मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच लाॅच करणार आहे फिल्म बाजार पोर्टल
नुकतीच एक ताजी बातमी समोर आली आहे मराठी चित्रपट मालिका तसेच वेबसीरीज यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच एक आॅनलाईन पोर्टल लाॅच करण्यात येत आहे.हया पोर्टलचे नाव फिल्म बाजार पोर्टल असे आहे.
असे देखील सांगितले जाते आहे की महाराष्ट्राचे पर्यटन अणि सांस्कृतिक मंत्रालय देखील ह्या आॅनलाईन पोर्टलला लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे.
मराठी चित्रपट,मालिका,वेबसीरीज डेली सोप यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमोट करण्यासाठी हे आॅनलाईन पोर्टल लवकरच लाॅच करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते महेश कोठारे,स्वप्नील जोशी तसेच फिल्म युनियन प्रमुख संदीप घुगे यांनी मराठी चित्रपट मालिका वेबसीरीज यांच्या विकासाला अधिक चालना अणि गती प्राप्त व्हावी यासाठी एका पत्रकार परिषदेत ह्या पोर्टलला लाॅच करत असल्याची घोषणा केली आहे.
या पोर्टलला लाॅच करण्यासाठी एक समिती देखील स्थापण् करण्यात आली आहे असे सांगितले जाते आहे या समितीत दादासाहेब चित्र फाळके चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक मुंबई अध्यक्ष हे देखील असणार आहे याचसोबत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेता तसेच दिग्दर्शक महेश कोठारे देखील असणार आहे.
याचसोबत यासमितीत संजय जाधव,शेमारू इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा केतन मारू आणि भाजप चित्रपट युनियनचे संदीप घुगे हे देखील समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे.
काय म्हणाले अभिनेता महेश कोठारे फिल्म बाजार पोर्टल विषयी पत्रकार परिषदेत –
फिल्म बाजार ह्या मराठी चित्रपट सृष्टीला प्रमोट करणार्या पोर्टलसाठी काम करण्याची संधी देण्यासाठी महेश कोठारे यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहे.
फिल्म बाजार पोर्टल विषयी माहिती देताना अभिनेता महेश कोठारे अणि स्वप्नील जोशी असे म्हणाले की फिल्म बाजार हे मराठी चित्रपट निर्माता,दिग्दर्शक,लेखक,यांच्या साठी एक उत्तम अणि अप्रतिम व्यासपीठ ठरणार आहे.याने मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक यांना चित्रपट निर्मितीत अधिक साहाय्य प्राप्त होणार आहे.
जे महाराष्ट्र राज्यातील खेड्यापाडयातील टॅलेटेड कलाकार आहेत त्यांना चित्रपट निर्मिती दिग्दर्शन लेखन इत्यादी क्षेत्रात करीअर करायचे आहे पण त्यांना मुंबई शहरामध्ये फिल्म इंडस्ट्रीत जाता येत नाही मुंबई मध्ये चित्रपट सृष्टीत जाऊन कोणाला भेटायचे हे माहीत नाही अशा गरजु कलाकारांना ह्या पोर्टलच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीसोबत डायरेक्ट संपर्क साधता येईल.
नवोदित निर्मात्यांना ह्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या कल्पणा समितीला कळवायच्या आहेत ह्या कल्पणा समितीला आवडल्या तर त्या निर्मात्यांना संधी देखील दिली जाणार आहे असे महेश कोठारे यांनी सांगितले आहे.
स्वप्नील जोशी या़ंनी या पोर्टलविषयी पत्रकार परिषदेत काय सांगितले-
स्वप्निल जोशी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की जगभरात जे फिल्म बाजार भरवले जात असतात त्या अनुषंगाने एक पोर्टल आॅफलाईन अणि आॅफलाईन असावे म्हणून हे पोर्टल लाॅच केले जात आहे.
ज्या नवोदित कलाकारांना चित्रपट दिग्दर्शक लेखक निर्माता यांना निर्मिती करायची आहे पण त्यांच्या कडे कुठलीही पायाभूत सुविधा उपलब्ध नाही.योग्य व्यक्तींचा पाठींबा नाही अशा सर्व व्यक्तींना एकत्र आणुन याची सोय करता येईल या उद्देशानेच फिल्म बाजार ह्या पोर्टलची सुरूवात केली जात आहे.
फिल्म बाजार पोर्टल नवोदित चित्रपट दिग्दर्शक लेखक निर्माता या सर्वांनाच खुपच फायदेशीर ठरणार आहे.
हे पोर्टल मराठी चित्रपट सृष्टीत चांगला बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरेल असे देखील या पोर्टलविषयी बोलताना स्वप्नील जोशी यांनी सांगितले जाते आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे ही समिती स्थापन झाली आहे असे महेश कोठारे यांनी सांगितले आहे.
याचसोबत फिल्म बाजार पोर्टल सुरू करण्याची मुख्य कल्पणा ही स्वप्नील जोशी यांची आहे असे देखील महेश कोठारे यांनी सांगितले आहे.
फिल्म बाजार पोर्टल कशापदधतीने काम करणार –
फिल्म बाजार हे पोर्टल आॅनलाईन अणि आॅफलाईन अशा दोन्ही काम पदधतीने काम करेल आँनलाईन हे पोर्टल चोवीस तास सुरू असणार चित्रनगरी मध्ये ह्या पोर्टलचे आॅफलाईन कार्यालय स्थापित केले जाणार आहे.
फक्त आॅफलाईन मध्ये याला काही तासांच्या मर्यादा असणार आहे.
असे महेश कोठारे अणि स्वप्नील जोशी या़ंनी याविषयी माहिती देताना सांगितले आहे.जे चित्रपट सृष्टीतील नवे कलाकार आहेत त्यांना ह्या पोर्टलच्या माध्यमातून साहाय्य केले जाणार आहे.