तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप
Join Group
ITBP Recruitment 2023 In Marathi : इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल) आणि चायना बोर्डरवरील इतर पदांसाठी भरती होणार आहे . ITBP भर्ती 2023 अंतर्गत ९४०० हून अधिक रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अपेक्षित आहे. अर्जदारांनी ITBP भर्ती 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीबद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत.
सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP)च्या सात नवीन बटालियन तयार करण्यास आणि 1 सेक्टर मुख्यालयाची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. भारत-चीन सीमेचे रक्षण करणे ही आयटीबीपीची प्रमुख भूमिका आहे. यासाठी सध्या आयटीबीपीच्या 176 बीओपी आहेत.
ITBP Recruitment 2023 In Marathi
बटालियन्स आणि सेक्टर हेडक्वार्टर्सचे काम 2025-26 पर्यंत पूर्ण होईल. ज्यासाठी एकूण 9400 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये कार्यालय आणि निवासी इमारतींचे बांधकाम, भूसंपादन, शस्त्रे आणि दारूगोळा यासाठी 1808 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासोबतच पगार, रेशन आदींवर दरवर्षी 963 कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज आहे.