पीएम केअर फंड विषयी माहीती – PM cares fund information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

पीएम केअर फंड विषयी माहीती (Pm cares fund information in Marathi)

मित्रांनो आपल्या देशात कोरोना तसेच इतर कुठलीही महामारी तसेच नैसर्गिक संकट आल्यावर संकटग्रस्त लोकांना आपल्याकडुन मदतीचा हात देता यावा.

यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये एक निधी योजना सुरू केली होती.जिचे नाव पीएम केअर फंड असे होते.

ह्या निधी योजनेदवारे कोरोना तसेच नैसर्गिक संकटग्रस्त व्यक्तींना जनतेकडुन गोळा केलेल्या निधीमध्ये वैद्यकीय तसेच आरोग्य विषयक इतर सेवा उपलब्ध करून देऊन मदत केली जात असते.

आजच्या लेखात आपण ह्याच पीएम केअर फंड विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

पीएम केअर फंडचा फुलफाँर्म काय होतो?

पीएम केअर फंडचा फुलफाँर्म Prime Ministers Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund असा होतो.

पीएम केअर फंड काय आहे?पीएम केअर फंड कशाला म्हणतात?

पीएम केअर फंड ही एक योजना आहे जी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मार्च 2020 रोजी सुरू केली होती.

कोरोना महामारीमुळे त्रस्त व्यक्तींना कोरोना काळात नुकसान झालेल्या लोकांना मदत प्राप्त व्हावी यासाठी हा निधी स्थापित केला गेला होता.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर नैसर्गिक आपत्ती तसेच आर्थिक संकटामध्ये गरजवंतांना मदत करता यावी यासाठी हा उपक्रम उभारण्यात आला आहे.ह्या निधी दवारे संकटग्रस्त व्यक्तींना आरोग्य विषयक सोयी सुविधा पुरवून त्यांची मदत केली जात असते.

देशातील कोरोना महामारीने त्रस्त व्यक्तींना मदत म्हणुन देशसेवेच्या कार्यात आपले एक योगदान म्हणुन पीएम केअर फंड दवारे आपणास Prime Ministers Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund मध्ये देणगी देता येऊ शकते.

पीएम केअर फंडसाठी सरकारच्या अर्थसंकल्पातुन निधी वाटप केला जात असतो का?

नाही,पीएम केअर फंड कडुन निधी जमा करण्यासाठी सरकारच्या अर्थसंकल्पातून कुठल्याही प्रकारच्या निधीचे वाटप केले जात नसते.जनतेने केलेल्या ऐच्छिक मदतीतुन हा उपक्रम राबवला जातो.

See also  Doping in sports म्हणजे काय?- Doping in sports meaning in Marathi

पीएम केअर फंडदवारे कोणाकोणाला देणगी देता येऊ शकते?

पीएम केअर फंडदवारे कुठलीही संस्था तसेच कंपनी देणगी देऊ शकते.याचसोबत एखादी विशिष्ट व्यक्ती देखील आपल्याला शक्य होईल तेवढी आपल्या आर्थिक कुवतीनुसार 10 रूपयांपासुन कितीही देणगी देऊ शकते.म्हणजेच समाजातील कुठल्याही घटकाला या मदत निधीत आपले योगदान देता येऊ शकते.

ही देणगी आपणास गुगल पे,फोन पे,भीम अँप,पेटियम इत्यादी दवारे देता येऊ शकते.

पीएम केअर फंडची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?

पीएम केअर फंडची आँफिशिअल वेबसाइट pm cares.gov.in ही आहे.

पीएम केअर फंडमध्ये देणगी कशी द्यायची?

● सर्वप्रथम आपण पीएम केअर फंडची आँफिशिअल वेबसाइट pm cares.gov.in वर व्हिझिट करावे.

● पीएम केअर फंडची आँफिशिअल वेबसाइट ओपन झाल्यावर तिच्या home page वर जायचे.

● त्यानंतर home page वर गेल्यावर click here for donation details ह्या आँप्शनवर क्लीक करायचे.

● पुढे आपल्याला donate हे आँप्शन दिसुन येईल त्यावर ओके करावे.

● यानंतर domestic तसेच foreign या दोघांपैकी आपण जिथुन donate करत असाल तो पर्याय निवडुन घ्यायचा.

● मग पुढे आपल्याला एक फाँर्म दिला जातो तो व्यवस्थित भरून घ्यायचा.ज्यात आपला ईमेल नाव,अँड्रेस मोबाइल नंबर,पँन कार्ड नंबर,इत्यादी.

● मग यानंतर पीएम केअर फंडच्या खात्याचे नाव: पीएम केअर्स हे टाकायचे.

● खाते क्रमांक टाकायचा जो 2121 PM20202 असा आहे.

● यानंतर IFSC कोड /स्वीप्ट देखील टाकायचा SBIN0000691/
स्विफ्ट कोड: SBIINBB104

● बँक आणि शाखेचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा नवी दिल्ली युपीआय आयडी: pmcares@sbi

हे सर्व टाकुन झाल्यानंतर आपण डेबिट कार्ड ,क्रेडीट कार्ड,इंटरनेट बँकिंग तसेच गुगल पे,फोन पे,भीम अँप,पेटियम इत्यादी कुठल्याही माध्यमादवारे आपला फंड जमा करू शकतो.

पीएम केअर फंडमध्ये एकुण किती पैसे आहेत?

अलीकडेच काही महिन्यांपुर्वी पीएम केअर्स फंडच्या आँफिशिअल वेबसाइटवर पीएम केअर फंडचा मागील एक ते दोन वर्षांचा लेखाजोखा सादर करण्यात आला होता.

See also  फक्त बोलण्याच्या शैलीवरुन‌ एखाद्या व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीमत्व कसे जाणुन घ्यायचे? - How to know the personality of a person from the style of speaking?

त्यात दिलेल्या माहितीनुसार,पीएम केअर फंडमध्ये एकूण 10,990 कोटी रुपये जमा झाले आहेत.

पीएम केअर फंडचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

पीएम केअर फंडचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.

पीएम केअर फंडचे सभासद कोणकोण आहेत?

पीएम केअर फंडचे सभासद गृहराज्यमंत्री अमित शाह,अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहेत.

पीएम केअर फंडचे चेअरमन कोण आहेत?

पीएम केअर फंडचे चेअरमन नरेंद्र मोदी हे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा