संदीप माहेश्वरी जीवन चरित्र – Sandeep Maheshwari information in Marathi
संदीप माहेश्वरी हे आजच्या तरूण पिढीसाठी प्रेरक ठरत असलेले अत्यंत प्रेरणादायी व्यक्ती आहेत.भारतातील अव्वल उद्योजकांच्या यादीत येणारे हे एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणून ओळखले जाते.
आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व यश संदीप माहेश्वरी यांनी फार कमी वेळात संपादित केले आहे.
पण हे सर्व यश प्राप्त करण्यासाठी त्यांना खुप संघर्ष करावा लागला होता.तेव्हा त्यांनी हे सर्व नाव,प्रसिदधी धनदौलत आज प्राप्त केली आहे.
आजच्या लेखात आपण संदीप माहेश्वरी यांच्याविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
जे आजच्या तरूण पिढीसाठी एक प्रेरणास्थान आहे. करोडो तरूण तरूणींना आपल्या मोटीव्हेशनल व्हिडिओदवारे ते आज युटयुबवर प्रेरित करण्याचे काम करीत आहे.आणि त्यांच्या जीवणातील संघर्षापासुन आपल्याला खुप काही प्रेरणा मिळते तसेच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.
चला तर मग जाणुन घेऊया संदीप माहेश्वरी यांच्या जीवनप्रवासाची माहीती अधिक सविस्तरपणे.
संदीप माहेश्वरी कोण आहेत?
संदीप माहेश्वरी हे एक मोटीव्हेशनल स्पीकर,सक्सेसफुल बिझनेसमँन,यशस्वी फोटोग्राफर तसेच ईमेजबजार डाँट काँमचे फाऊंडर तसेच सीईओ देखील आहेत.
ईमेज बाजार ही एक आँनलाईन वेबसाईट आहे.जिच्या पोर्टलवर लाखापेक्षा अधिक माँडेल्सचे फोटो जतन करण्यात आले आहे.हजारोच्या संख्येने कँमेरामन या वेबपेजवर काम करतात.
संदीप माहेश्वरी हे फक्त भारतातच नव्हे तर परदेशात देखील खुप प्रसिदध आहेत.संदीप माहेश्वरी हे तरूण युवक युवतींना जीवणात पुढे नेण्यासाठी आणि आपल्या भविष्याविषयी त्यांच्या मनात असलेल्या निराशा,शंका बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे सेमिनार आयोजित करीत असतात.
संदीप माहेश्वरी यांचे फ्री आणि मोटीव्हेशनल लाईफ चेजिंग सेमिनार हे तरूणांमध्ये खुप फेमस आहेत.
संदीप माहेश्वरी यांचा जन्म कुठे आणि केव्हा झाला?
- संदीप माहेश्वरी सर यांचा जन्म दिल्ली येथे 28 सप्टेंबर 1980 रोजी झाला होता.त्यांचे सध्याचे वय ४२ आहे.
संदीप माहेरश्वरी यांची कौटुंबिक माहीती, –
- संदीप माहेश्वरी हे सुदधा तुमच्या आणि माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील होते.
- संदीप माहेश्वरी यांच्या वडीलांचे नाव किशोर माहेश्वरी असे होते तर आईचे नाव राणी माहेश्वरी असे होते.त्यांचे वडील अँल्युमिनिअमचा व्यवसाय करायचे.त्यांना एक बहिण आणि एक भाऊ आहे.
- संदीप माहेश्वरी हे विवाहीत असुन यांच्या पत्नीचे नाव नेहा माहेश्वरी असे आहे.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.
संदीप माहेश्वरी यांचे शिक्षण,जीवनातील संघर्ष –
- संदीप माहेश्वरी सरांचे दहावी बारावी पर्यतचे शिक्षण दिल्लीतुनच झाले होते.जे संदीप माहेश्वरी आपल्या युटयुब चँनलवरून जगभरातील तरूण पिढीला मोटिव्हेट करतात खर पाहायला गेले तर ते स्वता दहावीपर्यत खुपच लाजाळु स्वभावाचे होते.
- आणि संदीप माहेश्वरी सरांचे खुपच मोजके मित्र असायचे त्यामुळे त्यांच्या एकाही मित्राशी कोणी बोलायला गेले तर संदीप माहेश्वरी यांना इन्सिक्युअर फिल व्हायचे.
- जेव्हा संदीप माहेश्वरी हे नुकतेच दहावी पास झाले होते तेव्हा काही कारणास्तव त्यांच्या वडिलांचा अ़ँल्युमिनिअमचा व्यवसाय ठप्प झाला होता.ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली होती.
- मग वडिलांचा व्यवसाय अचानक बंद पडल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी खुप अडचणींना तोंड द्यावे लागले.मग घरात हातभार लावण्यासाठी बारावीनंतर ते काहीतरी काम करून पैसे कमविण्याचा विचार करू लागले.
- संदीप माहेश्वरी हे एक क्रिएटिव्ह थिंकर होते.नेहमी काहीतरी आयुष्यात वेगळ काहीतरी करुन दाखवावे हाच विचार ते सतत करत असायचे.
- त्यांचे बीकाँम पर्यतचे शिक्षण त्यांनी किरोरीमल काँलेजमधुन पुर्ण केले पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अवघ्या दोन वर्षानंतरच त्यांनी त्यांचे बी.कांँमचे शिक्षण देखील सोडुन दिले.
- आणि त्यांनी एक नेटवर्क मार्केटिंग कंपनी जाँईन केली.ज्यात ते आपल्या घरातच सर्व प्रोडक्ट बनवायचे आणि विकायचे देखील.पण कोणी प्रोडक्ट विकत घेत नसल्याने त्यांचे हे काम देखील जास्त दिवस टिकले नाही.
यानंतर त्यांनी बरेच व्यवसाय करायचे प्रयत्न केले पण त्यात देखील त्यांना यश आले नाही.मग घरची परिस्थिती धकवण्यासाठी त्यांनी पीसीओ शाँपवर बसण्याचे काम देखील केले.
किरोडीमल काँलेजमध्ये शिकत असताना संदीप माहेश्वरी यांना माँडलिंग,फोटोग्राफी करायची आवड निर्माण झाली होती.
मग काही कालावधी त्यांनी माँडलिंगमध्येही आपला हात आजमावला आणि अनुभव प्राप्त केला.पण तिथे देखील खुप जण आपल्या करिअरसाठी स्ट्रगल करताना त्यांना दिसुन आले.
आणि मग अशा लोकांना प्रेरित करायला त्यांनी एक ध्येय ठरवले आणि आपल्या अनुभवाच्या आधारावर इतरांना प्रेरित करण्यास सुरूवात केली.पण यात देखील त्यांना पाहिजे तसे यश प्राप्त झाले नाही.
मग माँडलिंगमध्येही पाहिजे तसे यश प्राप्त न झाल्याने संदीप माहेश्वरी यांनी स्वताची एक आँडिओ व्हिडिओ प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी देखील सुरू केली.पण ती देखील फार काळ टिकु शकली नाही आणि काही कालावधीने बंद पडली.
२००२ मध्ये आपल्या काही मित्रांसोबत मिळुन संदीप माहेश्वरी यांनी अजुन एक कंपनी सुरू केली.पण ती देखील पाच ते सहा महिने चालली आणि बंद पडली.
अशा पदधतीने परिवारातील आर्थिक समस्या आणि वारंवार मिळणारे अपयश यामुळे संदीप माहेश्वरी खुपच त्रस्त झाले होते.मग त्यांनी स्वताचे मार्केटिंगवर एक पुस्तक देखील लिहिले पण त्याला देखील पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.
संदीप माहेश्वरी जीवनातल म्हत्वाचे पाऊल –Sandeep Maheshwari Biography in Marathi
- माँडलिंग करत असताना त्यांचा एक मित्र त्यांच्याकडे फोटो घेऊन आला होता आणि ती चित्रे पाहुन संदीपला देखील एकेकाळी फोटोग्राफी करण्याची आवड निर्माण झाली होती.मग संदीपने निराश न होता फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले आणि मग महागडा कँमेरा घेऊन संदीपने फोटोग्राफी करायला सुरूवात केली.
- फोटोग्राफीला एका नवीन पातळीकडे वळवून नवीन व्यवसायाचे स्वरूप कसे प्राप्त करून द्यावे हा विचार संदीपच्या मनात आला मग संदीप माहेश्वरी यांनी धाडस करत वर्तमानपत्रात फ्री पोर्टफोलिओची जाहीरात दिली.आणि ही जाहीरात वाचुन अनेक जण संदीपकडे येण्यास सुरूवात झाली.
इथुनच संदीप माहेश्वरी यांच्या फोटोग्राफी करिअरचा श्रीगणेशा झाला आणि पुढे जाऊन यात संदीप माहेश्वरी यांनी १२ तासांमध्ये शंभर माँडेल्सचे हजार फोटो काढले ज्यामुळे संदीप माहेश्वरी यांचे नाव लिम्का बुक्समध्ये नोंदवण्यात आले
- लिम्का बुकमध्ये नाव आल्यानंतर संदीप माहेश्वरी यांच्या फोटोग्राफीच्या व्यवसायात दिवसेंदिवस अधिक वाढ होऊ लागली.अनेक माँडेल्स आणि जाहीरातदार संदीपकडे येऊ लागले.
- आणि कालांतराने काही वर्षातच संदीप माहेश्वरी यांची कंपनी मोठी फोटोग्राफी एजंसी म्हणून उदयास केली.
- मग पुढे जाऊन संदीपने एक आँनलाईन इमेज बाजार नावाची फोटो शेअरींग वेबसाईट सुरू केली.आणि आज ह्याच कंपनीला भारतातील सर्वात मोठी आँनलाईन फोटोग्राफी कंपनी म्हणुन ओळखले जाते.
- आज संदीप माहेश्वरी यांच्या इमेजबाजार कंपनीत ५० हुन अधिक देशातील क्लाईट देखील येत आहेत.
संदीप माहेश्वरी यांना आत्तापर्यत कोणकोणते पुरस्कार प्राप्त झाले आहेत?
● बिझनेस वल्ड मासिकात सर्वोच उद्योजक म्हणुन संदीप माहेश्वरी यांची निवड करण्यात आली आहे.
● ग्लोबल मार्केटींग फोरमकडुन star youth achiever म्हणुन निवड देखील करण्यात आली होती.
● Et now चँनलद्वारे top entrepreneur चा पुरस्कार प्राप्त
● अनेक चँनल्सकडुन इंटरप्रिनर आँफ द ईअर म्हणुन घोषित करून सम्मानित करण्यात आले आहे.
● Creative entrepreneur of the year 2013 हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे.
संदीप माहेश्वरी यांची एकुण नेटवर्थ किती आहे?
संदीप माहेश्वरी यांची एकुण नेटवर्थ ३० करोड इतकी आहे.