marathi suvichar
- राग ही एक अशी शिक्षा आहे ज्यात लोक चुका करत असतात अणि शिक्षा मात्र आपण स्वताला देत असतो.
- खोटया सांत्वनेपेक्षा स्पष्टपणे दिलेला नकार कधीही चांगला.
- जे घडुन गेले ते आपल्या हातात नसते पण जे घडणार आहे ते नक्कीच आपल्या हातात असते.
- जेव्हा नशिब साथ देत नसेल तेव्हा समजावं की आता कर्म करण्याची वेळ आली आहे आता आपल कष्ट आणि व मेहनत आपली साथ देणार.
- आपल्या चांगल्या परिस्थितीचा अहंकार करू नका कारण परिस्थिती बदलायला वेळ नाही लागत
- तुम्ही देण्याची सुरूवात तर करून पहा मग येण्याची सुरूवात आपोआप होईल.मग ते धन असो वा प्रेम
- जिंकुन दाखवा !! काही तुमच्या हरण्याची आतुरतेने वाट पाहतायेत
- आयुष्यात कायम अपयश पदरी आलेल्यांना विचारा त्यांनाच खर्या यशाची किंमत कळत असते.
- लोक तुम्हाला महत्व देतायत की तुमच्या चांगल्या वेळेला महत्व देतायत? नक्की विचार करा .
- जे कष्ट,मेहनत करतात त्यांच्याकडनच चुक होणार ,मेहनतीला घाबरतात त्यांच पुर्ण आयुष्य दोष शोधण्यातच निघून जाते.
- स्वताला इतके व्यस्त ठेवा की नको त्या बाबतीत चिंता करत बसण्यासाठी तुमच्याकडे अजिबात वेळ असायला नको
- नेहमी स्वताचा विकास करीत राहा कारण गती अणि प्रगती हे तुमच्या जिवंतपणाचे प्रमाण असते.
- जगातील सर्वात मोठा अलंकार ही आपली मेहनत असते अणि जगातील सर्वात चांगला साथीदार आपला अनुभव
- जेथे प्रयत्नांची पराकाष्टा अधिक असते तिथे नशिबाला देखील झुकावेच लागते.
- जर बनायचेच असेल कोणत्याही क्षेत्रातील बेस्ट बना नही तर लोक तुम्हाला गृहित धरायला लागतील.
- कोणत्याही क्षेत्रातील अडचणी बघून माघार कधीच घेऊ नका काय सांगता येते ती समस्या सोडवायला देवाने तुमची निवड केलेली असेल.
- प्रत्येकाचे चांगले दिवस येत असतात.कारण बदल हे निसर्ग चक्र आहे ,चांगले व वाईट दोघे दिवस कायम कधीच राहत नसतात .
- स्वतावर आत्मविश्वास इतका असावा की मला एखादा रस्ता नक्कीच मिळणार ही स्वतावर खात्री असावी अणि नाहीच मिळाला तर तो मी स्वता निर्माण करणार.
- नशिबवान ते नसतात ज्यांना जीवणात सगळेच काही चांगले मिळत असते नशिबवान तर ते असतात ज्यांना जे मिळाले ते त्यालाच चांगले मानून घेत असतात
- आपल्या जीवणात येणारी संकटे एकदम हाय वे च्या ट्रँफिक लाल सिग्नल सारखी असतात जी थोडा वेळ संयम पाळगल्यावर आपोआप हिरवी होऊन जातात.
- नेहमी स्वताच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहा कारण लोक फक्त उगवत्या सुर्यापुढेच हात जोडत असतात मावळत असलेल्या सुर्याला नाही.
- ज्यांची स्वप्र मोठी असतात त्यांची रात्र छोटी अणि दिवस मोठा असतो अणि ज्यांची रात्र मोठी असते त्यांचा दिवस नेहमी छोटा असतो
- तुम्हाला तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी वेड व्हावेच लागेल कारण इतिहास वेडेच रचतात अणि शहाणे तो वाचतात.
- जेव्हा शक्यतेचे प्रमाण वाढत जाते तेव्हा अशक्यतेचे प्रमाण आपोआप कमी होते.
- संघर्ष करणारी व्यक्ती नेहमीच ह्या दोन गोष्टी प्राप्त करत असते एक मेहनतीचे फळ अणि समस्येचे समाधान.
- राग द्वेष अणि तिरस्कार ही तिघे संथ गतीने परिणाम करणारी विष असतात ज्याचे प्राशन आपण स्वता करत असतो अणि आपल्याला वाटते त्याच्याने कोणी दुसरा मरणार आहे.
- गरीबी अणि परिस्थिती आपल्यात अशी कौशल्ये निर्माण करत असते की त्यातून नाजुक शरीराची व्यक्तीही मोठमोठी संकटे आव्हाने पेलणे शिकुन जात असते.
- लढण्याच्या आधी घाबरून गेलात तर तुम्ही मृत्युच्या आधीच मराल
- प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याच्या चित्रपटाचा नायक असतो फरक फक्त एवढाच की काहींचा चित्रपट गाजतो काहींचा गाजत नाही.
- कधीकधी समोरच्यापेक्षा आपले दुख जरी मोठे असले तरी आपले दुख विसरून त्याला आधार देणे त्याक्षणी गरजेचे असते.
- जरी सर्व जग तुमच्याविरूदध उभे असेल तरी एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा
- जेव्हा मनात जिंकण्याची जिद्द असते तेव्हा कितीही मेहनत केली तरी आपल्याला थकवा येत नसतो .
- गुडघे टेकायला लागेल हे जग तुमच्यापुढे, फक्त त्यासाठी आधी तुम्ही इतरांपुढे गुडघे टेकणे बंद करणे आवश्यक आहे.
- जोपर्यत तुमचा यशाचा प्रवास पुर्ण होत नसतो तोपर्यत कोणालाच तुमच्या कष्टाची जाणीव होत नसते.
- एखाद्यासमोर स्वताला सिदध करणे गरजेचे नसते तर त्याच्यापेक्षा उत्तम होऊन दाखवणे गरजेचे असते.
- सर्व काही गमविल्यानंतरही तुमच्यात अजून नवीन काही निर्माण करण्याची क्षमता असेल तर समजून जा की तुम्ही ह्या जगात कधीच निराश होऊन बसणार नाही.
- ज्यांचा आपल्या मेहनतीवर विश्वास असतो ते नशिबाचा विचार कधीच करत नसतात.
- तुम्हीच स्वताला कमजोर समजत असतात नाहीतर तुम्ही जे काही करु शकता ते ह्या जगात इतर कोणीच करू शकत नाही.
- लोकांना तुमचे यश बघायचे असते तुम्ही त्याच्यासाठी घेतलेले कष्ट नाही.
- कौशल्य तर सगळयांमध्येच असते फरक फक्त एवढाच आहे की कोणाचे कौशल्य दिसत नसते तर कोणाचे दिसत असते.
- बुदधीबळाचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असो दोघांमध्ये जिंकण्यासाठी संयम हा बाळगावाच लागतो.
- पराभव मान्य करुन मरण स्वीकारण्यापेक्षा शेवटच्या श्वासापर्यत लढत राहणे कधीही चांगले.
- कोणाला काहीच फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीत जगत आहात तुम्हाला स्वतालाच तुमची परिस्थिती बदलावी लागेल
- सातत्याने पुढे चालत राहण्यासाठी नेहमी स्वताचा मार्ग स्वताच तयार करीत राहा.
- कोणाची गुलामी का सहन करता जर तुमच्याकडे उडण्यासाठी पंख आहेत.
- आपल्या समस्येवरील उपाय फक्त आपल्याकडेच असतात लोकांकडे फक्त सल्ले असतात.
- जेव्हा चावणारे सुदधा तुम्हाला प्रेमाने गोंजारायला लागतात तेव्हा समजुन जा की वेळ आता तुमची आहे
- यश तर बसले आहे संकटाच्या पुढेच पण जर तुम्ही संकटांपासुनच दुर पळणार तर यशापर्यत कसे पोहोचणार

Optimum Nutrition Amino Energy – Pre Workout with Green Tea, BCAA, Amino Acids, Keto Friendly, Green Coffee Extract, Energy Powder – Fruit Fusion, 30 Servings

Alacer Emergen-C Raspberry – 30-Count
अभिवृद्धी म्हणजे काय