डेटा लीक होणे म्हणजे काय?डेटा लीक झाल्यावर काय होते? -What is Data Breach
नुकतीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे की एमपीएससी परीक्षार्थीची परीक्षेची हाॅलतिकिटे एका टेलिग्राम चॅनलवर बेकायदेशीरपणे लीक झाली आहेत.
एमपीएससी परीक्षार्थीकडुन असे देखील म्हटले जाते आहे की हाॅलतिकिट सोबत आमचा वैयक्तिक डेटा देखील हॅकरकडे उपलब्ध असल्याचा दावा हॅकरकडुन केला गेला आहे.
ह्याच अनुषंगाने आजच्या लेखात आपण डेटा लीक होणे म्हणजे काय?डेटा लीक झाल्यावर काय होते हे जाणुन घेणार आहोत.
सध्या युझर्सचा पर्सनल डेटा जागोजागी बेकायदेशीरपणे लीक केला जात असल्याच्या घटना घडुन येत आहेत.अणि हा लीक झालेला डेटा हॅकरकडे कसा गेला हे सुद्धा काही वेळा युझर्सच्या लक्षात येत नसते.
हा युझरचा सर्व वैयक्तिक डेटा कधी मोबाईल मधुन लीक होताना दिसतो तर कधी लॅपटॉप कम्प्युटर मधुन कधीकधी अनधिकृत वेबसाईट पोर्टल वर आपली पर्सनल तसेच बॅक डिटेल दिल्याने देखील हा डेटा हॅकर्स दवारे हॅक करून लीक केला जात असतो.
पण नुकतेच एमपीएससीच्या आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वरुन एमपीएससी परीक्षार्थीचा डेटा हाॅलतिकिट लीक झाल्याचे म्हटले जात आहे.
डेटा लीक होणे म्हणजे काय?data leak meaning in Marathi
डेटा लीक होणे एखादया व्यक्तीचा पर्सनल डेटा वैयक्तिक माहिती सार्वजनिक रीत्या उघड केली जाणे.
डेटा लीक म्हणजे आपला संवेदनशील डेटा जसे की फाईल,फोटो,व्हिडिओ,महत्वाची कागदपत्रे,बॅक डिटेल ईमेल आयडी,पासवर्ड,मोबाईल नंबर इत्यादी
गोपनीय माहिती जेव्हा एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हातात बेकायदेशीरपणे जाते,किंवा भौतिकरीत्या इंटरनेटवर तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून सार्वजनिक रीत्या उघड केली जाते तेव्हा त्याला डेटा लीक होणे असे म्हणतात.
ह्या डेटाच्या साहाय्याने युझरला हॅकरकडुन पैसे उकळण्यासाठी वगैरे ब्लँकमेल देखील केले जाऊ शकते.
डेटा लीक झाल्यावर काय होते?
डेटा लीक झाल्यावर आपली सर्व गोपनीय माहिती हॅकरकडे जाऊ शकते.ज्यात बॅक खाते तपशील,ईमेल आयडी पासवर्ड,मोबाईल नंबर,महत्वाची कागदपत्रे फाईल्स इत्यादीचा समावेश असतो.
ह्या सर्व वैयक्तिक गोपनीय माहितीचा वापर करून हॅकर आपले बॅक खाते रिकामे करू शकतात.बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करू शकतात.
हा चोरलेला संवेदनशील डेटा डार्क वेबवर डेटाच्या संवेदनशीलतेनुसार पैसे घेऊन बेकायदेशीररित्या विकला देखील जात असतो.
डेटा लीक कधी होत असतो?
एखाद्या वेबसाईटचे कंपनीचे आँनलाईन पोर्टलचे सर्वर जर पुर्णपणे सुरक्षित केले गेले नसेल तर त्या मधील डेटा लीक होण्याची दाट शक्यता असते.
कारण वेबसाईटचे सर्वर पुर्णपणे सुरक्षित न केले गेल्याने हॅकरला सहजपणे सिस्टम मध्ये प्रवेश करता येतो अणि त्या वेबसाईट वरचा गोपनीय डेटा माहीती चोरता येत असते.अणि कुठेही सार्वजनिक रीत्या लीक देखील करता येते.
अशी अनेक उदाहरणे आतापर्यंत पाहीली गेली आहे जिथे सुरक्षेच्या अभावामुळे काही कंपनींच्या सिस्टम मधील गोपनीय वैयक्तिक डेटा हॅकरकडुन चोरण्यात आला होता.
डेटा लीक होण्याचे अजुन एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे इनसाइडर लीक म्हणजे सिस्टम मधील व्यक्तीच आतुन कोणी जेव्हा कंपनीचा महत्वाचा गोपनीय वैयक्तिक डेटा लीक करत असते सार्वजनिक रीत्या उघड करत असते तेव्हा त्यास इनसाइडर लिक असे म्हटले जाते.
यात एखादा बाहेरचा व्यक्ती कंपनीत कामाला लागतो कंपनीचा विश्वास संपादित करतो कंपनीच्या सिस्टम मधील सर्व गोपनीय माहीती प्राप्त करतो अणि तीच प्राप्त केलेली कंपनीची वैयक्तिक गोपनीय माहिती दुसरया कंपनीला देऊन लीक करत असतो.किंवा स्वता चोरून निघुन जातो.
याचसोबत फिशिंगच्या माध्यमातून देखील डेटा लीक तसेच हॅक केला जात असतो.हयात डेटा चोरण्यासाठी हॅकर विशिष्ट व्यक्तीला तसेच एखाद्या कंपनीला देखील टार्गेट करत असतात.
कंपनीकडुन सायबर सिक्युरिटी टीम मजबुत करण्यात न आल्याने असे सार्वजनिक रीत्या डेटा लीक होण्याचे प्रकार घडत असतात.
फिशिंगच्या माध्यमातून चोरलेला पर्सनल गोपनीय डेटा सार्वजनिक रीत्या लीक करून विकला जातो किंवा त्या डेटाच्या बदल्यात कंपनीला तसेच त्या व्यक्तीला हॅकरकडुन ब्लँक मेल केले जाते.
फिशिंग मध्ये हॅकर आपल्याला एखादी लिंक व्हिडिओ फाईल वगैरे सेंड करत असतो ही पाठविलेली लिंक अटॅच केलेली फाईल व्हिडिओ मालवेअर इंजेक्ट करण्यासाठी केले जाते.
ह्या लिंकवर क्लिक केल्यावर आपणास काही पाॅप अप स्क्रीनवर ओपन होताना दिसुन येतात.हयावर क्लिक केल्यावर आपला सर्व गोपनीय डेटा हॅकर्स कडे जात असतो.यालाच फिशिंग म्हटले जाते.
डेटा हा जून्या संरक्षण प्रणालीचा वापर केल्याने देखील लीक होऊ शकतो.
डेटाचा गैरवापर कसा केला जातो?
सायबर गुनहेगाराकडे जर आपला वैयक्तिक डेटा जसे की मोबाईल नंबर,जन्मतारीख,पत्ता आधार नंबर लाॅग इन डिटेल्स आयडी पासवर्ड महत्वाची कागदपत्रे इत्यादी गोपनीय माहिती असेल तर ह्या सर्व माहिती दवारे सायबर गुन्हेगार आपल्या सर्व अॅक्टी व्हीटी तसेच बिहेव्ही अरला सहजपणे ट्रॅक करू शकतो.
अणि आपल्या एका चुकीच्या पाऊलामुळे सायबर गुन्हेगारांना आपले अकाऊंट रिकामे करण्याची संधी सहज प्राप्त होत असते.कारण आपला सर्व गोपनीय डेटा हॅकर्स कडे आधीपासून उपलब्ध असतो.
याचसोबत आपल्या आयडी पासवर्डचा वापर करून हॅकरला आपले अनेक महत्त्वपूर्ण इमेल चॅटिंग वाचता येतात.हया इमेलद्वारे चॅटिंग दवारे तो आपल्याला ब्लँक मेल देखील करू शकतो.
किंवा आपला गोपनीय डेटा मोबाईल नंबर,जन्मतारीख,पत्ता आधार नंबर लाॅग इन डिटेल्स आयडी पासवर्ड,महत्वाच्या कागदपत्रांची संवेदनशील माहिती डार्क वेबवर पैसे घेऊन बेकायदेशीररित्या आपल्या परवानगी विना इतर हॅकर्सला सायबर चोरटयांना विकु देखील शकतो.
लीक तसेच हॅक केला जाणारा डेटा कोणकोणत्या प्रकारचा असु शकतो?
लीक करण्यात आलेला डेटा पुढील प्रकारचा असु शकतो –
१)पर्सनल डेटा:नाव,मोबाईल नंबर,आय डी पासवर्ड, जन्मतारीख,पत्ता,महत्वाची शैक्षणिक वित्तीय कागदपत्रे सोशल मिडिया डिटेल आधार नंबर
२) बॅकिंग डेटा-अकाऊंट नंबर क्रेडिट डिटेल्स इत्यादी.
३) शैक्षणिक डेटा- शैक्षणिक प्रमाणपत्र,शैक्षणिक कागदपत्रे, विद्यार्थ्यांचे पेपर प्रश्नपत्रिका,हाॅलतिकिट,
शैक्षणिक डेटा लीक झाल्यावर काय होते?
अनेक वेळा शैक्षणिक संकेतस्थळावरील डेटा हॅक केला जातो अणि हा चोरलेला डेटा विक्रीसाठी सार्वजनिक रीत्या लीक केला जातो.
शैक्षणिक डेटा जसे की परीक्षेची प्रश्नपत्रिका वगैरे लीक झाल्याने अचानक फुटल्याने जे विद्यार्थी वर्षभर मन लावून अभ्यास करून परीक्षा देत असतात त्यांच्यावर अन्याय होत असतो.
कारण ज्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची मेहनत घेतली नाहीये अभ्यास केला नाहीये त्यांना देखील पेपर फुटल्याने सहज चांगल्या गुणांनी पास होता येते.ज्यामुळे स्काॅलर विद्यार्थी मागे पडत असतो.
पेपर फुटल्याने पात्र उमेदवारांना कमी गुण मिळतात अणि अपात्र उमेदवारांना पेपर मधील प्रश्न पत्रिका मध्ये कोणते प्रश्न येणार आहे हे आधीपासूनच माहीत असल्याने ते तेवढाच अभ्यास करत असतात अणि त्यांना पात्र उमेदवारांपेक्षा भरपुर गुण मिळतात असे देखील प्रकार घडत असतात.