एसबीआय बॅक खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!! – SBI KYC updates

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

एसबीआय बॅक खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!!

एसबी आय करीत आहे या खातेधारकांचे खाते बंद

SBI KYC updates
SBI KYC updates

ज्या बॅक खाते धारकांचे खाते एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची सुचना आहे.

आपल्या भारत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बरयाच बॅक खाते धारकांची खाते बंद केली असल्याचे सांगितले जात आहे.म्हणजेच एसबीआयने आपल्या अनेक बॅक खाते धारकांची खाते seized केली आहेत.

याला कारण असे की बॅकिंग नियमानुसार सर्व बॅक खातेधारकांना आरबीआयच्या सांगितलेल्या गाईडलाईनसचे पालन करणे अनिवार्य आहे.

आरबीआयच्या गाईडलाईननुसार प्रत्येक बॅक धारकांनी कालांतराने आपले केवायसी वेळोवेळी अणि नियमितपणे अपडेट करणे बंधनकारक आहे.

अणि जी बॅक खाते धारक व्यक्ती ठाराविक कालांतराने वेळोवेळी नियमितपणे आपले केवायसी अपडेट करत नाही त्यांच्या बॅक खात्यावर आरबीआयच्या नियमानुसार निर्बंध देखील लादण्यात येत असतो.

हाच प्रकार मागील काही दिवसांपासून घडुन येत आहे ज्या बॅक खातेधारकांनी बॅकेच्या सुचनेनुसार अद्याप आपले केवायसी अपडेट केले नाही

अशा अनेक हजारो एसबीआय बॅक खाते धारकांची खाती एसबीआयकडुन तात्पुरता स्वरुपात बंद करण्यात येत आहेत.(गोठवण्यात येत आहेत).

ह्यामुळे अनेक बॅक खाते धारकांचे बॅकिग व्यवहार देखील ठप्प पडले आहेत.हया बॅक खातेधारकांना आपल्या खात्यातुन आता कुठलाही व्यवहार देखील करता येणार नाहीये.ज्यामुळे अनेक खातेधारकांची गैरसोय होत असल्याचे सांगितले जात आहे.

  1. आपण देखील एसबी आय बॅक खाते धारक असाल तर लवकरात लवकर आरबीआयच्या नियमानुसार आपले केवायसी अपडेट करून घ्या.
  2. कारण एसबीआयने ज्यांची बॅक खाती तात्पुरता गोठवली आहेत बंद केली आहेत त्यांच्या तक्रारीवर उत्तर देताना एसबीआयने असे सांगितले आहे की
  3. जे बॅक खाते धारक आपले केवायसी अपडेट करतील त्यांचे बॅक खाते लगेच तत्काळ चालु करण्यात येईल.अणि ह्या सर्व बॅक खातेधारकांना आधीप्रमाणे आपल्या बॅक खात्यातुन व्यवहार देखील करता येणार आहे.
  4. म्हणुन ज्या एसबीआय बॅक खाते धारकांनी अद्याप आपले केवायसी अपडेट केले नाही आहे त्यांनी आपल्या शहरातील जवळील एसबीआय बॅकेच्या शाखेत जाऊन केवायसी अपडेट करून घ्यायचे आहे.
  5. नियमितपणे वेळोवेळी आपले केवायसी अपडेट करण्याची सुचना बॅकने देऊन सुदधा बॅक खाते धारक आपले केवायसी अपडेट करत नव्हते म्हणून बॅकेने अखेरीस हे पाऊल उचलले आहे.
  6. आधी केवायसी हे दहा वर्षातुन एकदाच केले जात होते पण आरबीआयची नवीन गाईडलाईन आल्यापासून तीन वर्षातुन एकदा हे केवायसी अपडेट करण्याचा नियम बॅकेकडुन बॅक खाते धारकांसाठी लागु करण्यात आला आहे.
  7. आजकाल प्रत्येक बंॅकेत केवायसी अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  8. सध्या अनेक सायबर चोर केवायसी अपडेटच्या नावाखाली बॅक खाते धारकांची फसवणुक करत असल्याचे प्रकार सध्या घडुन येताना जागोजागी दिसुन येत आहे.
See also  कंटेट मार्केटिंग म्हणजे काय? What is content marketing in Marathi

म्हणुन आपणास देखील केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली एखादा बॅक प्रतिनिधी नावाने एखादा फेक काॅल करण्यात आला किंवा मॅसेज करण्यात आला तर अजिबात आपली बॅक डिटेल त्यांच्या सोबत शेअर करू नये.किंवा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये.

केवायसी अपडेट तसेच व्हेरीफिकेशन करण्याच्या खोटया अमिषाचा वापर करून आतापर्यंत अनेक चोरट्यांनी सर्वसामान्य नागरिकांची बॅक खाते पुर्णतः रिकामी केली आहेत.

केवायसी फ्राॅड काय असतो हे सविस्तरपणे जाणुन घेण्यासाठी आपण आमचे आर्टिकल केवायसी फ्राॅड म्हणजे काय हे वाचु शकतात यात आम्ही बॅक खातेधारकांच्या हितासाठी केवायसी फ्राॅड विषयी अत्यंत सविस्तरपणे माहीती प्रदान केली आहे केवायसी फ्राॅड यापासुन आपला बचाव कसा करायचा याचे उपाय देखील सांगितले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा