ह्या टायर कंपनीच्या शेअर्समध्ये झाली ९०० टक्के वाढ एका स्टाॅकची किंमत १ लाखांपर्यंत -MRF share

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ह्या टायर कंपनीच्या शेअर्समध्ये झाली ९०० टक्के वाढ एका स्टाॅकची किंमत १ लाखांपर्यंत

सध्या टायर कंपनी म्हणून परिचित असलेल्या एम आर एफचे Madras rubber factory शेअर्स बाजारात खुपच चर्चेमध्ये दिसुन येत आहे.

आज मंगळवारी १३ जुन २०२३ रोजी ह्या कंपनीचे शेअर्स एका लाखाच्या देखील पार जाताना दिसुन आले आहेत.म्हणजे एक लाखापर्यंत मजल ह्या शेअर्सने मारली आहे.

एम आर एफ ह्या कंपनीचे शेअर्स आज १३ जुन २०२३ रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर १,००,०३८.७० वर पोहोचले आहेत.

तर बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज सेन्सेक्स वर हया शेअर मध्ये १.१५ टक्के इतकी वाढ झाली असल्याचे दिसून येते आहे हे शेअर्स बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज वर १०००७९.१० वर पोहोचताना दिसून आले आहे.

एम आर एफ ह्या टायर कंपनीचे एकुण मार्केट कॅप देखील वाढले आहे ह्या कंपनीचे मार्केट कॅप ४२ हजार ४४४.९८ कोटी रूपये इतके झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.

टायर निर्माण करण्यासाठी प्रचलित असलेल्या ह्या कंपनीच्या नफ्यात जानेवारी अणि मार्च तिमाही मध्ये ८६ टक्के इतकी वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.

ही वाढ मागील वर्षीच्या तुलनेत ८६ टक्के इतकी अधिक आहे.कंपनीचे उत्पन्न देखील १० टक्कयांनी वाढले आहे.एवढेच नव्हे तर एम आरएफ कंपनीकडुन डिव्हीडंडची घोषणा देखील करण्यात आली होती.

एम आर एफ कंपनीचा आर्थिक वर्ष २०२३ मधील एकुण डिव्हीडंड १७५ रूपये झाला आहे.यानंतर कंपनीच्या स्टाॅकमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली होती.कंपनीच्या स्टाॅकमध्ये तब्बल एक लाखापर्यंतचा आकडा गाठण्यात यश प्राप्त केले होते.

आता पुन्हा एक महिन्याच्या कालावधीनंतर ह्या कंपनीचे शेअर्स एक लाखापर्यंत पोहोचले आहेत.

असे सांगितले जाते आहे की ह्या शेअरला ९० हजारा वरून एक लाखापर्यंत पोहोचायला एक ते दोन वर्षे इतका कालावधी लागला होता.

२०२१ मध्ये २० जानेवारीला पहिल्यांदा हे शेअर्स ९० हजारच्या वर बंद झाला आहे.गेल्या वर्षी ह्या शेअर्सने ९६ हजारचा विक्रमी टप्पा गाठण्यात यश प्राप्त केले आहे.

See also  Digital Marketing  म्हणजे काय? आणि 8 प्रकार. What is digital marketing and the 8 Types of Digital Marketing?

एम आर एफ ह्या टायर कंपनीच्या शेअर्सचा भाव २०२३ मध्ये 100000 रूपये प्रति शेअर इतका आहे अणि ह्या कंपनीने आतापर्यंत ७६९ करोड इतका नफा देखील प्राप्त केला आहे.

२०२० मध्ये ह्या कंपनीच्या शेअर्सची किंमत ९५००० प्रति शेअर होती.तेव्हा ह्या कंपनीच्या शेअर्सने १४२३ करोड रुपये इतका नफा मिळवला होता.

२०१८ मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत ७५ हजार रुपये प्रति शेअर इतकी होती.तेव्हा ह्या शेअर्सने ११३२ करोड रुपये इतका नफा प्राप्त करण्यात यश प्राप्त केले होते.

एम आर एफ कंपनी सुरूवातीला फुगे बनवायचे काम करायची नंतर १९५२ मध्ये ही कंपनी टायर निर्माण करण्याच्या व्यवसायात उतरली होती.

टायर व्यवसायात उतरताच कंपनीने सुरूवातीलाच चार पाच वर्षांत ५२ टक्के इतके मार्केट शेअर प्राप्त केले होते.

NOTE -The information in this blog is not meant to be an endorsement or offering of any stock purchase. Investments in securities market are subject to market risks, Always Refer your financial consultant advice before Investing.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा