प्रधानमंत्री किसान मानधन योजना – PM Kisan Mandhan Yojana Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group
PM Kisan Mandhan Yojana Marathi

वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसाय खूप अनिश्चित स्वरूपाचा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडते. शेतकऱ्यांना उतार वयात म्हणजे साठी नंतर शेतात काम करण्याची क्षमता कमी होते. अशा उतार वयात त्यांना निश्चित उत्पन्नाची हमी हवी असते. जेणेकरून ते स्वाभिमानाने आणि चांगले जीवन जगू शकतात.

केंद्र शासनाने लघू आणि सीमान्तिक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक संरक्षण व सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान मानधन योजना योजना सन २०१९ मध्ये सुरू केली आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना वय वर्ष ६० नंतर मासिक रुपये ३००० /- पेन्शन मिळणार आहे.

या योजनेची ठळक वैशिष्ट्ये व लाभार्थी पात्रता निकष

  • या योजनेत दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी २ हेक्टरपर्यंत वहितीखाली क्षेत्र असलेले १८ ते ४० वयोगटातील शेतकरी भाग घेण्यास पात्र.
  • त्यांच्या नावावर जमीन असल्याबाबत ७/१२ व ८ अ चा उतारा असणे आवश्यक.
  • या योजनेअंतर्गत वय वर्ष ६० नंतर मासिक रुपये ३००० पेन्शन.
  • शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस रुपये १५१००/- प्रतिमहिना कुटुंब निर्वाह निधी म्हणून दिला जाणार.
  • लाभार्थीच्या क्‍्यानुसार विमा हप्ता हा रुपये ५५/- ते रु. २००/- प्रतिमहिना आहे. हा हप्ता त्यांनी त्यांच्या ६० वयापर्यंत भरायचा.
  • यात लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे आधार कार्ड आणि त्याचे बँक खाते सेवा तपशील असणे आवश्यक.

योजनेसाठी अपात्र व्यक्‍ती पुढीलप्रमाणे.

  • राष्ट्रीय पेन्शन योजना, कामगार राज्य विमा महामंडळ योजना, कामगार व रोजगार मंत्रालयाच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि प्रधानमंत्री व्यापारी मानधन योजना यात भाग घेतलेल्या व्यक्‍ती.
  • सर्व संस्थात्मक भूधारक. सर्व संवैधानिक पदे धारण करणारे आजी ब माजी पदाधिकारी. आजी व माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी व माजी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य
  • आजी व माजी महापौर. आजी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.
  • सध्या सेवेत असलेले व सेवानिवृत्त सर्व केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी/कर्मचारी.यात केंद्र व राज्य शासन अंगीकृत व्यवसाय, स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी (यात वर्ग ४ चे कर्मचारी वगळून)
  • सर्व आयकर (इन्कम टॅक्स) भरणाऱ्या व्यक्ती आणि डॉक्टर, अभियंता, वकील, सनदी लेखापाल, आकिंटेक्ट अशा व्यावसायिक सुविधा पुरविणाऱ्या व्यक्‍ती या अपात्र असतील.
See also  शेवगा लागवड - Moringa Cultivation Maharashtra

इतर ठळक वैशिष्ट्ये

  • यात लाभधारक शेतकऱ्याचा पेन्शन घेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस ५० टक्के म्हणजेच रुपये १५००/- प्रति महिना कुटुंब निर्वाह निधी मिळेल.
  • पात्र लाभार्थ्यास पेन्शन विमा हप्ता सुरू असताना कायमस्वरूपी विकलांगता प्राप्त झाल्यास, त्याची पत्नी या योजनेत विमा हप्ता भरून सहभाग पुढे चालू ठेवू शकते किंवा लाभार्थ्याने भरलेला विमा हप्ता व त्यावरील जमा झालेले व्याज त्यांना परत मिळू शकते.
  • ५७ लाभार्थ्याने योजनेत सहभाग घेतल्यानंतर १० वर्षाच्या आत योजनेतील सहभाग काढून घेतल्यास त्याने भरलेला विमा हप्ता व बचत खात्यानुसार देय व्याज त्यास मिळेल.
  • जर पात्र लाभार्थ्यांना सहभाग घेतल्यानंतर १० वर्षाच्या कालावधीनंतर व ६० वर्ष पूर्ण होण्याच्या आधी सहभाग काढून घेतल्यास त्यास त्याने जमा केलेला विमाहप्ता व त्यावर मिळालेले प्रत्यक्ष पेन्शन फंद्य कडून जमा झालेले व्याज किंवा बचत खात्यावरील व्याजदर याप्रमाणे मिळणारे व्याज यापैकी जी रक्कम जास्त असेल ती मिळेल.
  • जर पात्र लाभार्थ्यांना नियमित विमाहप्ता भरत असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी सदर विमा हफ्ता पुढे नियमित भरून योजनेतील सहभाग चालू ठेवू शकते किंवा तिला लाभार्थ्याने भरलेला विमा हप्ता व त्यावरील निर्वाह निधी नुसार जमा झालेले व्याज किंवा बचत खात्यावरील व्याज दरानुसार मिळणारे व्याज यापैकी जास्त रक्कम असेल ती मिळेल.
  • पेन्शन घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचा किंवा त्याच्या पती किंवा पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर जी रक्कम असेल प्रति निर्वाह निधीमध्ये जमा होईल.

वयानुसार लाभार्थ्याने भरावयाचा मासिक हप्ता

  • वरीलप्रमाणे असलेल्या मासिक हप्त्याइतकी रक्कम केंद्र शासन सदर लाभार्थ्यांच्या खाती भरणार आहे.
  • यात आर्थिक परताव्याच्या दृष्टीने विचार केल्यास योजनेत भाग घेताना ४० वर्ष वय असलेल्या लाभार्थीस भरावी लागणारी रक्कम आणि मिळणारा परतावा पुढीलप्रमाणे असेल.
  • रु. २०० /- प्रति महिनानुसार वर्षभराचा हप्ता – रु. २४००/-
  • वयाचे ६० वर्षापर्यंत होणारी हप्त्याची एकूण रकम – रु. ४८,०००/-
  • वय ६० व या नंतर दरमहा मिळणारी पेन्शन- रु. ३०००/-
  • लाभार्थीने ७० क्‍यापर्यंत लाभ घेतला तर १० वर्षात त्याला मिळणारी
  • रक्कम रु. ३.६० लाख. तर ८० वयापर्यंत रु. ७.२० लाख.
  • यात भाग घेण्यासाठी शेतकरी https://maandhan.in/auth/login वर ऑनलाइन अर्ज करून भाग घेऊ शकतो. किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार
See also  जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृती दिवस विषयी माहिती - World elder abuse awareness day information in Marathi

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा