ऊस पिकात करावयाचे महत्वाचे कार्य – भाग -9 – Sugarcane important cultivation practices

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

पूर्व आणि सुरू हंगाम ऊस पिकात करावयाचे महत्वाचे कार्य -sugarcane important cultivation practices

आता ऊस पिकातून बरेच शेतकरी चांगले उत्पन्न घेऊ लागले आहेत. परंतु खालील अति महत्वाचे कार्य वेळेवर व योग्य पद्धतीने केल्यास आहे त्या पेक्षा जास्त ऊस उत्पादन शेतकरी घेऊ शकतात.

नांग्या भरणे :

  1.  लहान बांधणीपूर्वी म्हणजे साधारण ऊस लागवडीच्या 25 ते 35 दिवसांनंतर  ज्या ठिकाणी कांड्याची ऊगवण झालेली नाही अथवा लावलेले रोप सुकून गेले आहे, त्या ठिकाणी नांग्या भरण्यासाठी म्हणून लावलेले ऊगवण पूर्ण झालेले, सशक्त तयार रोप गॅप फीलिंग म्हणजेच नांग्या भरण्यासाठी वापरावे.
  2. (बेनेद्वारे लागवडीच्या वेळी प्रत्येक 10 व्या सरीत एक डोळ्याच्या टिपऱ्या जवळ जवळ लावल्यास या पासूनच नांग्या भरण्यास रोप उपलब्ध होतील) थेट टिपऱ्या नांग्या भरण्यासाठी वापरल्यास बेनेद्वारे लागवडीच्या  ऊसात आणि भरलेल्या नांग्यात वाढीचे अंतर पडते.
  3. नांग्या भरण्याचे काम दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात करावे कारण, सौम्य सूर्यप्रकाशात मुळांना कमी इजा होते. नांग्या भरताना पाण्याची शाश्‍वती असावी. रोपा भोवती पुरेसा वापसा असणे गरजेचे असते.
  4. याबाबी जर कोटेकोरपणे पाळल्या तर नांग्या पडण्याचे प्रमाण फार कमी राहते. प्रत्यक्ष नांग्या भरताना प्रारंभीची लागवड का ऊगवली नाही/रोप का जगले नाहीत याचे कारण शोधून त्यावर उपाय करावा.
  5. अशावेळी नांग्या भरताना बाविस्टीन + क्लोरोपारारिफॉस यांचे द्रावण नांगी भरण्याच्या खड्ड्यात वापरावे. व नंतर नांग्या भरून लगेच पाणी द्यावे.

(नांग्या भरण्याचे काम किमान 3 वेळा 4 दिवसाच्या अंतराने केल्यास 100 टक्के नांग्या भरल्या जातील).

बाळबांधणी :

 ऊस लागवडी नंतर साधारण दीड ते दोन महिन्यांनी ऊस रोपापासून म्हणजेच ऊगवणीपासून साधारण 9 इंच ते एक फूट अंतरावर कुदळीने अथवा बैल औजाराने जमीन थोडीशी भुसभुशीत करावी. या मातीने ऊसाच्या रोपास हलकीशी भर द्यावी. वेळेत केलेल्या बाळबांधणीमुळे ऊसाचे फुटवे जोमाने वाढतात. कोंबाच्या जमिनीलगतच्या कांड्यांमधून मुळे व फुटवे बाहेर पडण्यास मदत होते. खोड  किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

See also  ऑपरेशनकावेरी काय आहे? ऑपरेशनकावेरीचा मुख्य हेतु काय आहे? - Operation Kaveri Sudan

मोठी बांधणी :

  1. ऊस लागवडीच्या तीन ते साडेतीन महिन्यानंतर ऊसाच्या एक-दोन कांड्या धरल्यानंतर रासायनिक खताची शिफारस मात्रा व कमीत कमी एक गाडी चांगले कुजलेले शेणखत/ कारखान्याचे भु-सुरक्षा खत यांचे मिश्रण बुंध्याशी घालावे.
  2. त्यानंतर वरंबे फोडून रिजरच्या साहाय्याने ऊसाच्या बुंध्यास मातीची भरपूर भर द्यावी. यानंतर ऊसाची वाळलेली पाने, उशिराचे आणि कमजोर फुटवे काढून त्यांचा सरीत आच्छादनासाठी वापर करावा.
  3. बाळबांधणी व मोठी बांधणी या दोन्ही कामांमुळे वर दिलेल्या फायद्याबरोबरच ऊसाच्या बुडख्यास व खालच्या कांड्यांना माती लागते. मुळे निर्मितीसाठी कांड्यांभोवती अंधार व आर्द्रता तयार होते.
  4. खालच्या कांड्यांना भरपूर मुळे सुटतात. मोठ्या बांधणीमुळे ती पसरतात व जमीन घट्ट धरून ठेवतात. यामुळे ऊसाचे लोळण्याचे प्रमाण कमी होते. तेव्हा  ऊसाच्या लागवडीमध्ये या दोन्ही बांधण्याचे काम अत्यंत काटेकोरपणे करून घ्यावे.

ऊस लागवड पद्धत – भाग -06- Sugarcane cultivation Methods

ऊस लागवडीचे महत्व, जमीन निवड व पूर्व मशागत – भाग -02 Preparation of Land for Sugarcane Cultivation

ऊस पिकात सूक्ष्म अन्नद्रवांचे महत्व -भाग -05- Importance of micro-nutrients in sugarcane cultivation

ऊस पिकात अन्नद्रव्यांचे महत्व  – भाग -04 Importance of NPK in sugarcane cultivation

ऊस पिकात करावयाचे महत्वाचे कार्य – भाग -9 – Sugarcane important cultivation practices

विद्राव्य खतांचं शेतीतल महत्व – भाग 08- Importance of Water soluble fertilizer in farming

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा