एम पासपोर्ट पोलिस ॲपविषयी माहिती M passport police app information in Marathi
आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात पासपोर्ट तयार करण्यासाठी जो अधिक कालावधी लागत असतो तसेच जी धावपळ करावी लागत असते ती कमी करण्यासाठी शासनाने एक नवीन उपक्रम राबविला आहे.ह्या उपक्रमाचे नाव आहे एम पासपोर्ट पोलिस ॲप.

पासपोर्ट बनवत असताना पोलिस व्हेरीफिकेशन करणे अनिवार्य असते.अणि ह्या व्हेरीफिकेशन प्रोसेस मध्ये आपणास खुप जास्त वेळ लागुन जात असतो.ज्यामुळे आपले पासपोर्ट लवकर तयार होत नाही.
नागरीकांची हीच समस्या लक्षात घेऊन शासनाने परराष्ट्र मंत्रालयाने २०२३ मध्ये एक आॅनलाईन अॅप लाॅच केले आहे.(परराष्ट मंत्रालय हे आपल्या देशात पासपोर्ट जारी करत असलेले नोडल मंत्रालय आहे).
एम पासपोर्ट पोलिस हया ॲपदवारे नागरीकांना अत्यंत सहज अणि सोप्या पद्धतीने मोबाईल अॅपच्या माध्यमातून पोलिस व्हेरीफिकेशन प्रोसेस पूर्ण करता येणार आहे.
जीवन प्रमाण – चेहरा प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र कसे मिळवायचे?
एम पासपोर्ट पोलिस ॲपचा कोणाला फायदा घेता येईल?
ह्या ॲपच्या नावावरून आपणास अंदाज आला असेल की हे ॲपविशेषतः पोलिसांसाठी लाॅच करण्यात आले आहे.
हे अॅप अशा पोलिस कर्मचारी वर्गासाठी खासकरून बनविण्यात आले आहे ज्यांना पोलिस व्हेरीफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी पासपोर्ट अर्जदारांच्या घरी चकरा माराव्या लागायच्या.पोलिस व्हेरीफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागत होती.
पण परराष्ट्र मंत्रालयाने असे देखील सांगितले आहे की एम पासपोर्ट पोलिस अॅप लाॅच करण्यात आल्यानंतर पासपोर्टची पोलिस व्हेरीफिकेशनचा कालावधी १५ दिवस इतका ठेवला जाणार नाही.
हा कालावधी फक्त पाच दिवस इतका ठेवला जाणार आहे.म्हणजे आधी पोलिस व्हेरीफिकेशन प्रोसेस साठी जिथे प़ंधरा दिवसाचा अवधी दिला जात होता तो फक्त पाच दिवस इतका केला जाणार आहे.
पासपोर्ट जारी करण्याची वेळ देखील दहा दिवसांनी कमी केली जाणार आहे.
एम पासपोर्ट पोलिस ॲपचे फायदे –
- पोलिस व्हेरीफिकेशन प्रोसेस मध्ये जो अधिक वेळ लागत होता तो आता उमेदवारांना व्हेरीफिकेशन प्रोसेस मध्ये लागणार नाही याने आपल्या वेळेची देखील बचत होणार आहे.
- पोलिस व्हेरीफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी पासपोर्ट अर्जदारांच्या घरी ज्या चकरा माराव्या लागायच्या जी धावपळ करावी लागायची ती देखील याने वाचणार आहे.
- पासपोर्टसाठी पोलिस व्हेरीफिकेशन प्रोसेस सुलभ अणि सोपी होणार आहे.
- खुप कमी कालावधीत उमेदवारांना आपले पासपोर्ट ह्या अॅपमुळे प्राप्त होणार आहे.
पासपोर्ट सेवेसाठी अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट –
www.passportindia.gov.in ही भारत देशातील एकमेव आॅफिशिअल वेबसाईट आहे.जिथुन भारत देशातील सर्व नागरीक पासपोर्ट सेवेसाठी अर्ज सादर करू शकतात