जैविक खत -Organic Bio fertilizers चे महत्व आणि रासायनिक खतांच्या संतुलित वापरबाबत कृतिदल च्या शिफारसी
केंद्र सरकरतर्फे रासायनिक खतांच्या संतुलित वापरबाबत एक कृतिदल स्थापन केला गेला होता, ह्या कृतीदल ने केंद्र कडे काही म्हत्वाच्या च्या शिफारसी केल्या आहेत , जसे
- युरिया खत खरेदी सोबत, जैविक खत -Organic Bio fertilizers घेणे बंधनकारक करण्यात यावे ,जेणेकरून जैविक खता च वापर वाढून जमिनीचा पोत सुधरावा.
- ठिबक संचनचा वापर करून पिकांना खतांचा डोस देण्यात यावा , ह्यात पाण्यात खाते मिसळली जातात व ती ठिबक सिंचनद्वारे द्रव्य रूपात पिकांना देण्यात येतात.
- ठिबक सिंचना मुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर बचत होते
- युरीचा च वापर कमी करण्यावर भर देण्यात यावा
- सरसकट खतांचा वापर न करता पिकानुसार , लागणार्या पोषक तत्वांनुसार पिका न खत देण्यात यावीत
हायब्रिड बियाणे , रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशके चा वारेमाप वापर करून अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी खूप प्रयत्न केले जातात आणि उत्पादनात वाढ होते सुद्धा , परंतु रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे बरेच वाईट परिणाम होतता जसे,
जैविक कीड -Organic Bio fertilizers नियंत्रण प्रयोगशाळां
ह्या बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासना तर्फे जैविक कीडनाशकांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दहा जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आल्यात
- पश्चिम महाराष्ट्रात -अहमदनगर
- मराठवाड्यात -औरंगाबाद, परभणी व नांदेड
- उत्तर महाराष्ट्रात -जळगाव व धुळे
- विदर्भात -बुलडाणा, यवतमाळ, अमरावती व वर्धा
जैविक खत वापराचे फायदे
- रासायनिक खतांचा वापर कमी होऊन उत्पादनखर्चात बचत होते.
- पर्यावरणात समतोल राखला जाऊन जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकून राहून पिकाच्या उच्च दर्जाची उत्पादन घेता येतात
- पिकांच्या उत्पादनात साधारणत: १५ ते ३० टक्के वाढ होते.
- ही जैविक खते बीजप्रक्रिया, रोपांच्या मुळावर प्रक्रिया, बेणे/कंदप्रक्रिया (ऊस, हळद, आले, केळी इ.) तसेच ठिबक सिंचनाट्रारे किंवा पिकांच्या मुळाद्वारे देता येतात
जैविक खताचे महत्त्व लक्षात घेता खरीप २०१६ पासून या प्रयोगशाळांमध्ये जैविक खताचे उत्पादन सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये
- रायझोबियम, अँझोटोबॅक्टर, अँझोस्पिरीलम, असिटोबॅक्टर, पी.एस.बी. यांचा समावेश
- नत्र स्थिरीकरण करणारे, स्फुरद विरघळविणारे, पालाश विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जिवाणू असतात. ही सर्व खते महारायझो, महाअँझोटोबॅक्टर इ. महाब्रँडमध्ये विक्री करण्यात येत आहेत.
- ही खते महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पिके उदा. कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर, उडीद, मूग, भुईमूग इ. पिकांना उपयुक्त ठरत आहेत.
Azotobacter zinc Solubilizing
द्रवरूप जिवाणू संघ
या जिवाणू द्र्व्यात दोन किंवा अधिक जिवाणूंचा समावेश असतो.
- एकच जिवाणू असणारे जैविक खत व दोन किंवा अधिक जिवाणू असणारे जिवाणू संघ यांची तुलना केली असता द्रवरुप जिवाणू संघ हा तुलनेने स्वस्त, वापरण्यास सोपा, वाहतूक खर्च कमी, बीज प्रक्रिया सोप्या पद्धतीने करता येणायसारखा आहे.
खालील प्रयोगशाळांमधून जैविक खतांची व जैविक कीडनाशकांची (Organic Bio fertilizers) विक्री सुरू झालेली आहे. माहिती साठी प्रयोगशाळांचे पत्ते व फोन नंबर खाली दिले आहेत.
प्रयोगशाळेचे नाव व पत्ता | भ्रमणध्वनी क्रमांक | ||
जिल्हा फळ रोपवाटिका, परभणी | 7588082589 | ||
जैविक प्रयोगशाळा वाघाळे पेट्रोल पंपासमोर, लातूर फाट्याजवळ, धनेगांव, नांदेड | 8329630006 | ||
कृषि अभियांत्रिकी कार्यशाळा परिसर, तपोवन रोड, अमरावती | 9552411334 | ||
जैविक प्रयोगशाळा बस स्टँन्डजवळ, भोंडे हॉस्पिटल समोर, धाड रोड, बुलडाणा | 9422941365 | ||
कृषि चिकित्सालय प्रक्षेत्र, चाळीसगांव रोड, मु. पिंपरी, पो. वडजाई, धुळे | 9421303567 | ||
जैविक प्रयोगशाळा मुमराबाद ता. मुमराबाद, जि. जळगांव, | 7588041008 | ||
जैविक प्रयोगशाळा शहानुरमियाँ दर्गारोड, अभियांत्रिकी कार्यशाळा परिसर कृषि ज्योतीनगर, औरंगाबाद | 7038685204 | ||
जैविक प्रयोगशाळा गार्डन रोड, यवतमाळ | 8308756555 | ||
बीज गुणन केंद्र (सिडफार्म), सावेडी, अहमदनगर | 9096948402 | ||
जैविक प्रयोगशाळा मु. पो. सेलू. ता. सेलू जि. वर्धा | 7262818880 |
एक म्हत्वाची सूचना – ज्या शेतकरी बंधूंना किंवा युवकांना organic farming कोर्स कारयाचा असेल त्यांनी खलील लिंक वरुण अधिक माहिती घ्यावी
गांडूळ शेती बद्दल वाचा – https://www.webshodhinmarathi.in/vermicompost-production-unit/
किटकनाशक पाहिजे जैविक दुकानात साठि कोल मि9307268365
नमस्कार – कृपया –
Om Bio-fertilizer
Survey No. 1226/2, Near IOC Petrol Pump, Wada Road, Armori, Wadsa Road, Nagpur-440010, Maharashtra, India
Call Us -+91 9423565242
Our [email protected] इथे चौकशी करा .