राईट टू रिपेअर पोर्टल म्हणजे काय?Right to repair portal information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

राईट टू रिपेअर पोर्टल म्हणजे काय?Right to repair portal information in Marathi

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबर २०२२ रोजी पीयुष गोयल केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री यांनी सर्व ग्राहकांसाठी एक पोर्टल लाॅच केले होते ज्याचे नाव आहे राईट टू रिपेअर पोर्टल.

आजच्या लेखात आपण हे राईट टू रिपेअर पोर्टल म्हणजे काय?ह्या पण पोर्टलचे महत्व काय आहे नागरिकांना ह्या पोर्टलचा काय फायदा होणार आहे.हेच सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

Right to repair portal information in Marathi

राईट टू रिपेअर म्हणजे काय? What is right to repair in Marathi

राईट टू रिपेअर म्हणजे दुरुस्तीचा अधिकार होय.हा एक अधिकार आहे जो भारत सरकार ग्राहकांच्या सुविधेसाठी सुरू करणार आहे.

राईट टू रिपेअर पोर्टल म्हणजे काय? right to repair portal meaning in Marathi

हे ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेले एक आॅनलाईन पोर्टल आहे.जे २४ डिसेंबर २०२२ रोजी पीयुष गोयल यांच्या हस्ते लाॅच करण्यात आले होते.

राईट टू रिपेअर पोर्टलचे तसेच राईट टू रिपेअर कायद्याचे महत्व काय आहे? importance of right to repair portal and right to repair policy in Marathi

  • राईट टू रिपेअर हे एक असे आॅनलाईन पोर्टल तसेच ठिकाण आहे जिथे सर्व कंपनीकडुन तयार केल्या जात असलेल्या विविध उत्पादनांची प्रोडक्ट सर्विसेसची माहीती ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते.
  • कोणती वस्तु तसेच उत्पादनाचा दर किती आहे ते उपलब्ध आहे किंवा नाही हे देखील इथे दिले जाते.
  • समजा एखाद्या मोबाईल वापरकर्त्याचा मोबाईल खराब झाला किंवा त्याने कंपनीकडुन विकत घेतलेली कुठलेही इलेक्ट्रॉनिक वस्तु खराब झाली जसे की लॅपटाॅप टॅब इत्यादी तर तो ती वापरकर्ता ती इलेक्ट्रॉनिक वस्तु दुरूस्त करण्यासाठी सर्विस सेंटरला जात असतो.
  • अशा परिस्थितीत काही सर्विस सेंटर वाले आपल्या ग्राहकांना खराब झालेल्या जुन्या वस्तुंची दुरुस्ती करून देत नसतात.अणि याजागी त्यांना दुकानात विक्रीसाठी आलेली एखादी नवीन वस्तू खरेदी करण्यास भाग पाडत असतात.
  • पण आता राईट टू रिपेअर कायद्या अंतर्गत प्रत्येक सर्विस सेंटर वाल्यास ग्राहकाने दुरुस्ती साठी आणलेल्या कुठलेही इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनाची दुरूस्ती करून देणे अनिवार्य असणार आहे.
  • त्या इलेक्ट्रॉनिक वस्तु उत्पादनाचा विशिष्ट
    पार्ट सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाहीये तसेच तो कालबाह्य झालेला आहे अशी कारणे देऊन वस्तुची दूरूस्ती करण्यास सर्विस सेंटर वाल्यास नकार देता येणार नाही.
  • तसेच सर्विस सेंटर वाल्याला आपल्या ग्राहकांना या कायद्या अंतर्गत वस्तुंची दुरूस्ती करून देण्यास नकार देखील देता येणार नाही.
  • ह्या कायद्यामुळे ग्राहकांचा जुनी वस्तु दुरूस्त न होत असल्यामुळे दुकानात नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी होत असलेला जो नाहक खर्च होता तो आता ह्या राईट टू रिपेअर कायद्यामुळे वाचणार आहे.
  • कारण या कायद्यामुळे सर्व कंपन्यांना कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तु उत्पादनाच्या नवीन पार्ट सोबत जुने पार्ट देखील जवळ बाळगणे बंधनकारक असणार आहे.
  • कारण ह्या कायद्यानुसार ग्राहकांना जुनी वस्तु दुरूस्त करून देण्याची पुर्ण जबाबदारी उत्पादन निर्माण करत असलेल्या कंपनींवर येणार आहे.
See also  Men's Day आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाविषयी माहीती - International Men's Day Information In Marathi

या नवीन नियमानुसार मार्केट मध्ये असे प्रोडक्ट विक्रीला येणार जे कंपनीला नंतर भविष्यात रिपेअर करता येतील.अणि त्यांचे पार्ट देखील मार्केट मध्ये सहजपणे उपलब्ध होऊन जाणार.

यामुळे आता एखाद्या मोबाईलचा तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तु उत्पादनाचा एक पार्ट खराब झाल्यावर कंपनी पुर्ण मोबाईलची/इलेक्ट्रॉनिक आयटमची बाॅडी पार्टस बदलायला किंवा नवीन मोबाईल नवीन इलेक्ट्रॉनिक आयटम विकत घेण्यासाठी ग्राहकांना फोर्स करू शकणार नाही.याने ग्राहकांचे बराच खर्च वाचणार आहे.

जुन्या वस्तू फेकुन देण्याच्या,काढुन टाकण्याच्या संस्कृती मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा कायदा सुरू करण्याचे ठरवले आहे.

राईट टू रिपेअर पोर्टलचे फायदे –

राईट टू रिपेअर पोर्टलवर जाऊन ग्राहक आपल्या खराब झालेल्या वस्तुची दुरुस्ती करण्यासाठी आपणास एकुण किती खर्च येईल हे ह्या पोर्टलच्या माध्यमातून जाणुन घेऊ शकणार आहे.

खराब झालेल्या वस्तुची दुरुस्ती करण्यासाठी आपणास कोणकोणत्या पार्टसची आवश्यकता भासेल तसेच त्या पार्टसची किंमत काय असेल हे देखील ग्राहकांना आता ह्या नवीन पोर्टलमुळे जाणुन घेता येणार आहे.

ह्या पोर्टलवर ग्राहक खरेदी करत असलेल्या किंवा ग्राहकाने खरेदी केलेल्या सर्व कॅटॅगरी मधील इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट,वस्तु,उत्पादनांची माहीती देखील दिलेली राहणार आहे.

राईट टू रिपेअर अंतर्गत ग्राहकांचे कोणकोणते उपकरण दुरुस्त केले जातील?

  • मोबाईल
  • लॅपटॉप
  • टॅब
  • इतर इलेक्ट्रॉनिक वस्तु
  • कंझ्युमर ड्युरेबल्स म्हणजे ग्राहक टिकाऊ वस्तू कृषी अणि आॅटोमोबाईल उपकरणे इत्यादी
  • राईट टू रिपेअर पोर्टल वर एखाद्या कंपनीची तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहकांनी काय करायचे?
  • सर्वप्रथम ग्राहकांनी राईट टू रिपेअरच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जायचे आहे righttorepairindia.gov.in
  • होमपेजवर दिलेल्या file and complaint ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपल्या प्रोडक्ट वस्तुचा प्रकार कोणता आहे हे product type मध्ये जाऊन सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
  • ग्राहकाने विचारलेली आपली सर्व माहीती भरायची आहे आपली तक्रार काय आहे हे देखील तिथे सांगायचे आहे.अणि आपली तक्रार सबमिट करून द्यायची आहे.
  • यानंतर ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रारीवर ग्राहक व्यवहार विभागाकडुन योग्य ती कारवाई केली जाईल.
  • याने ग्राहकास तक्रार दाखल करण्यासाठी कुठल्या ग्राहक कार्यालयात जाण्याची देखील गरज पडणार नाही.
See also  Pareto principle काय आहे (80/20) - Pareto principle Information in Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा