व्हे प्रोटीन विषयी माहीती – Whey protein information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

व्हे प्रोटीन विषयी माहीती – Whey protein information in Marathi

मित्रांनो जेव्हाही आपण मार्केटमध्ये आलेल्या नवीन वस्तु प्रोडक्टचा वापर करतो तेव्हा आपण सगळयात आधी त्या प्रोडक्टची व्यवस्थित माहीती घेत असतो.

कारण कुठल्याही प्रोडक्टचा अधिकतम लाभ आपणास तेव्हाच होतो त्या प्रोडक्टचे सर्व फायदे आपणास तेव्हाच घेता येतात जेव्हा आपणास त्या प्रोडक्टविषयी सविस्तर माहीती असते.

आज बाँडी बिल्डिंग करत असलेल्या अणि आपली फिटनेस बनवत असलेल्या व्यक्तींसाठी बाजारात एक नवीन सप्लीमेंट आले आहे.

ज्याचे नाव आहे व्हे प्रोटीन पावडर.ह्या सप्लीमेंटची बाजारात सध्या सर्वाधिक विक्री होताना आपणास दिसुन येत आहे.

व्हे प्रोटीन सप्लीमेंट हे आपले मसल्स तयार करते अणि वजन कमी करण्यासाठी देखील हे सप्लीमेंट खुप फायदेशीर ठरत असते.

हेच कारण आहे की सर्व जिम ट्रेनर,फिटनेस एक्सपर्ट हे सुदधा आपणास हे सप्लीमेंट घ्यायचा सल्ला देत असतात.

काही तरूण मंडळी तर आपले मसल्स रिकव्हर करण्यासाठी तसेच शरीरातील एनर्जीमध्ये वाढ होण्यासाठी वर्क आऊट करून झाल्यानंतर हे प्रोटीन घेत असतात.इतके फायदे ह्या सप्लीमेंटचे असतात.

म्हणुन आजच्या लेखात आपण व्हे प्रोटीन पावडर ह्या सप्लीमेंट विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

व्हे प्रोटीन कशाला म्हणतात?Whey protein powder meaning in Marathi

व्हे प्रोटीन पावडर हे दुध अणि दुधाच्या उत्पादनापासुन तयार करण्यात आलेल्या उच्च दर्जाने युक्त प्रोटीनला म्हटले जाते.

ह्या प्रोटीनमध्ये ग्लुटामिन,ल्युसिन,अँमिनो अँसिड तसेच ब्रान्च अँमिनो अँसिडचा देखील समावेश होत असतो.हे सर्व यात आपणास आढळुन येत असतात.

See also  Advocate आणि lawyer या दोघांमध्ये काय फरक आहे? Difference Between Lawyer and Advocate

व्हे प्रोटीन विकत घेताना कुठल्या गोष्टीची आपण विशेष काळजी घ्यावी?

बाजारातुन जेव्हाही आपण व्हे प्रोटीन खरेदी करू तेव्हा आपण याची काळजी घ्यावी की आपण जे प्रोटीन विकत घेतो आहे त्यात किमान 80 टक्के इतके प्रोटीन असायलाच हवे.अणि त्यामधील प्रोटीनचा प्रमुख स्रोत दुध हाच असायला हवा.

तसेच फँट लाँस करण्यासाठी,मसल्समध्ये वाढ करण्यासाठी,प्रोटीन घेण्याच्या वेळेपेक्षा आपण रोज प्रोटीन किती प्रमाणात घेतो आहे योग्य प्रमाणात घेतो आहे की नाही याकडे विशेष लक्ष केंद्रित करायला हवे.

व्हे प्रोटीनचे किती आणि कोणकोणते प्रकार आहेत?

व्हे प्रोटीन हे प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात.

1)हायड्रोलाईज्ड प्रोटीन -हायड्रोलाईज्ड प्रोटीनमध्ये प्रोटीन हे शंभर टक्के इतक्या प्रमाणात असते.

2) आईसोलेटेड प्रोटीन -आईसोलेटेड प्रोटीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण 90 ते 95 टक्के इतके असते.

3)काँन्सन्ट्रेट प्रोटीन – यामध्ये प्रोटीन हे 25 ते 80 टक्के इतके असते.

व्हे प्रोटीनचे फायदे कोणकोणते आहेत?benefits of whey protein in Marathi

● व्हे प्रोटीनचा पहिला फायदा हा आहे की हे लगेच पचते म्हणजे डायजेस्ट होत असते.याला डायजेस्ट व्हायला शरीरात शोषले जायला खुप वेळ लागत नाही.

● व्हे प्रोटीनला आपण शेकमध्ये मिक्स करून देखील घेऊ शकतो.

● व्हे प्रोटीनमुळे आपल्या मसल्स अत्यंत वेगाने रिकव्हर होत असतात.तसेच याने चरबी वजन देखील कमी करण्यास मदत होते.

● यात किमान 80 टक्के प्रोटीन असते म्हणजेच हा एक प्रोटीनचा परिपूर्ण स्रोत आहे.

● आपल्या शरीराच्या वाढीसाठी अणि विकासासाठी हे खुप फारदेशीर असते.अणि हे वापरायला देखील खुप सोप्पे असते.

● हे प्रोटीन आपण वर्क आऊट करण्याच्या आधी किंवा वर्क आऊट करून झाल्यानंतर देखील घेऊ शकतो.याने आपल्या मसल्सच्या साईजमध्ये तसेच आपल्या शरीरातील उर्जेत फारसा फरक पडत नाही.हे संशोधनातुन सिदध देखील झाले आहे.

● रोजच्या आहारात देखील आपण हे सप्लीमेंट म्हणुन वापरू शकतो.याने आपले ब्रग शुगर कंट्रोलमध्ये राहते अणि शरीरातील तणाव देखील दुर होण्यास मदत होते.

See also  टेलिमार्केटिंग कंपन्यांना आळा घालण्यासाठी ट्रायने केला नवीन नियम जारी  - TRAI cracks down on unauthorized telemarketers

● व्हे प्रोटीनमध्ये अँण्टी कँन्सर तत्व समाविष्ट असतात.जे कँन्सरपासुन आपला बचाव करत असतात.अस्थमा अँनमिया ह्या आजारांवर देखील व्हे प्रोटीन अधिक फायदेशीर ठरते.यात ल्युटिन असते जे आपल्या डोळयांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असते.

● याने हदयाच्या संबंधित आजार देखील दुर होत असतात.आपली हाडे मांसपेशा मजबुत होतात.

● यात अँमिनो अँसिड असते जे शरीरात ग्लुटाथिनची वाढ करते ज्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

साधारणत व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी किती प्रोटीन घेण्याची आवश्यकता असते?

एका साधारण व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी किमान 0.8 ग्रँम कि ग्रँम प्रोटीन घेणे फार गरजेचे असते.

बाँडी बिल्डरने किती प्रोटीनचे सेवण करायला हवे?

बाँडी बनवण्यासाठी बाँडी बिल्डरने किमान 1.6 ग्रँम/कि ग्रँम प्रोटीनचे सेवण करावे असे तज्ञ फिटनेस ट्रेनर तसेच जिम ट्रेनर सांगत असतात.

जे व्यक्ती 0.8 ते 1.6 ग्रँम कि ग्रँम प्रोटीन घेत आहे त्यांना वेळेची कुठलीही काळजी करू नये.मसल्समध्ये वाढ करण्यासाठी अन्न पचन होण्यासाठी आपण रात्री झोपायच्या अगोदर किमान 40 ते 41 ग्रँम प्रोटीन घेतले तरी चालते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा