जिमेल -डिलीट झालेले महत्वाचे ईमेल कसे रिकव्हर करावे?- How To Recover Deleted Email In Gmail
आज आपण प्रत्येक जण आपल्या महत्वाच्या कामकाजासाठी जिमेलचा वापर करत असतो.त्यामुळे त्यात आपले रोजचे खुप महत्वाचे डाँक्युमेंट असतात.
तसेच आपण एखाद्या कंपनीत कामाला असल्यास कंपनीचे देखील महत्वाचे ईमेल आपल्याला येत असतात.अशा अनेक महत्वाच्या कामासाठी आपण ईमेलचा वापर करत असतो.
पण एखाद्या वेळी ईमेल चेक असताना एखादा महत्वाचा ईमेल आपल्याकडून चुकुन डिलीट होऊन जात असतो.अशा परिस्थितीत आपण खुप चिंतित होऊन जात असतो.कारण तो आपला खुप महत्वाचा ईमेल असतो.
काय करावे?काय नाही करावे हेच आपल्याला अशा परिस्थितीत उमजत नसते.आपल्यासोबतही असा काही प्रकार घडला असेल तर घाबरून जाऊ नका आज आपण आपल्या जिमेल अकाऊंटमधून डिलीट झालेले महत्वाचे ईमेल कसे रिकव्हर करावे? हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
आपल्या मोबाईलमधील जिमेल अकाऊंटमधून डिलीट झालेले महत्वाचे मेल रिकव्हर कसे करावे?
आपल्या जिमेल अकाऊंट मधून जर आपला एखादा महत्वाचा ईमेल चुकुन आपल्याकडून डिलीट झाला तर आपण पुढील दिलेल्या चरणांचे पालन करून आपला डिलीट झालेला ईमेल पुन्हा प्राप्त करू शकतो.
- आपल्या जिमेल अकाऊंटच्या डाव्या बाजुला कोपरयात आपल्याला असे =तीन डँश दिसुन येत असतात.त्यावर एकदा क्लीक केल्यावर आपल्यासमोर खालीलप्रमाणे काही आँप्शन येत असतात.
All Inboxes
. Primary
Social
Promotion
All Labels :
Starred
- Snooze
- Important
- Sent
- Scheduled
- Outbox
- Draft
- All Email
- Spam
- Bin
- असे वरील दिलेल्या प्रमाणे आपल्यासमोर मल्टीपल आँप्शन येत असतात
- या सर्व दिलेल्या आँप्शनमध्ये आपण सगळयात शेवटी दिलेले आँप्शन Bin वर ओके करावे.
- Bin वर ओके केल्यानंतर आपल्याला आपला डिलीट झालेला जिमेल दिसुन येत असतो.तिथून आपण आपला डिलीट झालेला ईमेल रिकव्हर करू शकतो.यासाठी आपण Bin मध्ये दिसत असलेल्या ईमेलवर एकदा जोरात प्रेस करून ते आँप्शन सिलेक्ट करायचे असते.
- मग आपल्यासमोर उजव्या बाजुला वर कोपरयात तीन डाँट दिसुन येतात.आपण त्यावर क्लीक करावे.
- क्लीक केल्यावर आपल्यासमोर पुढील आँप्शन दिसुन येत असतात.
Move To
Snooze
Change Labels
Mark As Important
Mute
Report Spam
- यापैकी Move To वर ओके करून आपण आपला ईमेल
Primary
Social
Promotion
- वरील दिलेल्या या तिघांपैकी कुठेही एका ठिकाणी आपला Bin Function मधील मेल Move करू शकतो.
- किंवा याचठिकाणी आपण तोच Bin Function मधील मेल आपल्या दुसरया एखाद्या ईमेलवर फाँरवर्ड देखील करू शकतो.त्यासाठी आपल्याला खाली Compose नावाचे एक आँप्शन दिलेले असते.
- त्यावर क्लीक करून आपण आपल्या ज्या ईमेलवर तो मेल सेंड करायचा आहे तो ईमेल आयडी टाकुन त्यावर फाँरवर्ड करू शकतो.
- पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी Bin Function मध्ये जेव्हा आपण इंटर करतो आपल्या डिलीट केलेला ईमेल च्या वर एक सुचना दिलेली असते की त्यात असे दिलेले असते की आपण डिलीट केलेला ईमेल फक्त 30 दिवस Bin Function मध्ये राहील तीस दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाल्यास आपला ईमेल Trash Function मधून देखील Permanently Delete केला जाईल.
- याचसोबत त्याच्याखाली Empty Bin नावाचे एक आँप्शन असते तिथे क्लीक करून आपण आपला ईमेल चुकुनही डिलीट केला तर तो Trash Function मधुनही डिलीट होऊन जात असतो.
Trash Function मधुन डिलीट झालेले ईमेल कसे Recover करावे?
कधी कधी आपल्याकडून मोबाईलमधील महत्वाचे डिलीट झालेले ईमेल Trash Function मधून देखील Permanently Deleted होऊन जात असतात.
किंवा एखादा डिलीट झालेला महत्वाचा मेल आपल्याला महिन्याभरानंतर अचानक काही महत्वाच्या कामाकरिता लागत असतो अशा वेळी आपल्याला तो ईमेल अर्जट हवा असतो अशा वेळी आपण अँडमिन कन्सोलचा वापर करावा.
कारण 30 दिवसांनंतर अँडमिन कन्सोलमधून डिलीट झालेले मँसेज रिस्टोअर करण्यासाठी अँडमिनकडे अजुन 25 दिवसांचा कालावधी असतो.
आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की
Trash मधुन डिलीट केलेला डेटा 25 दिवसांनंतर अँडमीन कन्सोलमधून देखील डिलीट होत असतो.मग तो ईमेल अँडमिनला रिस्टोअर करता येत नसतो
म्हणुन या कालावधीत आपण अँडमिन कन्सोलमधुन डेटा रिकव्हर करण्यासाठी आपण Valut चा Use करू शकतो.किंवा आपण Google Admin Console मधून देखील आपला डेटा पुन्हा Recover करू शकतो.
Delete केलेला Gmail Data Admin Console मधुन कसा Recover करावा?
- सर्वात आधी आपण Google Admin Console मध्ये आपल्या Administrator Account मधून Sigh In करावे.
- मग अँडमिन कन्सोलच्या होम पेजवरून User Function मध्ये जावे.
- User List मधून आपले User Account Find करावे.
- मग User वर पाँईण्ट करून More Option वर क्लीक करावे.
- मग त्यात Restore Data Function मध्ये जावे.
- मग यानंतर मागील 25 दिवसांमधील किती तारखेपासुन किती तारखेपर्यतचा डेटा आपल्याला रिस्टोअर करायचा आहे हे ठरवून ती डेट सिलेक्ट करावी.
- मग यानंतर कोणत्या प्रकारचा डेटा आपल्याला रिस्टोअर करायचा आहे हे देखील सिलेक्ट करावे.
- आणि मग शेवटी Restore बटणवर ओके करावे.
- त्यानंतर आपला जीमेल रिस्टोअर झाला आहे का हे इन्बाँक्स मध्ये जाऊन एकदा कनफर्म करून घ्यावे.
अशा पदधतीने आज आपण मोबाईलमधील जिमेल अकाऊंटमधून डिलीट झालेला डेटा कसा रिकव्हर करावा हे सविस्तरपणे जाणुन घेतले आहे.
[catlist numberposts=10]