ज्येष्ठ नागरिक बचत योजना मधील कमाल ठेवीची मर्यादा १५ लाखावरून ३० लाख केली जाणार – Senior citizens Saving scheme latest update in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ज्येष्ठ नागरिक बचत योजना मधील कमाल ठेवीची मर्यादा १५ लाखावरून ३० लाख केली जाणार senior citizens Saving scheme latest update in Marathi

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही पोस्ट खात्याकडुन फक्त ज्येष्ठ नागरिक वर्गासाठी सुरू करण्यात आली आहे.ज्येष्ठ नागरीकांना आपल्या वृद्धापकाळा करीता पैशांची बचत तसेच गुंतवणूक करता यावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

म्हणुन ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला पेंशन योजना असे देखील संबोधिले जाते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा सध्याचा चालु व्याज दर हा आठ टक्के इतका आहे.हया योजनेची एकुण मुदत ही पाच वर्षे इतकी असते यात आपणास तीन वर्षे अजुन मुदतवाढ वाढ करता येते.

ह्या ज्येष्ठ नागरिक योजनेमध्ये दर तीन महिन्यांनी व्याज दर हे ठेवीदारांना देण्यात येत असते.म्हणजेच ही रक्कम ठेवीदारांच्या बचत खात्यात जमा केली जात असते.

आतापर्यंत ज्येष्ठ नागरीक बचत योजनेमध्ये कमाल ठेवीची मर्यादा ही १५ लाख इतकी होती.

पण आता ह्या योजनेत बदल करण्यात आले आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमधील कमाल ठेवीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली असून १ एप्रिल २०२३ पासुन ही मर्यादा ३० लाख इतकी झालेली आपणास पाहायला मिळणार आहे.

नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही महत्त्वाची घोषणा केली होती.नवीन आर्थिक वर्षात हे नियम लागु केले जातील निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते.

निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या २०२३-२०२४ मधील अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची गुंतवणूकीची मर्यादा डबल केली जाईल केली जाईल असे घोषित करण्यात आले होते.

त्यामुळे आता उद्यापासून म्हणजे १ एप्रिल २०२३ पासून ज्येष्ठ नागरिक बचत योजना मधील कमाल ठेवीची मर्यादा ३० लाख इतकी होणार आहे.

Senior citizens Saving scheme latest update in Marathi

त्यामुळे आता ज्या ज्येष्ठ नागरीकांनी ह्या योजनेत १५ लाखापर्यतची गुंतवणूक आतापर्यंत याआधीच केली होती त्यांना आता अजुन १५ लाख जास्त ह्या योजनेमध्ये गुंतवता येणार आहे.

See also  एलआयसी IPO माहिती - LIC IPO updates Marathi

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक वर्गासाठी सुरू केलेली योजना आहे.ही योजना २००४ मध्ये सुरू करण्यात आली होती.

निवृत्तीनंतर देखील नागरीकांना वृद्धापकाळात सुरक्षित वेतन प्राप्त व्हावे ह्या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली होती.

ह्या योजनेत गुंतवणूक केलेल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिक वर्गास जर हे खाते बंद करून मुदतीच्या आधी रक्कम काढायची असेल तर खाते ओपन केल्यानंतर एक वर्षांच्या कालावधीने तो आपले खाते बंद देखील करू शकतो.अणि आपले पैसे काढु शकतो

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा