पत्रकार दिन महत्व अणि इतिहास – Journalist day history and importance in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

पत्रकार दिन महत्व अणि इतिहास – Journalist day history and importance in Marathi

 

पत्रकार दिन कधी साजरा केला जात असतो?

दरवर्षी ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्रकार दिन साजरा केला जात असतो.

दरवर्षी पत्रकार दिन हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात अणि आनंदात साजरा केला जातो.

बाळशास्त्री जांभेकर कोण आहेत?

बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतुन वृतपत्रात लेखन करणारे आद्य पत्रकार तसेच मराठी पत्रकारीतेचे जनक आहेत.बाळशास्त्री जांभेकर यांचे टोपननाव आचार्य असे होते.

बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कधी अणि कोठे झाला होता?

बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी पोंभुरले महाराष्ट्र येथे झाला होता.

बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू कधी अणि कोठे झाला होता?

बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू १८ मे १८४६ रोजी वयाच्या ३४ व्या वर्षी झाला होता.

पत्रकार दिन इतिहास –

मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र म्हणुन ओळखले जाणारे दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनीच ६ जानेवारी १८३२ रोजी चालू केले होते.

दर्पण ह्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारीतेची पहिले मुहुर्तमेढ रोवली.

भाऊ महाजन यांच्या साहाय्याने बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते.ह्या वृत्तपत्राचा प्रथम अंक हा ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केला गेला होता.

महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या पर्यंत आपले विचार,आपले मत आपल्या भावना पोहचवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी मातृभाषा मराठीतुन हे वृत्तपत्र सुरू केले होते.

See also  नाटु नाटु गाण्याला मिळाला ऑस्कर पुरस्कार भारताने रचला इतिहास - NatuNatu wins best original song Oscars

१८३२ मध्ये सुरू करण्यात आलेले हे वृत्तपत्र १८४० पर्यंत चालवण्यात आले होते.इंग्रजी सत्ताधारींना स्थानिक लोकांच्या अडीअडचणी समस्या समजाव्या याकरीता दर्पण ह्या वृत्तपत्राचा एक अंक हा इंग्रजी भाषेत काढण्यात आला होता.

त्या काळात वृत्तपत्र ही संकल्पना पाहिजे तशी रूजलेली नव्हती म्हणून म्हणून दर्पण ह्या वृत्तपत्राला पाहिजे तसे वर्गणीदार प्राप्त झाले नाही.पण जसजशी ही संकल्पना रूजत गेली त्यामधील विचार रूजत गेले.तसतसा ह्या वृत्तपत्राला जनतेकडुन अधिक प्रतिसाद प्राप्त होत गेला.

सगळीकडे इंग्रजी वृत्तपत्राचा बोलबाला चालत असलेल्या ब्रिटिश काळात मराठी वृत्तपत्र सुरू करणे अणि त्यास मराठी वाचक प्राप्त करणे हे खुप अवघड होते तरी देखील बाळकृष्ण जांभेकर यांनी कुठलाही नफा प्राप्त होत नसताना प्रस़ंगी पदरमोड करुन दर्पण हे वृत्तपत्र आठ वर्षे चालवले.

पत्रकार कोण असतो?पत्रकारांचे महत्व काय आहे?

जगभरातील महत्वाच्या ताज्या बातम्या तसेच चालु घडामोडी लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम पत्रकार करत असतो.

पत्रकार हा एक असा एकमेव व्यक्ती असतो जो जनतेचे प्रश्न समाजासमोर निर्भिडपणे तसेच कुठलाही पक्षपात न करता मांडत असतो.

पत्रकार हा समाजाचे सर्वसामान्य जनतेचे ज्वलंत प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत असतो.अणि सर्वसामान्य गरीब दीन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत असतो.

म्हणुन पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे देखील म्हटले जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा