अतिचिंता – Panic attack, common signs , care and more
पँनिक अटँक हा एक मानसिक तसेच शारीरीक आजार आहे जो जास्त चिंता केल्याने आणि तणावात राहिल्याने जडत असतो.
पँनिक अटँक हा एका अशा परिस्थितीशी निगडीत असतो ज्या परिस्थितीत मनात भीतीची भावना निर्माण होत असते.यात भीती,चिंता,तणाव इत्यादींचा समावेश होत असतो.
पँनिक अटँक आल्यावर व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असतो.पुर्ण शरीर घामोघाम होते तसेच शरीराचा थरकाप देखील होत असतो.हदय जोरजोरात धडधडु लागते.अशी अनेक लक्षणे ही पँनिक अटँकची असल्याचे आपणास दिसुन येते.
याचसोबत पँनिक अटँक आल्यावर छातीत तसेच पोटात दुखते,शरीरात अशक्तपणा जाणवतो,तसेच व्यक्तीला हार्ट अटँक आल्यासारखे देखील जाणवत असते.
आजच्या लेखात आपण ह्याच पँनिक अटँकविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
पँनिक अटँक म्हणजे काय?
- पँनिक अटँक हा एक विकार आहे जो जास्त चिंता केल्याने तणावग्रस्त वातावरणात राहिल्याने जडत असतो.पँनिक अटँक हा भीतीशी संबंधित विकार आहे. ज्यात आपण खुप घाबरून जात असतो.
- आणि घाबरलेल्या अवस्थेत श्वास घेण्यास त्रास होणे,हदयाचे ठोके वाढणे,घाम येणे,शरीराचा थरकाप होणे,छातीत तसेच पोटात दुखायला लागणे,शरीरात पुर्ण मरगळ निर्माण होऊन अशक्तपणा जाणवणे असे अनेक त्रास व्यक्तीला होत असतात.
- वैद्यकीय दृष्टया ज्या व्यक्तीला दीर्घ कालावधीसाठी पँनिक अटँक येत असतो त्याला पँनिक डिसाँर्डर असे देखील म्हटले जात असते.
पँनिक अटँकची चिन्हे तसेच लक्षणे कोणकोणती असतात?
पँनिक अटँक आल्यावर व्यक्तीला त्याची काही मानसिक तसेच शारीरीक लक्षणे ही दिसुन येत असतात.
डायग्राँस्टिक अँण्ड स्टँटँस्टिक्ल मँन्युअल आँफ मेंटल हेल्थ डिसाँर्डर फिप्थ एडिशन कडुन पँनिक अटँकची व्याख्या तीव्र भीती जाणवणे तसेच अचानक अस्वस्थ वाटणे अशी करण्यात आलेली आहे.
पँनिक अटँकची अनेक लक्षणे असतात आणि ती पुढीलप्रमाणे आहेत :
- पँटिक अटँक आलेल्या व्यक्तीला खुप भीती वाटत असते.
- पँनिक अटँक आलेल्या व्यक्तीचे हदय देखील जोरजोरात धडधडु लागते ज्यामुळे त्याला अटँक आल्यासारखे देखील जाणवत असते.
- पँनिक अटँक आल्यावर छातीत तसेच पोटात देखील जोरजोरात कळा येत असतात.
- शरीराला अचानक घाम येऊ लागतो.
- शरीरात अचानक अशक्तपणा येऊन चक्कर आल्यासारखे जाणवत असते.
पँनिक अटँक आल्यावर व्यक्तीला गुदमरल्यासारखे वाटत असते म्हणजेच श्वास घ्यायला त्रास देखील होत असतो ,मरण्याची तसेच वेडे होण्याची देखील भीती वाटु लागते.
पँनिक अटँक येण्याची कारणे कोणकोणती असतात?
- पँनिक अटँक येणे हा आपण जास्त तणावात राहण्याचा परिणाम असतो.जे लोक जास्त तणावात राहतात त्यांनाच पँनिक अटँक तसेच पँनिक डिसाँडर्सची समस्या अधिक प्रमाणात उदभवताना आपणास दिसुन येते.
- आणि पँनिक अटँक येणे ही एक मानसिक स्थिती आहे जिची काही शारीरीक लक्षणे देखील व्यक्तीला दिसुन येत असतात.
- व्यक्तीच्या तणावाची पातळी कोणती आहे यावरून त्याच्या प्रतिक्रियेत बदल देखील पाहायला मिळत असतो.सहसा पँनिक डिसाँर्डरची समस्या अशाच व्यक्तींमध्ये आढळुन येत असते जे दिर्घकाळापासुन तणावात आणि चिंतेत जीवण जगत असतात.
- काही व्यक्तींना विशिष्ट उत्तेजना तसेच ट्रिगर मुळे देखील पँनिक अटँक येत असतात तर काही व्यक्तींना आजुबाजुच्या कलकल, गोंधळ,गर्दी मुळे देखील पँनिक अटँक येत असतात.
- म्हणजेच यावरून आपणास हे समजून येते की पँनिक अटँक येण्याचे कोणतेही एक विशिष्ट कारण नसते त्यामागे वेगवेगळी व्यक्तीगत कारणे असु शकतात.ज्यात एखाद्या आवडत्या व्यक्तीला कायमचे गमवण्याची भीती वाटणे,संपत्तीत उद्योग व्यवसायात एखादे मोठे नुकसान होणे इत्यादी कारणांचा समावेश असु शकतो.
- आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे पँनिक अटँक हा व्यक्तीला कधीही येऊ शकतो ते ही कुठल्याही प्रकारची पुर्वसुचना न देता.
पँनिक अटँकवर कोणते वैद्यकीय उपचार आपण करायला हवेत?
- पँनिक अटँक आल्यावर आपण पुढील वैद्यकीय उपचार करू शकतो.
- पँनिक अटँक येणे हा एक मानसिक विकार आहे ज्यावर उपचार करण्यासाठी आपण मनोवैज्ञानिक,मनोचिकित्सक यांची मदत घ्यायला हवी.
- याचसोबत आपण एखाद्या काऊन्सिलरचा म्हणजेच सीबीटी चा सल्ला घेऊ शकतो.ज्यात व्यक्तीला कोणत्याही संकटाकडे आव्हाणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन तसेच पदधत बदलण्यास मदत केली जाते.आणि त्या संकटावर मात करण्यासाठी काँग्नेटिव्ह बिहेव्हीरल थेरपीद्वारे व्यक्तीला मदत केली जात असते.
- काही गंभीर प्रकरणांमध्ये डाँक्टर व्यक्तीला दिर्घकालीन विनियोगाकरिता अँण्टी डिप्रसेंटस म्हणजे चिंता विरोधी औषधे देखील लिहुन देत असतात.
पँनिक अटँकला थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो?
पँनिक अटँकला आपण रोखु शकत नाही.पण त्याला आळा घालण्यासाठी काही उपाय नक्कीच करू शकतो.
1)नियमित श्वासोच्छवासाचा व्यायाम आपण करायला हवा.
2) योगा तसेच व्यायाम देखील करायला हवा.
3) कमी साखरेच्या आहाराचे सेवण करावे.
4) दारू,विडी,सिगारेट,तंबाखु गुटखा अशा मादक पदार्थांचे सेवण करणे टाळावे कारण याने देखील आपण सतत तणावात आणि चिंतेत राहत असतो.
5) माईंडफुलनेसचा अभ्यास करावा ज्यात आपण आपल्या विचारांकडे तटस्थपणे बघत असतो आणि समजून घेत असतो की कोणत्या परिस्थितीत व्यक्तीला कसे जाणवते?
एखाद्या वेळी पँनिक अटँक येणे हे आपल्या जीवासाठी,आरोग्यासाठी स्वास्थ्यासाठी घातक ठरत नसते.
- पण याच ठिकाणी व्यक्तीला जर वारंवार पँनिक अटँक येत असेल तर अशा वेळी आपण डाँक्टरांचा सल्ला घेणे खुप महत्वाचे ठरते.
- कारण दिर्घकाळापासुन पँनिक अटँक येणे हे पँनिक डिसाँर्डर्सचे लक्षण मानले जात असते.ज्याला एक मानसिक विकार देखील म्हटले जाते.
पँनिक अटँक येत असलेल्या व्यक्तीला आपण कशापदधतीने मदत करू शकतो?
1)त्याच्यासोबत चर्चा करणे :
2)त्याच्या तणावाचे मुख्य कारण काय हे जाणुन घ्यावे :
3) सहानुभुती व्यक्त करणे :
1)त्याच्यासोबत चर्चा करणे :
पँनिक अटँक येण्याचे कारण असते चिंता तसेच तणाव.
आणि व्यक्तीला चिंता आणि तणाव तेव्हाच होत असते जेव्हा आपण एखाद्या घटना प्रसंगाबाबद नकारात्मक विचार करत असतो.तेव्हा भीतीपोटी व्यक्तीला पँनिक अटँक येत असतो.
म्हणुन अशा व्यक्तींसोबत आपण सकारात्मक बोलायला हवे.आणि त्याच्या मनात असलेली नकारात्मक भावना काढुन टाकण्याचा प्रयत्न करायला हवा.याने त्याच्या मनात देखील सकारात्मक उर्जा निर्माण होईल.आणि तो चिंतामुक्त होईल.
2)त्याच्या तणावाचे मुख्य कारण काय हे जाणुन घ्यावे :
ज्या व्यक्तीला पँनिक अटँक येत असेल अशा व्यक्तीसोबत आपण मित्रत्वाने बोलायला हवे त्याच्या मनात कसली चिंता आहे त्याच्या मनात कसली भीती आहे?कोणत्या गोष्टीमुळे तो सतत तणावात राहत असतो हे त्याच्याशी सुखदुखाचे दोन शब्द बोलून जाणुन घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
3) सहानुभुती व्यक्त करणे :
ज्या व्यक्तीला पँनिक अटँक येत असतील अशा व्यक्तीसोबत आपण सहानुभुतीपुर्वक वागायला हवे.आपणही त्याच्या सुख दुखात त्याच्या सोबत आहोत असे आश्वासन त्याला द्यायला हवे.
याने त्याला एक मानसिक आधार मिळत असतो ज्याने त्याची चिंता,तणाव देखील कमी होत असतो.
पँनिक अटँकपासुन बचाव व्हावा म्हणुन आपण कशाचे सेवण करावे?
- पँनिक अटँकपासुन बचाव करण्यासाठी आपण बदाम,संत्री,ग्रीन टी, इत्यादींचे सेवण करायला हवे
- कारण बदामात मँग्नेशिअम,पोटँशिअम,कँल्शिअमचा समावेश असतो जे आपल्या नरवस सिस्टममध्ये सुधारणा घडवून आणते आणि बुदधी देखील तल्लख बनवत असते.
- आणि ग्रीन टी मध्ये अँटीआँक्सीडेंट पाँलिफिनाँल असतात जे आपल्या डोक्यातील तणाव कमी करण्याचे काम करतात.
- संत्री हे पँनिक अटँक आल्यानंतर आपल्या न्युराँन्सला शांत करण्यास हातभार लावते.
Comments are closed.