महिला मासे खाल्यानंतर लगेच गेली कोमात!! मासे खाताना तुम्ही करू नका ह्या चुका –Woman loses limbs after battling bacterial infection from Tilapia
एका महिलेला मासे खाणे पडले महागात ! मासे खाल्यानंतर लगेचच ती महिला गेली कोमात , मासे खाल्यामुळे त्या महीलेच्या शरीरातील चार अवयव झाले खराब ,तुम्ही त्या महिलेने केलेली चूक करू नका .अशी कोणती चूक त्या महिलेने केली ,ज्या चुकीने ती कोमात गेली ?
खूप लोक मासे आवडीने खातात आणि मासे खाणे हे आपल्या शरीरासाठी फायद्याचे देखील असते. मास्यांमधून आपल्याला प्रोटीन मिळते , त्यामुळे खूप लोक आहारा मध्ये मासे खातात .मास्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी अँसिड आणि व्हिटॅमिन डी असते .
जर पेशंट आजारीअसेल तर डॉक्टर त्या पेशंट ला मासे खाण्याचा सल्ला देतात.परंतु मासे खाताना आपण काळजी घेतली पाहिजे.एक महिला मासे खाऊन कोमात गेली आहे आणि तिचे मासे खाल्यामुळे शरीराचे चार अवयव खराब झाले आहेत.तुम्ही मासे खाताना अशी चूक करू नका ,जी चूक त्या महिलेने केली –
डेली मेल रिपोर्ट नुसार अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील लॉरा बाराजस नावाच्या महिलेला मासे खायचा शोक होता.ती दररोज बाजारातून मासे आणून ,स्वतःच्या हाताने मासे बनवून , कुटुंबासोबत आवडीने मासे खात होती.
एके दिवशी त्या महिलेने बाजारातून तीलपिया नावाचा मासा खरेदी केला ,आणि नेहमी सारखा घरी जाऊन तो मासा बनवून खाल्ला.परंतु काही तासातच तिला कसेतरीच वाटू लागले ,तिची तब्येत बिघडू लागली आणि त्या महिलेला श्वास घेण्यामध्ये त्रास होऊ लागला.तिच्या घरातील लोकांनी तिला त्वरीत दवाखान्यात नेले , परंतु त्यांना समजले की लॉरा बाराजस ही कोमा मध्ये गेली आहे ,तिचे पायाचा काही भाग ,हाताचा काही भाग आणि ओठाच्या खालचा भाग काळपट पडायला लागला.तिच्या शरीरातील चार अवयव खराब झाले. सर्वांना वाटले की ह्या महिलेची किडनी खराब झाली आहे.

परंतु डॉक्टरांच्या मते ,त्या महिलेला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले होते ,त्या बॅक्टेरियल इन्फेक्शन चे कारण समजल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटले.त्या बॅक्टेरियल इन्फेक्शन चे कारण होते की ,त्या महिलेने खाल्लेले मासे हे कच्चे होते ,कच्चे मासे खाल्यामुळे त्या महिलेला कोमा मध्ये जावे लागले.
काही दिवसानंतर त्या महिलेची सर्जरी झाली आणि तिचे काही अवयव ट्रान्स प्लांट करावे लागले.ती महिला अजूनही मृत्यूशी लढत आहे आणि त्या महिलेची तब्येत म्हणावी अशी चांगली नाहीये.
ज्यांची रोगपरतिकारक शक्ती चांगली नाही ,त्यांना या रोगाचा खतरा होऊ शकतो –
अमेरिकेतील डॉक्टर डॉ. नताशा स्पोटिसवूड यांच्या मते,” जगातील कोणताही माणूस ह्या बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये अडकु शकतो ,अमेरिकेमध्ये दर वर्षाला या बॅक्टेरियल इन्फेक्शन चे १५० ते २०० पेशंट सापडतात.आणि यामधील ५ मधील एका व्यक्तीचा मृत्यू दर वर्षी होतो.
ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ,त्यांना ह्या बॅक्टेरियल इन्फेक्शन काहीही करू शकत नाही ,परंतु ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली नाहीये ,त्यांना या बॅक्टेरियल इन्फेक्शन च धोका उद्भवू शकतो.
तुम्ही जर मासे खात असाल तर वरती महिलेने केलेली चूक तुम्ही करू नका ,जेणेकरून तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन चा सामना करावा लागणार नाही आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करा .