चीनला मागे टाकत भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश – India World populous country in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

चीनला मागे टाकत भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश India World populous country in Marathi

नुकतेच आपल्या भारत देशाने लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन ह्या देशाला मागे टाकले आहे.

संयुक्त राष्ट्राने बुधवारी लोकसंख्येच्या बाबतीत एक आकडेवारी घोषित केली आहे त्यात असे दिले आहे की आपल्या भारत देशाची लोकसंख्या १.४२८ अब्ज इतकी झाली आहे.

अणि सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनची लोकसंख्येची आकडेवारी भारताच्या आकडेवारी पेक्षा कमी आहे.

चीनची लोकसंख्या ह्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार १.४२५ अब्ज इतकी असल्याचे युएनने प्रकाशित केलेल्या जागतिक लोकसंख्या अहवालात सांगितले जात आहे.

युएन एफ पीए कडुन नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे ज्यात असे दिले आहे की आपल्या भारत देशात ६५ पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांची लोकसंख्या फक्त सात टक्के इतकी आहे.अठरा टक्के इतकी लोकसंख्या ही १० ते १९ वर्षाच्या व्यक्तींची आहे.

भारत देशातील २५ टक्के लोकसंख्या ही ०-१४ ह्या वयोगटातील व्यक्तींची आहे.२६ टक्के इतकी लोकसंख्या ही वयोवर्ष दहा ते चोवीस ह्या वयोगटातील व्यक्तींची असल्याचे हया रिपोर्ट नुसार समोर आले आहे.

सर्वाधिक लोकसंख्या ही ६८ टक्के आहे ही १५ ते ६४ हया वयोगटातील व्यक्तींची असल्याचे निदर्शनास आले आहे.म्हणजेच भारतात तरुण वर्गाची संख्या अधिक आहे हे यावरून समोर आले आहे.

आपला भारत देश हा आशियातील सर्वात मोठी तीसरी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणुन ओळखला जातो.

नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार आता आपल्या भारत देशाची लोकसंख्या अमेरिका आफ्रिका युरोप इत्यादी अमेरिकन लोकसंख्येच्या तुलनेत अधिक झाली आहे.

आपल्या भारत देशातील लोकसंख्या २०५० पर्यंत १.६६७ अब्ज इतकी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.भारतापाठोपाठ चीन ह्या देशाची लोकसंख्या १.३१६ इतकी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

See also  सायकलिंग करने के फायदे - Benefits of cycling in Hindi

आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत आपला भारत देश पहिल्या क्रमांकावर असणार आहे अणि चीन ह्या यादीत भारताच्या खाली दितीय क्रमांकावर फेकला गेला असल्याचे दिसून येणार आहे.

भारत येत्या नवीन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाईल जागतिक तज्ञांनी वर्षाच्या सुरुवातीलाच व्यक्त केला होता तज्ञांनी व्यक्त केलेला हा अंदाज आता खरा ठरलेला आहे.

1950 नंतर पहिल्यांदाच भारताला चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकण्यात यश प्राप्त झाले आहे.मागील वर्षी एक अहवाल सादर करण्यात आला होता त्यात असे दिले होते की मागील पाच ते सहा दशकांच्या काळात चीनची लोकसंख्या कमी झाली आहे.अणि चीन देशातील जन्मदर देखील कमी झाला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा