म्युच्युअल फंड नॉमिनीची अंतिम तारीख वाढवली – Mutual fund nominee last date extended

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

अल फंड नॉमिनीची अंतिम तारीख वाढवली Mutual fund nominee last date extended

ज्या गुंतवणुकदारांनी म्युच्युअल फंड मध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक केली आहे किंवा ते म्युच्युअल फंड मध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करणार आहेत अशा सर्व गुंतवणुकदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांनी आपल्या म्युच्युअल फंड मध्ये अजुनही नाॅमिनी म्हणजे आपला वारसदार जोडलेला नसेल त्याची माहिती भरलेली नसेल त्यांना आपल्या नाॅमिनीला जोडण्यासाठी ३१ मार्च २०२३ ही शेवटची तारीख देण्यात आली होती.

पण आता ह्या तारखेत वाढ करण्यात आली आहे आता म्युच्युअल फंड गुंतवणुक धारकांना आपला नाॅमिनी जाॅईन करण्यासाठी थोडी वाढीव मुदत देण्यात आली आहे.आता आपण ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आपल्या नाॅमिनीची माहीती भरण्याचे हे काम करू शकतात.

म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांमध्ये ज्यांनी याआधीच आपली नाॅमिनी डिटेल फिल केली आहे म्हणजे भरली आहे त्यांना परत ही नाॅमिनी डिटेल भरण्याची कुठलीही आवश्यकता नाही पण ज्यांनी अद्याप आपल्या नाॅमिनीची डिटेल जोडली नाहीये त्यांना हे करणे आवश्यक अनिवार्य असणार आहे.

म्युच्युअल फंड नाॅमिनी डिटेल भरण्याची शेवटची तारीख –

म्युच्युअल फंड मध्ये नाॅमिनी डिटेल भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ अशी ठेवण्यात आली आहे आधी ही तारीख ३१ मार्च २०२३ अशी होती आता यात सहा महिने इतकी वाढ करण्यात आली आहे.

नाॅमिनी डिटेल म्हणजे काय?

जिथे आपण आपल्या पैशांची मालमत्तेची गुंतवणूक करत असतो तिथे आपणास गुंतवणुक करत असताना एक नाॅमिनी म्हणजे आपला वारसदार जोडावा लागत असतो.

म्हणजे भविष्यात आपल्याला काही झाले आपला मृत्यू वगैरे झाला तर आपल्या गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर आपल्या वारसदाराला दावा करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो.

See also  भारतातील बॅका देखील अमेरिकन‌ बॅका प्रमाणे आर्थिक संकटात आल्या तर भारतातील बॅक ठेवीदारांच्या पैशाचे काय होईल? - bank bankruptcy crisis

म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपल्या गुंतवणुकीची रक्कम आपल्या वारसदाराला दिली जात असते.

पण समजा गुंतवणुकदाराने कोणतेही मृत्यूपत्र तयार केले नसेल की त्याच्या मृत्यूनंतर कोणाला त्याच्या पैशावर दावा करता येईल कोण त्याचा वारस असेल तर अशावेळी वारसदाराने जरी गुंतवणुकदाराच्या मृत्युनंतर आपल्या नाॅमिनी रक्कमेवर दावा केला तरी त्याला ती रक्कम दिली जात नाही.

जर गुंतवणुकदार मालमत्ता धारक मृत व्यक्तीचे वारस असतील तर ते आपल्या हक्कासाठी रक्कमेवर मालमत्तेवर दावा करू शकतात.

अशा प्रकरणात मालमत्तेचा भाग मालमत्तेची रक्कम ही सर्व कायदेशीर वारशांमध्ये समान समान प्रमाणात वाटली जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा