Whip म्हणजे नेमकं काय ? राजकारणातील व्हिप – What Is A Whip In Politics ?

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Whip म्हणजे काय ? What Is A Whip In Politics ?

 राज्यात सध्या वेगवान पदधतीने विविध घडामोडी घडताना आपणास दिसुन येत आहेत.ज्या घडामोडीत अनेक शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात व्हिप  हा त्यातीलच एक महत्वपुर्ण शब्द आहे.

  • अमुक राजकीय पक्षाने संसदेत तसेच विधीमंडळामध्ये व्हिप जारी केला आहे असे आपण नेहमी ऐकत असतो.
  • पण व्हिप म्हणजे नेमकी काय असते?हे आपल्याला स्पष्टपणे माहीत नसते.
  • त्यामुळे व्हिप विषयी आपल्या मनात खुप प्रश्न असतात की व्हिप  म्हणजे काय असते?राजकीय पक्ष व्हिप  का जारी करत असतात यामागचे कारण काय असते?तसेच राजकीय पक्षात व्हिप चे काय महत्व आहे?असे विविधांगी प्रश्न आपल्या मनात उठत असतात.

पण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन आपल्या शंकांचे निरसन कोणी करत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात पुन्हा व्हिप  म्हणजे काय असते असा प्रश्न निर्माण होणार नाही.आणि आपल्याला व्हिप  विषयी सखोल माहीती प्राप्त होईल.

व्हिप  म्हणजे काय?आणि

व्हिप चा साध्या आणि सोप्या भाषेत अर्थ सांगावयाचे म्हटले तर व्हिप  हा एक पक्षाचा आदेश असतो.ज्यात दिलेले असते की आपल्या राजकीय पक्षाने एखाद्या महत्वाच्या विधेयकाबाबद तसेच मुदद्यावर सभागृहामध्ये काय आणि कोणती भुमिका मांडायची आहे.व्हिप  पक्षातील शिस्त सुनिश्चित करण्याचे काम करत असतो.

See also  प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कार्ये, राज्यांचे RTO कोड | RTO Codes of Indian States In Marathi

म्हणजेच आपल्या पक्षात जेवढे आमदार आहेत त्यांच्यावर नित्रंत्रण ठेवण्यासाठी व्हिपची आवश्यकता असते.

 राजकीय पक्ष व्हिप  का जारी करत असतात यामागचे कारण काय असते?What is the role of the whip in politics?

  • प्रत्येक राजकीय पक्ष तसेच संघटनेचा आपला एक व्हिप असतो जो पक्षामध्ये समाविष्ट असलेल्या आमदारांवर नियंत्रण ठेवत असतो.
  • जेव्हा लोकसभा आणि विधानसभा या दोघे ठिकाणी एखाद्या महत्वपुर्ण विषयावर मतदान केले जात असते.
  • आणि संबंधित पक्ष तसेच संघटनेने सरकारच्या बाजुने किंवा सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे ठरवले असेल अशा वेळी याबाबद जो आदेश जारी केला जातो तो व्हिप मार्फतच जारी केला जात असतो.
  • कोणत्याही पक्षातील सदस्याने आपल्या वैयक्तिक विचारसरणीनुसार कुठलाही निर्णय न घेता आपल्या पक्षाने ठरवलेल्या धोरणानूसार निर्णय घ्यावा आणि आपले मतदान करावे ह्या प्रमुख उददिष्टासाठी राजकीय पक्ष व्हिप काढत असतात.

व्हिप  हा कोणासाठी बंधनकारक असतो?What happens if a whip is disobeyed?

 व्हिप हा प्रत्येक पक्षाच्या आमदारांसाठी बंधनकारक मानला जात असतो.

  • आणि समजा एखाद्या आमदाराने हा पक्षाचा आदेश धुडकावून लावत पक्षाची जी भुमिका आहे त्याविरूदध मतदान करण्याचा निर्णय घेतला तर त्या आमदाराचे पक्षातील सभासदत्व रदद केले जाऊ शकते.म्हणजेच तो त्या पक्षासाठी अपात्र ठरत असतो.
  • अशा परिस्थितीत पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे त्या व्यक्तीवर पक्षाची शिस्त भंग केल्याबाबद कारवाई देखील केली जात असते.ज्यात त्याच्याकडुन त्याचे पद देखील हिरावले जाण्याची शक्यता असते.

हेच कारण आहे की कुठलाही महत्वाचा राजकीय निर्णय घेताना राजकीय पक्ष आपला व्हिप  जारी करीत असतात.कारण याने आपले आमदार खासदार फुटत नसतात.

व्हिप  कशा पदधतीने काढला जात असतो?

यात सर्वप्रथम प्रत्येक राजकीय पक्षाकडुन विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जात असते.आणि मग त्या निवड केलेल्या गटनेत्याकडे व्हिप  म्हणजेच पक्षादेश जारी करण्याचा अधिकार दिला जात असतो.

See also  महाराष्ट्र राज्यात एक नवीन किल्ला सापडला असल्याचा दुर्ग अभ्यासकांचा दावा - Ratnagiri New Fort

व्हिप जारी करण्याचा अधिकार कोणाला असतो? – Who has right to issue whip

  • व्हिप म्हणजेच पक्षादेश जारी करण्याचा अधिकार हा पक्षाकडुन निवडण्यात आलेल्या विधीमंडळ गटनेत्याला असतो.
  • ज्यात समजा एखाद्या पक्षाने जर आपला जुना गटनेता काढुन टाकुन नवीन गटनेत्याची निवड केली तर पक्षादेश म्हणजेच व्हिप जारी करण्याचा अधिकार नवीन गटनेत्याकडे दिला जात असतो.
  • ९१ व्या घटना दुरूस्तीनुसार असे देण्यात आले आहे की जर एखाद्या दोन पेक्षा अधिक आमदार फुटले आणि त्यांनी आपला नवीन पक्ष स्थापित केला किंवा त्यांनी एखाद्या दुसरया पक्षामध्ये प्रवेश केला तर त्यांना अपात्र ठरवले जाईल.अशा सभासदांना अपात्र घोषित करण्यात येईल.

आणि एखादा सदस्य पात्र आहे किंवा अपात्र हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा आणि लोकसभेच्या सभापतीकडे असतो.

माहिती घ्या -भारतीय पंतप्रधानांच्या नावांची यादी (1947 ते आजपर्यंत )-

 

व्हिप  केव्हा बजावता येत नसतो?When whip is issued

भारतात जेव्हा राष्टपतीपदाची निवडणुक असते तेव्हा निवडणुकीत आमदार(विधानसभेचे सभासद) आणि खासदार(संसदेचे सभासद) यांना व्हिप  बजावून कोणाला मतदान करण्यात यावे?याबाबद निर्देश देता येत नसतो.

व्हिप  किती प्रकारच्या असतात?Types of Whips

 व्हिप  ह्या एकुण तीन प्रकारच्या असतात.

1)वन लाईन व्हिप  :

2) टु लाईन व्हिप  :

3) थ्री लाईन व्हिप  :

1)वन लाईन व्हिप  :

हा पक्षादेश सभासदांना पक्षातील सदस्यांना आपल्या मताविषयी माहीती देण्यासाठी जारी केला जातो.

जर एखाद्या सभासदाने पक्षाच्या ठरवलेल्या मार्गाचे पालन नाही केले तर त्याला वन लाईन व्हिप  रोखू देत असतो.

2) टु लाईन व्हिप  :

मतदान करताना सभागृहात उपस्थित राहावे असे निर्देश सभासदांना दिले जात असतात,पण मतदानाच्या पदधतीबाबतीत यात कुठलाही निर्देश दिला जात नाही.

3) थ्री लाईन :

यात सदस्यांना पक्षाच्या धोरणानुसार म्हणजेच ठरवलेल्यानुसार मतदान केले जावे असे निर्देश यात दिले जातात.

See also  श्रावण महिन्यात मांसाहाराचे सेवण का करु नये? - Shravan food guide

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा