राजस्थान सरकारने पास केलेल्या राईट टू हेल्थ बीलचे रूग्णांना होणारे फायदे कोणकोणते आहेत -Right to health bill benefits for patients in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

राजस्थान सरकारने पास केलेल्या राईट टू हेल्थ बीलचे रूग्णांना होणारे फायदे कोणकोणते आहेत right to health bill benefits for patients in Marathi

राजस्थान राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना एमरजन्सी मध्ये स्वतावर मोफत उपचार करून घेता यावेत यासाठी राजस्थान सरकारने एक बील पास केले आहे ज्याचे नाव आहे राईट टू हेल्थ बील.

असे करून राजस्थान राज्य हे रूग्णांना आरोग्य स्वास्थ विषयक अधिकार देणारया भारत देशातील राज्यांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर देखील पोहोचले आहे.

आजच्या लेखात आपण हे जाणुन घेणार आहोत की ह्या राईट टू हेल्थ बीलमधुन राजस्थान राज्यातील रहिवासी असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना राजस्थान सरकारने पास केलेल्या ह्या आरोग्य विषयक विधेयकामुळे कोणकोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

तसेच हे विधेयक नागरीकांसाठी किती फायदेशीर ठरणार आहे.

राईट टू हेल्थ बीलचे राजस्थान राज्यातील रूग्णांना होणारे फायदे कोणकोणते आहेत?

१) आपत्कालीन परिस्थितीत रूग्णांवर केले जातील मोफत उपचार –

कुठल्याही एमरजन्सी मध्ये असलेल्या म्हणजेच तत्काळ उपचाराची आवश्यकता आहे अशा रूग्णाला ह्या राईट टू हेल्थ बील अंतर्गत सरकारी तसेच खासगी रूग्णालयात मोफत उपचार प्राप्त करून दिला जाणार आहे.पण या मोफत उपचारासाठी तो रूग्ण एमरजन्सी पेशंट असणे आवश्यक आहे तसेच तो राजस्थान राज्यातील रहिवासी असणे देखील गरजेचे आहे.तरच त्याला ह्या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे.

या उपचारासाठी त्या रूग्णाकडुन कुठलेही उपचार शुल्क आकारले जाणार नाही किंवा त्यांच्याकडुन उपचारासाठी फी देखील डाॅक्टरांकडुन घेतली जाणार नाही.

२) रूग्णांना दिली जाणार फ्री मध्ये अॅम्ब्युलनसची सर्विस –

राईट टू हेल्थ बील मध्ये असे नमुद केले आहे की सर्व एमरजन्सी रूग्णांना अॅम्ब्युलनसची सर्विस देखील मोफत मध्ये दिली जाणार आहे.

म्हणजे समजा एखाद्या खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात एखाद्या रुग्णावर उपचार सुरू आहेत पण त्या रूग्णाचे स्वास्थ अधिक गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी दुसरया रुग्णालयात पाठवायचे आहे अशा वेळी रूग्णाला पुढील उपचारासाठी दुसरया रुग्णालयात पाठविण्यासाठी फ्री अॅम्ब्युलनसची सर्विस देखील दिली जाणार आहे असे या विधेयकात दिले आहे.

See also  हिंदू धर्मात मोहीनी एकादशीचे महत्त्व काय आहे?

३) प्रत्येक रूग्णाला हेल्थ इन्शुरन्सची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार –

राजस्थान राज्यातील प्रत्येक नागरीकाला आरोग्य सुरक्षेच्या हेतुने हेल्थ इन्शुरन्सची सुविधा देखील प्रदान करण्यात येणार आहे असे या विधेयकात दिले गेले आहे.

४) रूग्णांवर केल्या जात असलेल्या उपचाराची सर्व माहिती प्राप्त होणार –

रूग्णालयामध्ये रूग्णावर जो काही उपचार सुरू आहे त्याची सर्व माहिती त्या उपचार केल्या जात असलेल्या पेशंटला अणि त्याच्या कुटुंबियांना दिली जाईल असे देखील या विधेयकात म्हटले आहे.

५) आपात्कालीन परिस्थितीत अॅडव्हानस्ड पेमेंट न करता देखील केले जातील रूग्णांवर उपचार

आधी कुठल्याही एमरजन्सी कंडिशन मध्ये असलेल्या रूग्णावर एमरजन्सी ट्रिटमेंट उपचार करण्यासाठी उपचारासाठी खाजगी रूग्णालयात भरती करत असलेल्या रूग्णाच्या घरच्यांना कुटुंबियांना रूग्णालयात अॅडव्हानस्ड पेमेंट करावे लागायचे मग त्याच्यावर एमरजन्सी ट्रिटमेंट खाजगी डाॅक्टरांकडुन केली जायची.

पण आता राईट टू हेल्थ बील ह्या विधेयकानुसार कुठल्याही एमरजन्सी कंडिशन मध्ये असलेल्या रूग्णावर सरकारी तसेच खाजगी रूग्णालयांना देखील कुठलेही अॅडव्हानस्ड पेमेंट न घेता एमरजन्सी ट्रिटमेंट करावी लागणार आहे.

याचसोबत एमरजन्सी ट्रिटमेंट मध्ये जसे की पेशंटला एमरजन्सी मध्ये आयसी यु मध्ये दाखल करणे,महिला पेशंटसची एमरजन्सी डिलीव्हरी करणे,अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूग्णावर एमरजन्सी उपचार करणे,पुढील उपचारासाठी गंभीर रूग्णांना अॅम्ब्युलनस दवारे दुसरया रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे

यासाठी लागणारया ज्या काही सेवा सुविधा पेशंटला देणे गरजेचे आहे त्या देखील खाजगी रूग्णालयांना द्यावा लागणार आहे.

६) कोणताही आरोग्य सेवा प्रदाता वैद्यकीय कायदेशीर बाबीत रूग्णावर उपचार करण्यासाठी विलंब करू शकणार नाही.

म्हणजे समजा खाजगी रूग्णालया मध्ये एमरजन्सी मध्ये उपचारासाठी आलेल्या पेशंटच्या आरोग्य विषयी काही वैद्यकीय तसेच कायदेशीर बाब असेल

तरी देखील आता आरोग्य सेवा प्रदाता यांना पोलिसांकडून दिले जाणारे एन ओसी मिळाले नाही किंवा पोलिस रिपोर्ट मिळाला नाही या कारणांच्या आधारावर रूग्णावर उपचार करण्यासाठी उशिर करता येणार नाही.असे या विधेयकात दिले आहे.

See also  LIC जीवन आझाद पॉलिसी २०२३ विषयी माहिती - Lic jeevan Azad policy 2023 information in Marathi  

७) महामारी मध्ये देखील रूग्णांवर मोफत उपचार केले जाणार –

समजा राजस्थान राज्यात एखादी कोरोना सारखी महामारी आली अणि लोकांवर एमरजन्सी उपचार करण्याची वेळ आली तर हे आपात्कालीन परिस्थितीत केले जाणारे हे उपचार देखील राईट टू हेल्थ बील अंतर्गत येथील नागरीकांसाठी मोफत असणार आहे.

८) उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पेशंटचे शव कुटुंबाला दिले जाईल-

समजा एखाद्या खाजगी रूग्णालयामध्ये एमरजन्सी मध्ये उपचारासाठी अॅडमिट झालेल्या गंभीर असलेल्या रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

अणि रूग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींना रूग्णालत रूग्णाच्या उपचारावर करण्यात आलेला खर्च आर्थिक परिस्थिती मुळे काही इतर कारणांमुळे नाही देता आला तेव्हा अशा परिस्थितीत खाजगी रूग्णालय पेशंटचे शव त्याच्या कुटुंबियांना देण्यास मनाई करत असते.

पण या राईट टू हेल्थ बील मुळे पेशंटचा खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला अणि रूग्णाच्या कुटुंबातील लोकांनी रूग्णालयाची फी दिली नाही तरी देखील रूग्णालयाला मृत पेशंटचे शव आपल्या दवाखान्यात ठेवता येणार नाहीये.

९) रूग्णावर कुठलीही एमरजन्सी शस्त्रक्रिया करण्याआधी आधी त्याला कळवावे लागेल

जर रूग्णालयाला उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णावर एमरजन्सी मध्ये कुठलीही शस्त्रक्रिया करायची असेल

किंवा त्याची किमो थेरपी करायची असेल तर अशा परिस्थितीत आधी रूग्णालयाला याबाबद रूग्णाला अणि त्यांच्या कुटुंबीयांना सुचित करावे लागेल यासाठी त्यांची परवानगी देखील घ्यावी लागणार असल्याचे या विधेयकात दिले आहे.

१०) महिलांच्या शारीरिक चाचणी मध्ये किमान एक महिलेची उपस्थिती अनिवार्य असणार

समजा रूग्णालयात एखाद्या महिलेवर उपचार सुरू आहेत अणि उपचारादरम्यान महिलेच्या पुरूष कर्मचारी कडुन काही शारीरिक चाचण्या घेतल्या जात असतील तर ह्या शारीरिक चाचणी दरम्यान एक महिला उपस्थित असेल असे ह्या विधेयकात दिले आहे.

राईट टू हेल्थ बील मध्ये केलेल्या इतर तरतुदी –

  1. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णाला उपचारासाठी रूग्णालयामध्ये जेवढ्याही इतर पर्यायी पदधती मेथड सांगितल्या जात असतात त्यापैकी कोणती पद्धत निवडायची कोणती पदधत नाही निवडायची हे स्वता रूग्णास ठरवता येईल असे या विधेयकात दिले आहे.
  2. रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णावर जे काही उपचार केले जात आहेत त्यात त्याला कोणती फॅसिलिटी सर्विस दिली जाते आहे त्या सर्विस फॅसिलिटीचे एकुण रेट काय आहेत त्यावर किती टॅक्स आकारला जात आहे हे सर्व रूग्णाला जाणुन घेता येईल.
  3. खाजगी रूग्णालयाला देखील उपचारासाठी आलेल्या रूग्णाचा आजार गुपित ठेवणे बंधनकारक असणार आहे.
  4. राईट टू हेल्थ बील अंतगत दिल्या जात असलेल्या हेल्थ इन्शुरन्स स्कीम मध्ये आपल्या उपचारासाठी ज्या रूग्णालयांची निवड राजस्थान मधील नागरीक करतील त्यांना त्या रूग्णालयामध्ये कुठलेही शुल्क न भरता उपचार प्राप्त करून दिला जाणार आहे.
  5. याचसोबत रस्ते अपघातामध्ये मोफत अॅम्ब्युलनसची सर्विस,फ्री मध्ये एमरजन्सी उपचार प्राप्त करण्याचा अधिकार रूग्णाला दिला जाणार आहे अणि आरोग्य सुरक्षा करीता इन्शुरन्स कव्हर देखील दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
  6. रूग्णालयामध्ये आपात्कालीन परिस्थितीत उपचारासाठी आलेल्या रूग्णाला अणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा प्रदाता यांच्या सोबत कुठलेही गैरवर्तन दुरव्यवहार करता येणार नाही.अणि रूग्णाचा अनैसर्गिक रीत्या मृत्यू झाला तर त्याचा पोसटमार्टम करण्याची परवानगी देखील मृत झालेल्या रूग्णाच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा प्रदाता यांना द्यावी लागेल.
See also  महाराणा प्रताप जयंती शुभेच्छा २०२३ मराठीत । Maharana Pratap Jayanti 2023 Wishes In Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा