यंदाची तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता -Talathi bharti latest update in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

यंदाची तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता – Talathi bharti latest update in Marathi

जे उमेदवार तलाठी भरती सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे यंदाची तलाठी भरती प्रक्रिया ही पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

अनेक दिवसांपासून तलाठी भरतीसाठी जाहीरात येणार असे उमेदवारांना सांगितले जात होते.पण उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या वेळेची तलाठी भरती लांबणीवर जाणार असे स्पष्टपणे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की तलाठी भरतीची सर्व जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आली आहे ते अतिरीक्त आयुक्त भुमीअभिलेख विभागाचे आनंद राऊते यांनी असे सांगितले आहे की

राज्यात सुमारे अकरा जिल्ह्यांमध्ये आदिवासी नागरीकांची संख्या खुप जास्त प्रमाणात आहे.तलाठी भरतीबाबद बिंदु नामावलीनुसार किती पदे रिक्त आहेत याबाबतचे मार्गदर्शन देखील सरकारने मागविले आहे.यानंतर या पदभरतीबाबद कार्यवाही केली जाणार आहे.

आनंद राऊते यांनी असे देखील सांगितले आहे की दरम्यान समांतर पातळीवर पदभरती करण्यासाठी परीक्षा घेण्याकरीता टीसीएस ह्या कंपनीसोबत आमची चर्चा देखील झाली आहे.

आता टीसीएस कंपनीबरोबर सामंजस्य करार करून यापुढची कार्यवाही केली जाणार आहे.

म्हणजे टीसीएस कंपनीमार्फत ही तलाठी भरतीची परीक्षा घेतली जाणार आहे हे निश्चित झाले आहे पण टीसीएस सोबत अजुनही कुठलाही करार झाला नाहीये

तसेच पेसा मुददयाची समस्या देखील असल्याने यंदाची तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पेसा मुददा काय आहे?

तलाठीची पदे भरण्याकरिता राज्यातील अकरा आदिवासी जिल्ह्या मधल्या पेसा क्षेत्रामधील कोणती लोकसंख्या गृहित धरावी याची बिंदू नामावली काढायला शासनाने काही मार्गदर्शन मागविली आहेत.

त्यामुळे तलाठी भरती अजुन काही दिवस लांबणीवर पडु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यामधील ३६ जिल्ह्यातील साडे चार हजार पेक्षा जास्त तलाठयांची नियोजित भरती ही पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

See also  गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना २०२३ विषयी माहिती - Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा