तिसरा पर्याय निवडायचा आहे जो आहे Android mobile face app download.
- यानंतर Android mobile face app download वर क्लिक करायचे आहे अणि ओके करायचे आहे.
- यानंतर आपल्या ईमेलवर पुन्हा जायचे तिथे आपणास हे मॅसेज मध्ये अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक पाठवली जाईल.
- या दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपणास हे अॅप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड अणि इंस्टाॅल करून घ्यायचे आहे.
- अॅपलीकेशन इंस्टाॅल करून झाल्यावर आपल्यासमोर जीवन प्रमाणपत्रचे अॅप ओपन होईल.
- काही परमिशन मागितली जाते यात आपणास while using allow करायचे आहे.
- यानंतर आपणास आॅपरेटर प्रमाणीकरण करण्याकरीता आॅपरेटरचा चेहरा स्कॅन करायचा असतो.(पेंशन धारक हा आॅपरेटर देखील असु शकतो)
- आॅपरेटर प्रमाणीकरण करताना आॅपरेटरने पहिले आपले प्रमाणीकरण करायचे आहे मग पेंशनरचे.
- आॅपरेटर प्रमाणीकरण करण्याकरीता आॅपरेटरला त्याचा आधार नंबर/मोबाईल नंबर/ईमेल आयडी टाकायचा आहे.अणि मग सबमिट बटणावर ओके करायचे आहे यानंतर एक ओटीपी आॅपरेटरला मोबाईल नंबर वर पाठविला जातो.
- हा ओटीपी इंटर करायचा आहे.अणि सबमिट बटणावर ओके करायचे आहे यानंतर आॅपरेटरला त्याचे नाव विचारले जाईल.हे नाव टाकायचे आहे अणि आय अॅगरी वर टिक करून खाली दिलेल्या scan बटणावर ओके करायचे आहे.
- यानंतर आपणास आपल्या अॅड्राॅईड मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन aadhar face Rd app डाऊनलोड अणि इंस्टाॅल करून घ्यायचे आहे.
- यानंतर आपणास pensioner authentication प्रमाणीकरण करायचे आहे
- पेंशनरची सर्व विचारण्यात आलेली माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.पेंशनरचा आधार नंबर/पेंशन टाईप/इत्यादी माहीती भरायची आहे
- यानंतर आपल्या अॅड्राॅईड मोबाईलचा फ्रंट कॅमेरा चालु करून पेंशनरचा सेल्फी फोटो काढायचा आहे.अणि तो सबमीट करून द्यायचा आहे.
- यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक मॅसेज पाठविला जातो या मॅसेज मध्ये आपणास जीवनप्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक देखील दिलेली अ