वाहन फिटनेस प्रमाणपत्र – Vehicle fitness certificate information in Marathi
वाहन फिटनेस प्रमाणपत्र म्हणजे काय?
वाहन फिटनेस प्रमाणपत्र हे सर्व वाहन चालकांसाठी एक खुप महत्वाचे कागदपत्र आहे.यामुळे हे प्रमाणित होत असते की आपण चालवतो आहे ते वाहन रस्त्यावर उतरण्यासाठी तसेच चालवण्यासाठी योग्य आहे किंवा नाही.
जेव्हा आपण एखाद्या शोरूममधुन नवीन वाहनाची खरेदी करत असतो तेव्हा आपणास त्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र देखील दिले जात असते.हे प्रमाणपत्र काही ठाराविक कालावधीसाठी वैध ठरत असते.

हा कालावधी संपल्यानंतर आपणास मोटार वाहन कायद्याचे नियमांचे पालन करण्यासाठी आपले वाहन फिटनेस सर्टिफिकेट हे रिनिव्ह करावे लागते म्हणजे आपणास त्याचे नुतनीकरण करावे लागते.
हे वाहन फिटनेस प्रमाणपत्र रिनीव्ह करत असताना आरटीओ कडुन आपल्या वाहनाची तपासणी केली जात असते.
वाहन फिटनेस प्रमाणपत्र भारतात का अनिवार्य करण्यात आले आहे?
मोटार वाहन कायदा तसेच नियमानुसार भारतातील प्रत्येक मोटार वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य तसेच बंधनकारक करण्यात आले आहे.
आपल्याजवळ आपल्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र असल्यास आपण या बाबतीत सुनिश्चित असतो की आपले वाहन रस्त्यावर उतरण्यासाठी चालविले जाण्यासाठी एकदम योग्य अणि सुरक्षित आहे.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जुन्या वाहनांपासुन प्रदुषणामध्ये अधिक वाढ होत असल्याचे देखील शासनाच्या निदर्शनास आले आहे.म्हणुन अशा वाहनांना भंगार मध्ये काढण्यासाठी ह्या पर्यावरणाला प्रदुषित करणारया वाहनांचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी देखील शासनाने हे वाहन फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक केले आहे.
यात आपले वाहन जर ध्वनी/वायु प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे असे आढळुन आले तर आपणास आपले वाहन रस्त्यावर उतरवता येणार नाही.आपले वाहन प्रमाणित नाही.
भारतातील सर्व व्यावसायिक वाहन चालकांना हे सर्टिफिकेट अनिवार्य केले गेले आहे.एखादया वाहन चालकाकडे हे वाहन फिटनेस प्रमाणपत्र तपासणी दरम्यान आढळुन आले नाही तर त्याला दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.
वाहन फिटनेस प्रमाणपत्र बनविण्यासाठी कोणते महत्वाचे कागदपत्रे लागतात?
वाहन फिटनेस प्रमाणपत्र बनविण्यासाठी वाहनाचे आरसी अणि वाहनाचे सर्व आवश्यक पेपर लागत असतात.
वाहन फिटनेस प्रमाणपत्र कसे मिळवायचे?
वाहन फिटनेस प्रमाणपत्र आपणास पुढील दोन पदधतीने काढता येते आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल आपण त्या पदधतीचा वापर वाहन फिटनेस प्रमाणपत्र बनविण्यासाठी करू शकतो.
१) आॅनलाईन-
२) आॅफलाईन –
वाहन फिटनेस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आॅनलाईन पदधतीने अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम आपणास parivahan.gov.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.
- वेबसाईटवर गेल्यावर आपणास होम पेज वर वेगवेगळ्या नावाचे मेन्यू दिसून येतील यात आपणास online services नावाचे एक आॅप्शन दिसुन येईल यावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपणास सर्वात टाॅपला दिलेल्या vehicle related services या आॅपशनला सिलेक्ट करून त्यावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर select state हा पर्याय येईल इथे आपणास आपल्या जिल्ह्याची निवड करून घ्यायची आहे.
- यानंतर आपणास आपला vehicle registration number टाकायचा आहे.अणि select RTO मध्ये जाऊन आपला आरटीओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
अणि मग खाली दिलेल्या proceed बटणावर क्लिक करायचे आहे. - यानंतर आपणास online services मध्ये वेगवेगळे आॅप्शन दिसुन येतील.
(ज्यांनी आपल्या आरसीला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे अशा व्यक्तींने apply for fitness certificate वर क्लिक करून फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी डायरेक्ट अर्ज करायचा आहे पण ज्यांनी आपला मोबाईल नंबर आरसीला लिंक केलेला नाहीये अशा व्यक्तींनी आधी आपला मोबाईल नंबर आरसी सोबत लिंक करून घ्यायचा आहे त्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अॅप्लाय करायचा आहे.)
आरसीसोबत मोबाईल नंबर लिंक कसा करायचा?
- Online services मध्येच आपणास mobile number update नावाचे एक आॅप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर एक पाॅप अप मॅसेज येईल त्याला yes करून पुढे जायचे आहे.
- यानंतर आपणास vehicle registration number, vehicle registration date,vehicle chassis number,vehicle engine number, registration fitness valid upto date ही सर्व विचारलेली माहीती भरायची आहे.
- यानंतर खाली दिलेल्या show details वर क्लिक केल्यावर आपण भरलेली सर्व माहिती स्क्रीनवर आपल्यासमोर येईल.
- खाली दिलेल्या रेजिस्ट्रर मोबाईल नंबर वर क्लिक करून आपण आपल्याला जो नंबर लिंक करायचा आहे तो टाकायचा आहे.अणि खाली दिलेल्या generate otp ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपणास आपल्या रेजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठविला जाईल तो इथे enter otp मध्ये टाकायचा आहे.
- ओटीपी टाकल्यानंतर खाली दिलेल्या save datails ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.एक पाॅप मेसेज येईल त्याला yes करायचेच आहे.
- यानंतर आपणास पुन्हा online services च्या मेनूत येऊन apply for fitness certificate वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपणास काही terms conditions दाखवल्या जातील त्यांना यस टिक करायचे आहे.यानंतर खाली दिलेल्या procedd बटणावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर fitness fee मध्ये आपणास आपला vehicle registration number अणि chasis number टाकायचा आहे.अणि खाली दिलेल्या verify details वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपणास आपला मोबाईल नंबर दाखवला जाईल पुन्हा एकदा generate OTP असे आॅप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
- मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी enter otp मध्ये टाकायचा आहे.यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्या समोर आपल्या गाडीची सर्व माहिती स्क्रीनवर दिसुन येईल.खाली दिलेल्या within stateजिल्हयामध्ये other इतर जिल्हा state या पर्यायांपैकी आपणास ज्या ठिकाणी अर्ज करायचा ते निवडुन घ्यायचे आहे.
- यानंतर आपणास book appointment वर क्लिक करायचे आहे
- यानंतर get user वर क्लिक करायचे आहे.यानंतर काही टरम अणि कंडिशन येतील त्यांना यस करायचे आहे.यानंतर खाली दिलेल्या proceed बटणावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर select appointment date जेव्हा आपण आरटीओ आॅफिस मध्ये जाणार आहे ती डेट टाकायची आहे.
- यानंतर आपणास book user details वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपणास confirm वर टिक करून proced वर क्लिक करून payment करायचे आहे.
- यानंतर पेमेंट गेटवे निवडुन घ्यायचे आहे.अणि continue वर क्लिक करायचे आहे.
पेमेंटचे आपल्याला हवे ते आॅपशन निवडायचे आहे.पेमेंट केल्यानंतर एक रिसीप्ट येईल तिची प्रिंट आॅप्शनवर क्लिक करून प्रिंट काढुन घ्यायची आहे.
यानंतर आपणास payment receipt अणि oppointment receipt यांची प्रिंट काढुन आरटीओ आॅफिसवर आपले वाहन घेऊन जायचे आहे.
यानंतर आरटीओ आॅफिसवर गेल्यावर वाहनाची फिटनेस चेक केली जाईल.
कोणत्याही दोष किंवा तांत्रिक बिघाडांमुळे वाहन तपासणी साफ न केल्यास आरटीओ वाहन दुरुस्तीची सूचना देऊ शकते.जोपर्यंत वाहन तपासणी पूर्ण करत नाही तोपर्यंत FC जारी केले जाणार नाही.