बीजप्रक्रिया – पीक संरक्षणामध्ये महत्व – Seed treatment importance in crop protection

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

बीजप्रक्रिया  आणि पीक संरक्षण  – Seed treatment importance in crop protection

बीजप्रक्रिया म्हणजे काय ? What is Seed treatment

रोग व्यवस्थापनासाठी पूर्वनियंत्रणाचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच बीजप्रक्रिया / बीजसंस्करण होय. बीजप्रक्रिया म्हणजे बी-बियाण्यास किंवा लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या रोपांना, त्यांच्या निरोगी उगवणीकरिता किंवा रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी रासायनिक, जैविक किंवा भौतिक घटकाची प्रक्रिया करणे होय.

पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजीवांचा प्रसार बियाण्याट्रारे होत असतो. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी न चुकता बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. कृषि उत्पादनामध्ये हमखास वाढ करणाऱ्या या कमी खर्चाच्या साधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही निश्चित वाढ होईल. पीक संरक्षणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रणाचे उपाय

केल्यापेक्षा ते रोगाचा प्रादुर्भाव होण्याआधीच बीजप्रक्रियेद्वारे पूर्व नियंत्रणाचे उपाय योजणे फायद्याचे आणि कमी खर्चाचे ठरते.

अऱ्याच बुरशीजन्य/जीवाणुजन्य रोगाची लागण रोगग्रस्त बियाणे बापरल्यास होते, तर काही बुरशी रोगांचे बीजाणू जमिनीत, बियाण्यात, पालापाचोळ्यात सूक्ष्म अवस्थेत राहून आपले अस्तित्व टिकवून ठेवतात व पुन्हा क्रियाशील होतात.

सूक्ष्मजीवांमुळे बियाण्यावर /रोपांवर होणारे विपरीत परिणाम :

१) बियाण्याच्या आकारमानात घट,

 २) बियाण्याचा भूणपात,

३) बियाणे कुजणे,

४) बियाण्यावर निरनिराळ्या प्रकारचे डाग,

५) फुलांचे भागबियाण्यात रूपांतरित न होता कठीण कवच किंवा रोगट भागात होणे,

६)बियाण्याचा जोम कमी होणे,

७) उगवणारे रोपटे अशक्‍त होणे, मरणे,

८)बियाण्याची प्रत कमी होणे,

९) उत्पन्नात घट येणे,

१०) बियाण्याच्या उगवण शक्तीवर परिणाम होणे.

बीजप्रक्रियेमुळे बियाणे व जमिनीद्रारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण होऊन बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षा कक्च तयार होऊन रोपवाढीच्या प्राथमिक अवस्थेत रोपांना शेतात स्थानापन्न होण्यास मदत करते. बियाण्याची उगवण शक्‍ती वाढून शेतात आवश्यक प्रमाणात झाडांची संख्या राखता येते.

See also  प्रदीप पटवर्धन विषयी माहीती – Veteran Marathi actor Pradeep Patwardhan famous actor in Marathi

रोग व्यवस्थापनासाठी पूर्वनियंत्रणाचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच बीजप्रक्रिया / बीजसंस्करण होय. बीजप्रक्रिया म्हणजे बी-बियाण्यास किंवा लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या रोपांना, त्यांच्या निरोगी उगवणीकरिता किंवा रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी रासायनिक, जैविक किंवा भौतिक घटकाची प्रक्रिया करणे होय.

बीजसंस्करण घटक वं प्रक्रिया :

बी-बियाण्याला बीजप्रक्रिया करण्यासाठी शिफारशीत मात्रेत सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशक / जीवाणुनाशक लावावे, त्यानंतर अनुक्रमे जैविक संवर्धके (रायझोबियम/अँझोटोबॅक्टर/ अँझोस्पीरिलम/ स्फुरद विरघळणारे जीवाणू) व सगळ्यात शेवटी जैविक बुरशीनाशकाची (ट्रायकोडर्मा) बीजप्रक्रिया करावी.

रासायनिक रोगजंतूनाशक (बुरशीनाशक, जीवाणुनाशक) बियाण्यातून किंवा मातीतून उद्‌भवणारे बुरशीजन्य / जीवाणुजन्य रोग (मर, मूळकूज व इतर रोग) नियंत्रणासाठी वापरतात.

जैविक संवर्धके :

१) रायझोबियम – नत्रयुक्त खते जमिनीत टाकल्यानंतर अर्धे नत्र बाष्यीभवनाद्रारे वातावरणात निघून जाते व अर्धेच नत्र पिकांना उपलब्ध होते. रायझोबीयम जीवाणू नत्राचे स्थिरीकरण करतात आणि कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळांना नत्र लवकर उपलब्ध होऊन मुळावर गाठी लागतात. परिणामी, जास्त उत्पन्न मिळते.

) अँझोटोबॅक्टर/ अँझोस्पीरिलम – तृणधान्य वर्गीय पिकामध्ये नत्र स्थिरीकरण करतात.

३) पी.एस.बी. (स्फुरद विरघळवणारे जीवाणू) – स्फुरदयुक्त खते जमिनीत टाकल्यानंतर अविद्राव्य अवस्थेतील स्फुरद विद्राव्य होऊन पिकाला उपलब्ध होण्यासाठी २५ ते ३० दिक्स लागतात. हा अविद्राव्य स्फुरद हे जीवाणू विरघळवून तो पिकाला लवकरात लवकर उपलब्ध करून देतात.

४) जैविक बुरशीनाशक (ट्रायकोडर्मा) – ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी असून ती इतर रोगकारक बुरशीवर उपजीविका करते आणि त्यांना नियंत्रित ठेवते त्यामुळे पिकावर बियाण्याद्रारे/ जमिनीद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्माव होत नाही.

बीजप्रक्रियेचे फायदे

  1. बीज अवस्थेमध्येच बियाण्यावर संस्करण होत असल्यामुळे बुरशीजन्य रोग किंवा माती आणि बियाण्यापासून उद्‌भवणाऱ्या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत नाही.
  2. पीकसंरक्षणाचा खर्च कमी होतो. बी-बियाण्यास सम प्रमाणात औषध लावले जाते. ०
  3. बियाण्याची उगवण निरोगी आणि सम प्रमाणात होऊन पुढील रोगप्रसार थांबतो.
  4. फवारण्यांवरील खर्चाची बचत होते.
  5. जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.
  6. बीजप्रक्रियेमुळे नत्र, स्फुरद व इतर घटक पिकास लवकर उपलब्ध होऊन खतावरील खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होते.
  • बियाण्यास प्रथम रासायनिक औषधांची बीजप्रक्रिया करावी व त्यानंतर जैक्कि घटकांची बीजप्रक्रिया करावी.
  • बियाणे भांड्यात / ताडपत्रीवर घेऊन त्यावर दिलेल्या प्रमाणात रासायनिक बुरशीनाशक टाकून खाली-वर करावे
  • व संपूर्ण बियाण्यास चोळावे जेणेकरून बियाण्यावर बुरशीनाशकाचा सारखा थर कसेल.
  • रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना हातात रबरी / प्लास्टिकचे हातमोजे वापरावेत, डोळ्यांना चष्मा व नाकाला रुमाल बांधावा,शरीरास इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • जैविक घटकाची बीजप्रक्रिया करताना २५० ग्रॅम जीवाणुसंवर्धनाचे पाकीट १० ते १५ किलो बियाण्यास वापरावे. १ लीटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकळून घ्यावे.
  • द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जीवाणुसंवर्धक टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे.
  • बियाणे ओलसर करून जीवाणुसंवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्याला लावावे. नंतर बियाणे सावलीत वाळवावे व लगेच पेरणी करावी.
See also  पीएम केअर फंड विषयी माहीती - PM cares fund information in Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा