स्क्रब टाइफस  रोगाची लक्षणे काय आहे ? उपचार कोणते ? – Scrub typhus in Marathi –

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Scrub typhus in Marathi –


आताच मागच्या दोन वर्षापूर्वी जगाने कोरोना सारख्या महामारी चा सामना केला आहे, खूप लोक या कोरोना महामारी मध्ये दगावले, कोरोना काळात सर्वांना आपल्या आरोग्याचे महत्व कळले असेल,आपले आरोग्य चांगले असले तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो.

एक म्हण आहे, जेव्हा आपले आरोग्य चांगले असते, तेव्हा आपल्याला आरोग्य सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटतात, परंतु जेव्हा आपले आरोग्य चांगले नसते, तेव्हा आपल्याला आरोग्य सोडून कोणतीच गोष्ट महत्वाची वाटत नाही.


कोरोणा महामारी तर संपली ,परंतु आता आपल्या भारतातील आसाम ,शिमला सारख्या पहाडी राज्यांमध्ये नवीन रोग पसरत आहे ,त्या रोगाचे नाव ‘Scrub typhus’ असे आहे आणि योग्य वेळेत जर ह्या रोगा वरती योग्य ते उपचार झाले नाही तर,या रोगामुळे माणसाचा चा मृत्यू देखील होऊ शकतो.त्यामुळे आपल्याला या ‘Scrub typhus’ या रोगा विषयक माहिती माहीत असणे गरजेचे आहे.


‘Scrub typhus’ हे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि या रोगावरती वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये हिमाचल प्रदेश राज्यामध्ये महापूर आला होता, कुठे आता महापुर आलेल्या प्रदेशाची परीस्थिती ठीक झाली आहे,तितक्यात पहाडी राज्यांमध्ये हा हानिकारक ‘Scrub typhus’ रोग आला आहे.

हा ‘Scrub typhus’ एक बॅक्टेरियल इन्फेक्शन असून आतापर्यंत या रोगामुळे भारतातील शिमला राज्यातील ९ रोगी मृत्यू पावले आहेत, तसेच या रोगामुळे भारतातील आसाम राज्यातील ५ रोगी मृत्यू पावले आहेत.हा रोग खूप हानिकारक आहे, त्यामुळे ज्यांना कुणाला ह्या रोगा संबंधितची लक्षणे जाणवतील, त्यांनी त्वरीत डॉक्टर कडे जाऊन या रोगावरतीचे उपचार केले पाहिजेत.

See also  प्रोटीन पावडर विषयी माहीती - Protein powder information in Marathi
Scrub typhus in Marathi –
Scrub typhus in Marathi –


हा ‘Scrub typhus’ रोग नवीन नाहीये ,तर हा रोग खूप वर्षांपासून आहे,हा रोग खूप वर्षांपासून लोकांचें जीव घेत आहेत.हा रोग शेतातील किंवा झाडा वरती बसलेल्या एका कीटकाच्या चावण्या मुळे होतो.हा रोग खूप जुना असून देखील आता भारतातील आसाम आणि शिमला राज्यामध्ये हा रोग अतिशय वेगाने वाढत 

 रोगाची लक्षणे काय आहे आणि या रोगावरती घ्यावयाचे योग्य उपचार कोणते

आहेत याबद्दल माहीती पाहुयात.


‘Scrub typhus’ हा रोग एक बॅक्टेरियल इन्फेक्शन असून हा रोग लार्वा माइट्स कीटकाच्या चावल्याने होतो.ह्या ‘Scrub typhus’  चे नाव “Orientia tsutsugamushi” हे आहे.ह्या रोगाचा धोखा फक्त भारतात  नसून भारता सोबत साऊथ ईस्ट आशिया, उत्तरी ऑट्रेलिया,चीन, जपान, इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्ये देखील आहे.

‘Scrub typhus’ रोगाची लक्षणे कोणती कोणती आहेत ?


हा रोग कीटकाच्या चावल्या मुळे होतो.जर एका व्यक्तीला हा लार्वा माईटस कीटक चावला तर दहा दिवसाच्या आत त्या व्यक्तीला या रोगाची लक्षणे दिसायला लागतात.
 ‘Scrub typhus’ या रोगाची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
१) ताप येणे
२) डोके दुखणे
३) अंग दुखणे
४) थंडी वाजून येणे
५) शरीराच्या ज्या ठिकाणी लार्वा माईटस हा  कीटक चावला आहे ,त्या ठिकाणी दुखणे.


वरील लक्षणे जर तुम्हाला जाणवली तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्या कडून योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या आणि योग्य ते उपचार करा.

Scrub typhus in Marathi –


 ‘Scrub typhus’ या रोगाच्या उपचारासाठी कोणती लस आहे ?


या  ‘Scrub typhus’ लक्षने ही डेंग्यू रोगासारखी आहेत.जर तुम्हाला वरील लक्षणे जाणवली तर तुम्ही कशाची ही वाट न बघता किंवा ती लक्षणे अंगावर न काढून घेता त्वरीत तुमच्या आसपासच्या दवाखान्यात तुम्ही जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो उपचार करा.हा रोग झालेल्या पेशंट ची रक्त टेस्ट केली जाते आणि त्या रक्ताच्या टेस्टच्या रिपोर्ट नुसार त्या पेशंट वरती योग्य ते उपचार केले जातात.

See also  Depression - नैराश्य कारण, लक्षण व उपचार विषयी माहीती - Depression information in Marathi


‘Scrub typhus’ रोगावरती कोणकोणते उपचार आहेत ?


तुम्हाला जर या ‘Scrub typhus’ रोगाची लक्षणे जाणवली.आणि तुम्ही.जर त्वरीत डॉक्टरांच्या सहायाने त्या रोगावर्ती उपचार केले तर, तुम्ही काही दिवसातच या रोगापासून बरे व्हाल.ह्या  रोगासाठी डॉक्टर जास्तकरून अँटी बायोटिक गोळ्यांचा वापर करतात. परंतु तुम्ही या  ‘Scrub typhus’ या रोगासाठीचे उपचार डॉक्टरांच्या देखरेख खाली करा.


‘Scrub typhus’ या रोगापासून आपण कशा पद्धतीने बचाव करू शकतो ?


ज्या व्यक्तीला हा  ‘Scrub typhus’ आजार झाला आहे ,त्या व्यक्ती पासून आपण काही दिवस लांब राहू शकतो,त्याला जोपर्यंत तो रोग आहे तोपर्यंत आपण त्या व्यक्ती च्या संपर्क टाळला नपाहिजे, अशाने आपल्याला त्या रोगाची संसर्ग होणार नाही.


‘Scrub typhus’ हा रोग खूप खतरनाक आणि जीवघेणा  आहे परंतु आपण जर या रोगा संबंधितचे लक्षणे त्वरीत ओळखून त्वरीत डॉक्टरांच्या सहायाने उपचार केले तर आपल्याला या आजारापासून बचाव करता येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा