व्हाॅटस अँप प्राॅक्झी सेटिंग काय आहे? WhatsApp proxy settings meaning in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

व्हाॅटस अँप प्राॅक्झी सेटिंग काय आहे?whats app proxy settings meaning in Marathi

आपण आपले व्हाॅटस अँप ओपन करून जेव्हा सेटिंग मधून स्टोरेज डेटा मध्ये जातो तेव्हा तिथे आपणास प्राॅक्झी सेटिंग नावाचे एक नवीन फिचर दिसुन येत आहे.

ज्यांना हे फिचर आपल्या व्हाॅटस अँपवर दिसुन येत नाहीये ते आपले व्हाॅटस अँप अपडेट करून हे नवीन फिचर प्राप्त करू शकतात.

आजच्या लेखात आपण व्हाॉटस अँपच्या लाॅच केलेल्या ह्याच नवीन फिचर व्हाॅटस अँप प्रोक्झी विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

व्हाॅटस अँप प्राॅक्झी सेटिंग काय आहे?whats app proxy settings meaning in Marathi

व्हाॅटस अँप प्राॅक्झी हे व्हाॅटस अॅपने नुकतेच लाॅच केलेले एक नवीन फिचर आहे.

व्हाॅटस अँप प्राॅक्झी सेटिंगचे फायदे कोणते आहेत?whats app proxy settings benefits in Marathi

कधी कधी आपल्या व्हाॅटस अॅपचे सर्वर अचानक इतके डाऊन होऊन जात असते की आपण एखाद्या व्यक्तीला मॅसेज सेंड केला तरी देखील आपला मॅसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचत नसतो.

किंवा काही वेळेला असे देखील होते की आपण ज्या क्षेत्रात राहतो आहे त्या क्षेत्रातील इंटरनेटचा स्पीड खुप कमी असतो तिथे इंटरनेट खुप मंद गतीने चालत असते.

ज्यामुळे आपल्याला अजर्ट एखाद्याला मॅसेज,डेटा,फाईल वगैरे पाठवायच्या असुनही इंटरनेट स्पीड लो असल्यामुळे पाठवता येत नसतात.

पण आता व्हाॅटस अँपच्या नवीन फिचर प्राॅक्झी सेटिंग मुळे आपण इंटरनेट जोरात चालत नसताना तसेच आपले व्हाॅटस अँप सर्वर डाऊन असेल तेव्हा देखील कुठलीही फाईल,डेटा मेसेज वगैरे समोरच्या व्यक्तीला सहज पाठवू शकणार आहे.

See also  ब्लॉकचेन म्हणजे काय? Blockchain तंत्रज्ञान मराठी माहिती

कुठलाही डेटा,फाईल मॅसेज, व्हिडिओ आॅडिओ आपण ह्या फिचरच्या साहाय्याने कोणालाही झटक्यात तसेच वेगाने पाठवू शकतो.

व्हाॅटस अँप प्राॅक्झी सेटिंग फिचर कसे सुरू करायचे?

  • सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील आपले व्हाॅटस अँप ओपन करायचे व्हाटस अँप ओपन केल्यावर कोपरयात दिलेल्या तीन डाॅटवर क्लिक करायचे.
  • त्यानंतर सेटिंग मध्ये जायचे सेटिंग मधून स्टोरेज अणि डेटा मध्ये जायचे स्टोरेज अणि डेटा मध्ये गेल्यावर सर्वात खाली आपल्याला प्राॅक्झी सेटिंग हे नवीन फिचरचे आॅप्शन दिसुन येईल.त्यावर क्लिक करायचे.
  • क्लिक केल्यावर आपल्याला use proxy असे एक आॉप्शन दिसुन येईल.त्यावर क्लिक करून प्राॅक्झी सेटिंग आॅन करून घ्यायची.
  • यानंतर खाली दिलेल्या कनेक्शन आॉप्शन वर सेट प्राॅक्झी वर क्लिक करून आपला सहा ते आठ अंकाचा व्हाॅटस अँप प्राॅक्झी कोड सेट करून सेव्ह करून घ्यायचा.
  • प्राॅक्झी कोड हा आपल्याला आॅनलाईन फ्री तसेच पेड मध्ये देखील नेटवर सर्च करून प्राप्त होत असतो.हा कोड बरोबर असल्यास आपले प्रोक्झी सहजरीत्या कनेक्ट होऊन जाते.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा