जगदीप धनखर यांच्याविषयी माहीती- Jagdeep Dhankhar Information In Marathi
जगदीप धनखर हे भारताच्या 2022 मधील उपराष्ट्रपति पदाचे उमेदवार आहेत.
जगदीप धनखर हे भारतातील एन डी ए पक्षाकडुन उपराष्टपती पदासाठी उमेदवारी करणार आहे अशी घोषणा भाजपचे प्रमुख जे पी नडडा यांच्याकडून काल 16 जुलै रोजी करण्यात आली.
जे पी नडडा यांनी काल घेतल्या गेलेल्या एका पत्रकार परिषदेत असे सांगितले आहे की
संपुर्णरीत्या विचारविनिमय करूनच आम्ही जगदीप धनखर यांना भाजप तसेच एनडी ए पक्षाचे उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणुन निवडत आहे.
जगदीप धनखर कोण आहेत?
- जगदीप धनखर हे एक प्रसिदध वकिल तसेच भाजप पक्षाचे राजकीय कार्यकर्ता आहे.याचसोबत ते पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल देखील आहेत.
- 30 जुलै 2019 रोजी त्यांनी ह्या पदाचा कार्यभार सांभाळला होता.भारताचे राष्टपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची ह्या पदावर नियुक्ती केली होती.
जगदीप धनखर यांचा जन्म –
जगदीप धनखर यांचा जन्म 18 मे 1951 राजस्थान मधील गावकिथाना नावाच्या झुंझुनु जिल्हयातील गावी झाला होता.
जगदीप धनखर यांचे कुटुंब –
- जगदीप धनखर यांच्या वडिलांचे नाव गोकूलचंद धनखर जे एक शेतकरी आहेत.अणि
- आईचे नाव केसरीदेवी असे आहे.
- त्यांच्या मोठया भावाचे नाव कुलदीप धनखर असे आहे
- .कुलदीप धनखर यांच्या पत्नीचे नाव सुचेता असे आहे.
- धाकटया भाऊचे नाव रणदिप धनखर आहे.
जगदीप धनखर यांचे शालेय शिक्षण:
- जगदीप धनखर यांचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण किठाणा ह्या गावात झाले.
- येथील एका शासकीय प्राथमिक शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पार पडले.
- इयत्ता 6 वी मध्ये असताना जगदीप धनखर यांनी 4 ते 5 किलोमीटर इतक्या दुर अंतरावर असलेल्या घरधन येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला जगदीप धनखर हे नेहमी आपल्या गावातील इतर विद्यार्थ्यांसोबत पायी प्रवास करून शाळेत जायचे.
- 1962 मध्ये,त्यांनी आपले सैनिक स्कूल शिक्षण यशस्वीरीत्या उत्तीर्ण केले.चित्तौडगड प्रवेश परीक्षा पूर्ण करून गुणवत्ता शिष्यवृत्तीवर त्या शाळेत इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेतला.
जगदीप धनखर यांचे महाविद्यालयीन शिक्षण –
- जगदीप धनखर यांचे महाविद्यालयीन शिक्षण राजस्थान विदयापीठाअंतर्गत येणारया जयपुर येथील महाराजा काँलेज येथे बी एस्सी आँनर्स भौतिकशास्त्र हा विषय घेऊन तिथे प्रवेश घेतला अणि आपली पदवी पुर्ण केली.
- जगदीप धनखर यांचा मोठा भाऊ कुलदीप धनखर यांनी देखील ह्याच शाळेत प्रवेश घेतला होता.
- केंब्रिज विद्यापीठाकडुन आयोजित करण्यात आलेल्या आय एस सी म्हणजेच इंडियन स्कूल सर्टिफिकेट परीक्षा दिल्यानंतर ते चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून उत्तीर्ण झाले होते.
वकिलीचे शिक्षण,करिअर –
- जगदीप धनखर यांनी राजस्थान येथील विद्यापीठातच एल एल बी चे शिक्षण पुर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला होता.ही वकिलीची परीक्षा 1978 ते 1979 मध्ये त्यांनी उत्तीर्ण केली.
- अणि मग् 10-11-1979 मध्ये त्यांची राजस्थान येथील बार काऊंसिलमध्ये वकिल म्हणुन नावनोंदणी केली गेली.
- याचसोबत जगदीश धनखर यांची 27-3-1990 मध्ये राजस्थान येथील उच्च न्यायालयाकडून त्यांची वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली होती.
- आणि 30 जुलै 2019 रोजी राज्यपाल पदाची शपथ घेईपर्यंत ते राज्याचे सर्वात ज्येष्ठ-सर्वाधिक पदसिद्ध ज्येष्ठ वकील बनलेले होते.
जगदीप धनखर यांच्याबददल थोडक्यात जाणुन घ्यायची इतर महत्वाची माहीती –
● 1988 मध्ये राजस्थान बार काऊंसिलचे सभासद म्हणुन निवडुन आले.
● 1989 मध्ये झुंझुनु येथील मतदारसंघातुन नवव्या लोकसभेसाठी निवडुन आले.
● 1990 मध्ये केंद्रीय मंत्री होते तसेच संसदीय समितीचे अध्यक्ष होते.
● 1987 मध्ये असोसिएशनचे पदाधिकारी म्हणुन निवड झाली होती.राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशन,जयपूरचे सर्वात लहान वयात निवडून आलेले उमेदवार.
● जगदीप धनखर यांची 1993-1998 मध्ये अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून राजस्थान विधानसभेमधुन निवड झाली होती.
● याचसोबत लोकसभेमध्ये आणि राजस्थान विधानसभेत ते महत्त्वाच्या समित्यांचा भाग देखील होते.जगदीप धनखर हे केंद्रीय मंत्री असताना युरोपियन संसदेतील संसदीय गटाचे उपनेते म्हणून शिष्टमंडळाचा एक घटक होते.
● जगदीप धनखर यांनी राजस्थान मधल्या जाट समाजाला तसेच इतर मागास वर्गीय समाजाला ओबीसीचा दर्जा प्राप्त व्हावा सहभाग घेतला होता.
ऋषि सुनक यांचा जीवन परिचय – Biography of Rishi Sunak in Marathi