विद्राव्य खतांचं शेतीतल महत्व – भाग 08- Importance of Water soluble fertilizer in farming

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

विद्राव्य खतांचं महत्व – Importance of Water soluble fertilizer in farming

गरज पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असते. हवामानातील बदल, जमिनीचा प्रकार, सुपीकता, ओलावा, उपलब्ध अन्नद्रव्ये, पीक संरक्षण व व्यवस्थापन या सर्व बाबींचा पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर परिणाम दिसून येतो.

सतत पिके घेणे, अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड तसेच साधन शेतीपद्धतीमुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होतो. पिकांना त्यांच्या उत्पादकतेवर व वाढीनुसार विविध अन्नद्रव्यांची गरज भासते  व त्यानुसार त्यांचा पुरवठा करणे आवश्यक ठरते.

पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जमिनीतून रासायनिक खते देतो.या पद्धतीमुळे त्यांचा पिकास दीर्घकालीन फायदा होऊन ती हळूहळू उपलब्ध होत असतात.

पद्धतीत पिकांना द्यावयाची वेगवेगळी खतेमोठ्या प्रमाणात पेरणीसोबत देऊ शकतो. मात्र, विपरीत परिस्थितीत ही खते आपण फवारणीद्वारे किंवा ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा देऊ शकतो. या पद्धतीमुळे रासायनिक खतांचा व पाण्याचा कार्यक्षम वापर करून कमीखर्चात अधिक पीक उत्पादन घेणे शकय होते.

दाणेदार आणि द्रव स्वरूपातील रासायनिक खते

१) दाणेदार खते :

दाणेदार खते पिकांना देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदा. बांगडी पद्धत, ओळीतून किंवा फेकूनही दिली जातात.खते दिल्याबरोबर जमिनीमध्ये परपूर ओलावा असणे आवश्यक आहे. जेणेकरून खतांची उपयोगिता व कार्यक्षमता वाढते. या प्रकारच्या खतामधील काही खते पूर्णतः पाण्यात विद्राव्य असतात. उदा.

युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश इत्यादी. अशी खते ठिबक संचाद्रारेदिली जाऊ शकतात. पिकांना खतांची मात्रा माती परीक्षण आधारित अहवालानुसार द्यावीत.

Importance of Water soluble fertilizer in farming
विविध खते किमती

 

 

२) विद्राव्य खते :

  • विद्राव्य खते ही पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात.
  • अशी खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात. सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली वेगवेगळ्या ग्रेडचीखते उपलब्ध आहेत. खते फवारणीद्वारे देत असताना स्टिकर्स वापरणे फायद्याचे असते.
  • ही खते फवारणीमधून देण्यात येणाऱ्या मात्रेला काही मर्यादा आहेत. जमिनीतून देण्यात येणाऱ्या मात्रेएवढी खते तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारणीतून विद्राव्य खते देणे शक्‍य नसते.
  • फवारणीद्वारे दिलेली सर्व अन्नद्रव्ये व घटक पिकांना लवकर उपलब्ध होतात परंतु याद्वारे दिलेल्या खतांचा पिकांना कमी कालावधीसाठी फायदा होतो. परंतु, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीमुळे आपण या खतांचा अचूक व पूरक वापर केल्यास फायदा होतो.
  • पिकांना त्यांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बाजारामध्ये वेगवेगळी खतांची ग्रेड उपलब्ध आहेत.
  • त्या-त्या अवस्थेमध्ये ती ग्रेड फवारल्यास सर्वच पिकांमध्ये खतांवरील खर्च कमी होऊन उत्पादकता वाढ दिसून येईल.
  • पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळी खतांच्या ग्रेडची निवड करून त्यांची पिकांवर फवारणी करावी.
See also  रिफायनरी म्हणजे काय? रिफायनरीचे महत्व काय आहे रिफायनरीचे काम समुद्र किनारीच का केले जाते? - What is Oil refinery project in Konkan coast

विद्राव्य खतांचे महत्व

  1. विद्राव्य खते ही रासायनिक खतांच्या तुलनेत पिकांना लवकर उपलब्ध होतात.
  2. ही रासायनिक खते जमिनीतून देण्यासाठी उशीर होत असल्यास, हीखते फवारणीद्वारे देता येतात.
  3. पिकांचे उत्पादन आणि रासायनिक खताचा वापर यात सांगड घालणे सोपे जाते.
  4. या खतांमुळे जमिनीच्या गुणधर्मावर परिणाम होत नाही.
  5. विद्राव्य खते विभागून देता येतात.
  6. पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेतून निचरून किंवा वायुरूपात वायाजाण्याची शक्‍यता कमी असते.

विद्राव्य खतांची फवारणी कोणत्या परिस्थितीमध्ये करावी?

  • पिकाला जास्त दिवसांपासून जमिनीतून खत देणे शक्य न झाल्यास.
  • जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे रासायनिक खताची मात्रा देण्यासाठी उशीर होत असल्यास ७ भरपूर पाने-फुले असताना आवश्यक त्याप्रमाणात जमिनीमधून खतांचा पुरवठा होत नसल्यास.

चांगल्या विद्राव्य खतांची लक्षणे

  1. या खतांमध्ये असलेले अन्नद्रव्ये पिकांना लवकर उपलब्ध होणारे असले पाहिजे.
  2. ही खते कोणत्याही तापमानात सहज विरघळणारी असावी.
  3. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये वापरताना ड्रिपर व फिल्टर चोक होणारे नसावे.
  4. ही खते एकमेकांशी मिसळता येणारी असावी.
  5. ही खते हाताळण्यासाठी सुलभ व सोपी असावी.
  6. ठिबक मधील वापरण्यात येणाऱ्या पाण्याशी संपर्कता चांगली असावी.पाण्याच्या पी.एच. बरोबर मोठ्या प्रमाणात बदल करणारी नसावी.

खतांच्या फवारणीमधील महत्त्वाचे मुद्दे व फायदे

  1. मिळालेल्या पावसाचा, ओलाव्याचा कार्यक्षमपणे उपयोग करून घेण्यासाठी या खतांचा वापर महत्त्वाचा ठरतो.
  2. जमिनीतून दिलेल्या खतामधील अन्नद्रव्यांची उपयोगिता ही कमी असल्यामुळे ती वाढविण्यासाठी फवारणीद्वारे खते देणे फायद्याचे आहे.
  3. पीक वाढीच्या अवस्थेनुसार व गरजेनुसार विद्राव्य खतांची फवारणी करून पिकांची वाढ व उत्पादनात वाढ करता येते.
  4. विद्राव्य खतामध्ये दोन किंवा तीन अन्नघटक असलेली व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यासारखी, मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेल्या वेगवेगळ्या ग्रेडच्या खतांचा वापर करावा.
  5. विद्राव्य खतांची फवारणी ही कडक व तीव्र उन्हामध्ये करू नये.
  6. फवारणीमुळे पिकामध्ये फळधारणा चांगली होऊन संख्या, वजन,आकार व प्रत यात लक्षणीय वाढ होते.
  7. पिकामध्ये कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास फवारणीच्या सहाय्याने ती ताबडतोब दूर करता येते.
  8. आपत्कालीन परिस्थितीत फवारणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  9. दोन प्रकारची खते एकत्र मिसळताना एकाच पाण्यात एकाच वेळी एकत्र न मिसळता ती वेगवेगळ्या पाण्यात मिसळून त्याची वेगवेगळी फवारणी करावी.
See also  जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस विषयी माहीती - World Day to Combat Desertification and Drought in Marathi

खते मिसळताना पुढील बाबी टाळाव्यात.

  1. कॅल्शियम नायट्रेट हे खत कोणत्याही सल्फेट खतांबरोबर मिसळू नये कारण त्यामुळे पाण्यात न विरघळणारे क्षार तयार होतात. उदा. जिप्सम (कॅल्शियम सल्फेट).
  2. कॅल्शियम नायट्रेट हे कोणत्याही फॉस्फेटयुक्त खतांशी मिसळल्यास त्यापासून न विरघळणारे कॅल्शियम फॉस्फेट तयार होते.
  3. अमोनियम सल्फेट सोबत पोटॅशियम क्लोराइड व पोटॅशियम नायट्रेट सोबत मिसळल्यास त्यापासून न विरघळणारे पोटॅशियम फॉस्फेट तयार होते.
  4. मॅप्नेशियम क्षार हे मोनो किंवा डाय अमोनियम फॉस्फेट बरोबर मिसळल्यास न विरघळणारे मॅप्रेशियम फॉस्फेट तयार होत असते.
  5. फॉस्फरसयुक्‍त खताबरोबर फेरस सल्फेट मिसळल्यास फॉस्फेटचा साठा तयार होऊन तो पिकांना उपलब्ध होत नाही.

ठिबक सिंचन पद्धतीद्वारे विद्राव्य खते दिल्याने होणारे फायदे

  1. पिकांना ओलिताचे पाणी व खते आवश्यकतेनुसार व पाहिजे तेवढ्या प्रमाणात देता येतात.
  2. खते पीक वाढीच्या अवस्थेनुसार व शरीरक्रियाशास्त्रानुसार पिकांना वेळोवेळी देता येतात, खते विभागून दिल्यामुळे जमिनीतून निचऱ्याद्रारे खतातील अन्नद्रव्ये वाहून जात नाही. परिणामी खतांची बचत होते.
  3. खते ही पाण्यातून दिल्यामुळे वेळ, मजूर व कार्यक्षमतेत बचत होते.साहजिकच झाडाभोवती खत देणे, मातीत मिसळणे इ. प्रक्रियांचा खर्च वाचतो.
  4. या पद्धतीत खते ही पिकांच्या मुळाजवळ ओलावा कक्षेत दिली जात असल्यामुळे इतर पद्धतीत अन्नद्रव्ये घेण्यासाठी करावा लागणारा खतांचा पुरवठा काळजीपूर्वक नियंत्रित करता येतो. थोडक्यात खतांमधील मूलद्रव्यांची श्रेणी व त्यांचे प्रमाण पिकांच्या गरजेनुसार बदलता येते.
  5. खते पाण्यातून दिल्यामुळे पिकांच्या मुळांवर इतर पद्धतीत जास्ततीब्रतेमुळे होणारा अनिष्ट परिणाम होत नाही.
  6. हलक्या व कमी खोलीच्या जमिनीत पीक उत्पादनात पाणी व खते यांचा वापर महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत हलक्या जमिनीत फर्टिगेशनमुळे खते व पाण्याचे योग्य नियोजन करून उत्पन्नात वाढ कर्ता येते.
  7. संयुक्‍त व तयार मिश्र द्रावणाचा योग्यप्रमाणात वापर करता येतो
  8. याशिवाय काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा वापर करता येतो.
  9. पिकांचा वरील माग (पाने, फांद्या इ.) कोरडा राहत असल्यामुळे पानांना जास्त तीव्रतेच्या द्रावणामुळे इजा पोहचत नाही.
  10. जमिनीत कडकपणा येत नाही.
  11. आवश्यक तेवढ्या पुरवठ्यामुळे खतांची मात्रा ३० ते ४० टक्क्यापर्यंत वाचवता येते.
  12. पिकांच्या मुळाजवळ खते दिली जात असल्यामुळे इतर मोकळ्या जागी पाणी पोहचत नाही पर्यायाने तणाचा प्रादुर्भाव कमी होतो,त्यामुळे खते व पाण्यासाठी पिकांशी स्पर्धा होत नाही.
See also  युनिसेफ ची कार्य काय असतात ? UNICEF full form in Marathi

पिकांना फर्टीगेशन करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  1. खते पाण्यात पूर्णपणे विरघळली किंवा नाही हे पाहून घ्यावे म्हणजे ड्रीपर चोक होणार नाही.
  2. सल्फेट स्वरूपातील खतांची पाण्यातील मॅग्नेशियम, फॉस्फरस बरोबररासायनिक अभिक्रिया होऊन त्याचा परिणाम ड्रीपर बंद पडण्यातसुद्धा होत असतो.
  3. जमिनीच्या मगदुरानुसार व पिकांच्या प्रकारानुसार खताच्या मात्रेमध्येबदल होत असतो. त्यामुळे पीक वाढीच्या अवस्थांनुसार खतांचावापर करावा.
  4. पिकांना पाणी देताना किंवा खते देताना ठिबक संचाचे प्रेशर हे अतिशय महत्त्वाचे असते.
  5. खते देताना पाण्याचा पी.एच. व क्षारता हे गुणधर्म अतिशय महत्त्वाचेअसल्यामुळे खते पिकांना देताना चांगल्या प्रतीच्या पाण्याबरोबरद्यावी.
  6. खते देताना ती बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्यासोबत मिसळूनदेऊ नये.
  7. खते दिल्यानंतर जास्त पाणी देणे टाळावे. त्यामुळे खते मुळाच्या कक्षेतून बाहेर जाणार नाही.
  8. ट्रिपरमधून पडणारे पाणी किंवा त्याद्वारे दिली जाणारी खते ही पिकांच्या

ऊस पिकातील खते

 

संदर्भ – शेतकरी मासिक

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा