कृष्ण जन्माष्टमी तसेच श्रीकृष्ण जयंती निबंध – Krishna Janmashtami Essay In Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

कृष्ण जन्माष्टमी तसेच श्रीकृष्ण जयंती निबंध – Krishna Janmashtami Essay In Marathi

जन्माष्टमी हा हिंदु धर्मात साजरा केला जाणारा एक अत्यंत प्रमुख सण तसेच उत्सव आहे.यालाच आपण कृष्ण जन्माष्टमी असे देखील म्हणत असतो.

कारण याच दिवशी श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंस याच्या बंदीशाळेमध्ये देवकी अणि तिचा पती कैद असताना तिच्या गर्भात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.म्हणुन जगभरात या दिवशी कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.

कृष्ण जन्माष्टमी हा एक असा सण तसेच उत्सव आहे जो फक्त महाराष्टातच नव्हे तर पुर्ण भारतात मोठया आनंदाने अणि उत्सवाने साजरा केला जात असतो.
गोकुळ,मथुरा,वृदांवन,दवारका येथे विशेषकरून मोठया जल्लोषात हा दिवस साजरा केला जात असतो.

2022 मध्ये कृष्ण जन्माष्टमी हा उत्सव 18 आँगस्ट रोजी साजरा करावयास सुरू होईल.अणि 19 आँगस्ट रोजी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी नंतरच्या दुसरया दिवशी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर हा उत्सव संपणार आहे.या दिवशी श्रीकृष्णाची मुर्ती असलेल्या सर्व मंदिरांमध्ये साजसजावट केली जाते.

या पर्वाच्या कालावधीमध्ये हिंदु धर्मातील काही व्यक्ती पुर्ण दिवस व्रत उपवास देखील ठेवत असतात.मंदिरांमध्ये श्रीकृष्णाची आरती तसेच भजनाचा कार्यक्रम ठेवला जातो.जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजेस कृष्ण जन्म साजरा करावयास आरंभ होत असतो.कृष्णाला अंघोळ घालून पाळण्यात बसवून झुलवले जाते.

या दिवशी मंदिरांमध्ये लाडुचा प्रसाद बनवण्यात येतो अणि कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी श्रीकृष्णाला प्रसाद नैवेद्य दाखवून झाल्यानंतर इतर प्रसाद मंदिरात येणारया भक्तांना,भाविकांना वाटुन दिला जात असतो.

श्रीकृष्णाच्या रासलीलांचे सादरीकरण करण्यात येते.पालखीत श्रीकृष्णाची मुर्ती ठेवून मिरवणुक काढण्यात येते.सगळीकडे कृष्ण कृष्ण नामाचा जयजयकार होत असतो.सर्व वातावरण या दिवशी भक्तीमय झालेले असते.

जो व्यक्ती भगवान श्रीकृष्ण यांच्या विचारांना आत्मसात करतो.त्यांच्या दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालतो.त्यांच्या नीती मुल्यांचे पालन करतो, मानवजातीच्या विकासासाठी प्रयत्न करतो,लोकांना चांगला संदेश देतो त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण यांची विशेष कृपा दृष्टी असते.

See also  अल जवाहिरी कोण होता?who is al jawahiri in Marathi

श्रीकृष्णाला भगवान श्री विष्णु यांचा आठवा अवतार मानले जाते.कंस याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने हा अवतार धारण केला होता.

श्रीकृष्णाला जन्म जरी देवकीने दिलेला असला तरी त्यांचे संगोपण हे यशोदा करत असते.

श्रीकृष्ण जयंती,जन्माष्टमी हा दिवस वाईटावर चांगल्याचा,अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतिक मानला जातो.

दहीहंडी,गोपाळकाला महोत्सव इतिहास अणि महत्व –

दहीहंडी,गोपाळकाला महोत्सव इतिहास अणि महत्व -

मथुरा मधील विविध क्षेत्रात तसेच संपुर्ण भारतात यादिवशी विभिन्न ठिकाणी दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो.

दही हंडी फोडण्यासाठी प्रतियोगिता ठेवली जात असते.यात काही विशिष्ट अंतराच्या उंचीवर एका हंडीमध्ये माखनने दही दुधाने भरलेली हंडी लटकवण्यात येते.अणि जो गट ही दहीहंडी फोडतो त्याला हे विशेष पारितोषिक दिले जात असते.

जो गट दही हंडी फोडतो त्याला पारितोषिक बक्षिस दिले जात असते.गोविंदा आला रे आला असा जयघोष करत हा दही हंडी फोडण्याचा उत्सव साजरा केला जात असतो.

 

15 आँगस्ट निबंध अणि भाषण – Independence Day Essay And Speech In Marathi

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा