PM-KMY -प्रधानमंत्री किसान मानधन योजना विषयी माहीती-2023 Updates – Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana (PM-KMY)

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

PM-KMY -प्रधानमंत्री किसान मानधन योजना- Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana (PM-KMY)

 

प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान मानधन ही एक सरकारी योजना आहे.

ही योजना भारत देशामधील जेवढेही अल्पभुधारक तसेच लहान शेतकरी आहेत त्यांच्याकरीता अमुल्य योगदान देणारी पेंशन योजना ठरणार आहे.

ह्या योजनेच्या मार्फत सर्व अल्पसंख्यांक अणि अल्पभुधारक शेतकरयांना महिन्याला तीन हजार म्हणजे वर्षाला एकुण ३६ हजार रूपये इतकी पेंशन दिली जाते.

यात ६० वय झाल्यानंतर शेतकरींना महिन्याला तीन हजार रूपये इतके पेंशन दिले जाते.अणि समजा योजनेत सहभागी झालेल्या शेतकरयाचा अचानक मृत्यु झाला तर त्याच्या पत्नीला देखील १५०० रूपये मासिक पेंशन दिले जाते.

महत्वाची बाब म्हणजे ह्या योजनेमध्ये शेतकरी जितक्या पैशांचे योगदान आपल्याकडुन देतील तितकीच रक्कम त्यांना केंद्राकडून देण्यात येत असते.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना कधी सुरू करण्यात आली होती?– Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana (PM-KMY)

प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ३१ मे २०१९ रोजी केंद्र सरकार कडुन प्रारंभित करण्यात आली होती.

See also  आयकर विभागामध्ये दहावी तसेच पदवी उत्तीर्ण ७१ उमेदवारांची भरती सुरू INCOME TAX RECRUITMENT 2023 IN MARATHI

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे मुख्य उददिष्ट काय आहे?

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे मुख्य उददिष्ट पुढीलप्रमाणे आहेत –

● प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही छोटया अणि गरीब शेतकरी वर्गाला स्वावलंबी बनविण्यासाठी,वृदधाल्पकाळात म्हणजेच ६० वय झाल्यानंतर त्यांच्या आर्थिक गरजा त्यांना स्वता भागवता याव्यात,शेतकरी वर्ग हा आर्थिक दृष्टया सक्षम व्हावा यासाठी सुरू करण्यात आली आहे.

● प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही गरीब अणि छोटया शेतकरी वर्गाला सामाजिक सुरक्षा पुरविण्यासाठी तसेच त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शेतकरयांचा अधिकाधिक आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सरकारने सुरू केली आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ कोणाकोणाला घेता येणार आहे?

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ देशातील सर्व लहानात लहान भुमिहिन अल्पसंख्याक,अल्पभुधारक गरीब शेतकरी वर्गाला घेता येणार आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत?

● ओळखपत्र म्हणुन आधार कार्ड

● उत्पन्नाचे प्रमाण

● बँकेचे खाते पासबुक

● अर्जदार व्यक्तीचे वय किमान १८ ते ४० वयोगटाच्या दरम्यान असावे.

● अर्जदाराची दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेली शेतजमिन असायला हवी.

● पासपोर्ट साईज दोन फोटो

● वय प्रमाणपत्र

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी रेजिस्ट्रेशन कसे करायचे?

प्रधानमंत्री किसान मानधन योजना साठी रेजिस्ट्रेशन करायला आपणास आपल्या शहरातील नजीकच्या काँमन सीएससी सेंटरवर जावे लागेल.अणि आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड बँक पासबुक इत्यादी देऊन आपली नावनोंदणी करावी लागते.किंवा आपण आँनलाईन सेल्फ रेजिस्टर देखील करू शकतो.

जर एखादा शेतकरी वयाच्या १८ व्या वर्षी ह्या योजनेस सुरूवात करत असेल तर त्याचा मासिक हप्ता रु.५५ आणि वार्षिक 660 इतका होईल.

आणि समजा जर शेतकरी 40 वर्षांचा असेल तर त्याचे मासिक रु. 200 प्रीमियम आणि वार्षिक 2400 रूपये प्रीमियम येईल.

कोणते शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नही?

● नँशनल पेंशन स्कीम,कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजना,कर्मचारी निधी संस्था योजना इ. यासारख्या इतर कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट होत असलेल्या छोट्या शेतकरी वर्गाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नही.

See also  10th,12 The Pass Candidate Recruitment - सीमा सुरक्षा दलामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सु

● ज्या शेतकऱ्यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ह्या योजनेची निवड केली आहे.अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ उठविता येणार नहीये.

● ज्या शेतकऱ्यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रधानमंत्री लघु व्यापारी मान-धन योजनेची निवड केली आहे त्यांना सुदधा यातुन वगळले गेले आहे.

प्रधामंत्री किसान मानधन योजनेची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?

https://pmkmy.gov.in/ ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची आँफिशिअल वेबसाइट आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा