आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?International Museum day 2023 in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?international museum day 2023 in Marathi

दरवर्षी १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जातो.

हा दिवस दरवर्षी साजरा केला जावा अशी कल्पणा सर्वप्रथम इंटरनॅशनल काऊन्सिल आॅफ म्युझियमच्या मनात आली होती त्यानंतर १९७७ मध्ये हा दिवस साजरा करावयास आरंभ करण्यात आला होता.

संग्रहालयांचे महत्व वैशिष्ट्य ओळखुन लोकांना आपला इतिहास प्राचीन समृद्ध परंपरा कला संस्कृती जाणुन घेता यावी म्हणून १८ मे १९८३ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले होते.

तेव्हापासून दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस म्हणून साजरा केला जातो आहे.हा दिवस भारत देशातच नव्हे तर जगभरातील विविध देशांत मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो.

म्युझियम म्हणजे काय?

म्युझियम यालाच आपण मराठीत संग्रहालय असे म्हणतो.संग्रहालय ही एक अशी विशिष्ट जागा असते जिथे हजारो वर्षे पुर्वीच्या वस्तु,अवशेष कलाकृती जतन करून ठेवल्या जात असतात.

ह्या जतन केलेल्या वस्तुंमागे काहीतरी जुना पुराणा ऐतिहासिक वारसा दडलेला असतो.पिढयान पिढयाची संस्कृती परंपरा दडलेली असते.

हा जुन्या ऐतिहासिक वस्तुंचा कलाकृतींचा,संस्कृती परंपरेचा वारसा जपुन ठेवण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्या नव्या पिढीला जुन्या पिढीची परंपरा संस्कृतीची आठवण राहावी.त्यांनी आपली संस्कृती परंपरा ऐतिहासिक वारसा विसरू नये.आपल्या संस्कृतीचे जतन केले जावे हा आहे.

International Museum day 2023 in Marathi – Rashtrapati Bhavan Museum Complex is

आपल्या पिढयान पिढ्याच्या जुन्या संस्कृती,परंपरांशी ऐतिहासिक वारसाशी,आपल्या येणारया नव्या पिढीला जोडून ठेवणे हा एकमेव मुख्य हेतु हा दिवस साजरा करण्या मागचा आहे.

आज आपल्या भारत देशातील कानाकोपऱ्यात विविध ठिकाणी म्युझियम असल्याचे आपणास दिसून येते.हया म्युझियम मध्ये आपणास आपल्या जुन्या संस्कृती परंपरांची ऐतिहासिक वारसाची आठवण करून देणारया वस्तु कलाकृती पाहायला मिळतात.हेच संग्रहालयांचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण असे महत्व भुमिका पटवून देण्यासाठी दरवर्षी जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जातो.

See also  डेटा लीक होणे म्हणजे काय?डेटा लीक झाल्यावर काय होते? - What is Data Breach ?

भारत देशातच नव्हे तर जगभरातील विविध देशांत आज जागोजागी मोठमोठी म्युझियम उभारण्यात आलेली आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा