जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस माहिती – World brain tumor day information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस माहिती – World brain tumor day information in Marathi

ब्रेन टयुमर हा एक असा आजार आहे ज्याचे नुसते नाव ऐकले तरी आपण घाबरून जात असतो.कारण हा एक जीवघेणा आजार आहे.

सुरूवातीला ह्या आजारावर कुठलाही उपचार केला जात नव्हता.मग हळुहळु ह्या आजारावर संशोधन करण्यास सुरूवात झाली.आणि ह्या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळया उपचार पदधती सुरू करण्यात आल्या.म्हणजे ब्रेन टयुमरला नियंत्रणात आणने सुरू झाले.

पण आजही जनतेमध्ये या आजाराविषयी असे गैरसमज असलेले पाहायला मिळतात जसे की की ब्रेन टयुमर कधी बरा होऊ शकत नाही.पण असे अजिबात नाहीये जर आपण ब्रेन टयुमरच्या रूग्णावर वेळ असताच उपचार केला तर तो बरा होऊ शकतो.

हीच ब्रेन टयुमरविषयीची जागरूकता सजगता जनतेत निर्माण होण्यासाठी जागतिक स्तरावर ब्रेन टयुमर डे दरवर्षी साजरा केला जातो.

आजच्या लेखात आपण ह्याच ब्रेन टयुमर डे विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

जागतिक ब्रेन टयुमर दिवस दरवर्षी कधी आणि केव्हा साजरा केला जातो?

जागतिक ब्रेन टयुमर दिवस दरवर्षी संपूर्ण जगभरात 8 जुन रोजी साजरा केला जातो.

जागतिक ब्रेन टयुमर दिवस दरवर्षी का साजरा केला जातो?

● लोकांच्या मनामध्ये असलेले ब्रेन टयुमरविषयीचे गैरसमज दुर करण्यासाठी तसेच ब्रेन टयुमरविषयी लोकांना माहीती देऊन त्यांच्यात टयुमरविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

See also  राष्ट्रीय लसीकरण दिवस २०२३ । इतिहास । महत्त्व । थीम । National Vaccination Day History And Theme In Marathi

जागतिक ब्रेन टयुमर दिवस दरवर्षी कसा साजरा केला जातो?

जागतिक ब्रेन टयुमर डे ह्या दिवशी लोकांना ब्रेन टयुमरविषयी माहीती दिली जाते ब्रेन टयुमर कसा होतो त्याची लक्षणे कोणकोणती असतात ब्रेन टयुमरवर आपण काय उपचार करायला हवेत याविषयी लोकांना सांगितले जाते.म्हणजेच ब्रेन टयुमरविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण केली जाते.

जागतिक ब्रेन टयुमर दिवस कधी आणि कोणत्या देशातसर्वात आधी साजरा केला गेला होता?

2000 साली जर्मनी ह्या देशात जागतिक ब्रेन टयुमर दिवस सर्वात प्रथम साजरा करण्यात आला होता.

  • जर्मन ब्रेन टयुमर असोसिएशन ह्या संस्थेने हा दिवस साजरा केला होता.जर्मन ब्रेन टयुमर असोसिएशन ही एक नाँन प्राँफिट म्हणजेच एक विना नफा संस्था आहे.जी समाजात ब्रेन टयुमरविषयी माहीती देऊन जनतेमध्ये ब्रेन टयुमर विषयी सतर्कता जागृती निर्माण करण्याचे कार्य करते.
  • ब्रेन टयुमर हा एक असा आजार आहे. ज्यामुळे आज जर्मनीमध्ये आज 10 हजार लोक ग्रस्त आहेत.एवढेच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज ब्रेन टयुमरचे आज 600 पेक्षा अधिक रूग्ण आढळुन येतात.
  • आणि भारत देशात देखील ह्या आजाराचे प्रमाण हळुहळु वाढताना दिसुन येत आहे.भारतातील लहान मुलांवर उपचार करणारे बालरोग तज्ञ असे सांगतात की लहान मुलांना हा कँन्सर होणे एक सामान्य बाब होत चालली आहे.
  • म्हणुन ह्या आजाराकडे गंभीरतेने बघत भारत सरकारकडुन नँशनल कँन्सर कंट्रोल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • जर्मन ब्रेन टयुमर असोसिएशनची स्थापणा कधी आणि कशी करण्यात आली?

जर्मन ब्रेन टयुमर ह्या ब्रेन टयुमरविषयी समाजात जागृती करत असलेल्या विना नफा संस्थेची स्थापणा 1998 मध्ये करण्यात आली होती.

ह्या संस्थेमध्ये 15 देशातील 500 पेक्षा अधिक सदस्यांनी आपली नावनोंदणी केली होती.जर्मन ब्रेन टयुमर असोसिएशन ही संस्था ब्रेन टयुमर झालेल्या रूग्णांची आणि त्यांच्या कुटुंबाची मदत करण्याचे अमुल्य असे समाजसेवेचे कार्य करते.

See also  कॅलरी म्हणजे काय ? शरीराला रोज किती कॅलरी हव्यात - कॅलरी चार्ट ?what is a calorie, how many calories we need.

ब्रेन टयुमर म्हणजे काय?ब्रेन टयुमर कशाला म्हणतात?

जेव्हा आपल्या शरीराला गरज नसलेल्या पेशींची अनावश्यकरीत्या वाढ होऊ लागते तेव्हा अशा परिस्थितीत आपणास कँन्सर झाला आहे असे म्हटले जाते.

जेव्हा आपल्या मेंदुच्या टयुमरमध्ये सामान्य पेशींची निर्मिती होत असते.तेव्हा आपणास ब्रेन टयुमर हा आजार मेंदुशी निगडीत आजार जडत असतो.

ब्रेन टयुमर देखील दोन प्रकारचे असतात –

1)घातक ब्रेन टयुमर :Malignant brain tumor

2) सौम्य ब्रेन टयुमर :Benign brain tumor

ब्रेन टयुमरची लक्षणे कोणकोणती आहेत?

ब्रेन टयुमरची काही सामान्य तसेच प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-

● जोरात डोके दुखणे

● मळमळ होणे

● वांत्या होणे

● ताण तणाव जाणवने

● ऐकायला,पाहायला,बोलायला अडचण येणे

● एकाग्रता कमी होणे

इत्यादी.

ब्रेन टयुमरवर आज कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत?

ब्रेन टयुमर हा कुठल्याही एक प्रकारचा नसतो त्याचे देखील अलग अलग प्रकार असतात म्हणुन डाँक्टर देखील आधी रूग्णाची तपासणी करून जाणुन घेतात की त्याला कोणत्या प्रकारचा ब्रेन टयुमर झाला आहे.मग त्याच्यावर कोणता उपचार करायचा हे ठरवित असतात.

ब्रेन टयुमरवर उपचार करायला डाँक्टर तसेच चिकित्सक आधी पेशंटची स्थिती बघतात.त्याच्या टयुमरची साईज किती आहे हे बघतात.मग रूग्णाच्या आजाराच्या स्थितीनुसार त्याला काय उपचार करायचे हा सल्ला देत असतात.

ब्रेन टयुमरवर आज पुढील काही उपचार पदधती उपलब्ध आहेत-

● सर्जरी

● स्टेराँईड

● किमोथेरपी

● रेडिओ थेरपी

● अँण्टी सिझर मेडिकेशन

इत्यादी.

ब्रेन टयुमर सर्जरी म्हणजे काय?

ब्रेन टयुमर सर्जरी ही टयुमरवरील उपचाराची एक अशी पदधत आहे ज्यात डाँक्टर टयुमर झालेल्या पेशंटचा टयुमर अणि त्याच्या आजुबाजुचा भाग देखील काढुन टाकत असतात.

ह्या प्रकारच्या सर्जरीमध्ये इंस्पेक्शन आणि रक्तस्त्राव होण्याचा अधिक धोका असतो.

ब्रेन टयुमरविषयी जाणुन घ्यायची काही महत्वाची तथ्ये –

● ब्रेन टयुमर हा कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो.

See also  ऑनलाइन मेडिसीन खरेदी करावी का ? Buying Online Medicine Marathi Information

● ब्रेन टयुमरचे लक्षण त्याची साईज टाईप कंडिशन यावर अवलंबुन असतात.

● ब्रेन टयुमर नेमका कशामुळे होतो याचे मुख्य कारण अजुन समजलेले नाहीये.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा