पोस्ट ऑफिसमधील व्याजदरात वाढ झालेल्या योजना अणि त्यांचे व्याजदर – Post office scheme increased interest rates in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

पोस्ट ऑफिसमधील व्याजदरात वाढ झालेल्या योजना अणि त्यांचे व्याजदर Post office scheme increased interest rates in Marathi

नवीन आर्थिक वर्षापासून पोस्ट ऑफिसमधील अनेक योजनांच्या व्याजदरामध्ये बदल घडुन आले आहेत.

हे व्याजदर आधी किती होते अणि यात नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला किती वाढ झाली आहे हेच आज आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

सुकन्या समृद्धी योजना – Sukhnya Samruddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना ह्या योजनेवर मागील तिमाही मध्ये ७.६ टक्के व्याजदर होते हे व्याजदर आता ८ टक्के करण्यात आले आहे.

Centre hikes interest rates on small savings schemes by up to 70 basis points

पब्लिक प्रोव्हीडंट फंड – PPF

पब्लिक प्रोव्हीडंट फंड यावर मागील तिमाही मध्ये ७.१ टक्के व्याजदर दिले जात होते.याच्यात कोणतीही वाढ अद्याप तरी केली गेली नाहीये.

आवर्ती ठेव खाते – Year recurring deposits

आवर्ती ठेव खाते ज्यावर मागील तिमाही मध्ये ५.८ टक्के इतके व्याजदराची आकारणी केली जात होती त्यावर आता ६.२ टक्के इतके व्याजदर आकारले जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना – SCSS

ज्येष्ठ नागरिक बचत योजना वर मागील तिमाही मध्ये आठ टक्के इतके व्याजदर दिले जात होते आता है व्याजदर ८.२ टक्के इतके केले जाणार आहे.

पोस्ट आॅफिस बचत खाते –

पोस्ट आॅफिस बचत खात्याचा व्याजदर हा जानेवारी २०२३ पासुन मार्च २०२३ पर्यंत ४ टक्के इतका होता.

अणि नवीन आर्थिक वर्षापासून एप्रिल २०२३ पासुन देखील हा व्याजदर तितकाच ठेवला गेला आहे.

मुदत ठेव – FIXED DEPOSITS

यात नागरीकांना किमान एक ते पाच वर्षे कालावधीकरीता ठेवी ठेवण्याची मुभा दिली जाते.

यात एक वर्षाच्या मुदतठेवीवर मागील तिमाही मध्ये ६.६ टक्के इतके व्याजदर आकारले जात होते.पण आता हे व्याजदर वाढवण्यात आले असुन हे व्याजदर आता ६.८ टक्के इतके केले गेले आहे.

दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर मागील तिमाही मध्ये ६.८ टक्के इतके व्याजदर आकारले जात होते.पण आता हे व्याजदर देखील वाढवण्यात आले आहे हे व्याजदर आता ६.९ टक्के इतके झालेले आपणास दिसून येईल.

See also  Shark Tank India बिझनेस शो विषयी माहिती - Shark Tank India information in Marathi

तीन वर्षांच्या मुदत ठेवी वर मागील तिमाही मध्ये ६.९ टक्के इतके व्याजदर आकारले जात होते आता हे व्याजदर वाढवण्यात आले असून हे ७ टक्के इतके आकारले जाणार आहे.

पाच वर्षाच्या मुदतठेवीवर जिथे आपणास मागील तिमाही मध्ये ७ टक्के व्याजदर लागु करण्यात आले होते त्या व्याजदरात देखील आता वाढ केली जात आहे हे व्याजदर ७.५ टक्के इतके केले जाणार आहे.

मासिक उत्पन्न योजना – Monthly income schemes

मासिक उत्पन्न योजनेवर मागील तिमाही मध्ये ७.१ टक्के इतके व्याजदर दिले जात होते आता हे व्याजदर नवीन आर्थिक वर्षापासून ७.४ टक्के इतके केले जाणार आहे.

राष्ट्रीय बचत योजना – National saving certificates

राष्ट्रीय बचत योजनेवर मागील तिमाही मध्ये सात टक्के व्याजदर दिले जात होते आता ते व्याज दर मध्ये ७.७ टक्के इतके करण्यात आले आहे.

किसान विकास पत्र – KIsan vikas Patra

किसान विकास पत्र ह्या योजनेवर मागील तिमाही मध्ये ७.२ टक्के व्याजदर दिले जात होते आता हे व्याजदर वाढवण्यात आले आहे आता ह्या योजनेत ७.५ टक्के व्याजदर दिले जाणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा